Thursday, 10 November 2016

विनय सहस्रबुध्देंनी दत्तक घेतले विहीगांव

भाजप प्रवक्ते विनय सहस्रबुध्दे व भाजप नेते रवीशेट पाटील

विनय सहस्रबुध्देनी दत्तक घेतले विहीगांव

विचारममंथन LIVE न्युज नेटवर्क

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते प्रवक्ते तथा रामभाउ म्हळगी प्रबोधनीचे अध्यक्ष विनय सहस्रबुध्दे यांनी शहापुर तालुक्यातील आतिशय दुर्गम समजल्या जानार्या विहिगांव या आदिवासी खेड्याला दत्तक घेतले आसल्याचे नुकताच जाहिर केले.
     शहापुर हा तालुका ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका आसुन क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. आतिशय दुर्गम आसलेल्या या तालुक्याका  आजुन विकासापासुन वंचितच राहीला आहे. इथला आदिवासी समाज आजही जंगल उपजिवीकेवर आपला चरीतार्थ चालवत आसुन विकासापासुन कोसो दुर राहीला आहा. कसारा विभागातील  अत्यंत दुर्गम समजला जानारे विहीगांव ही पाच आदिवासी पाड्यांची वस्ती आसुन रस्ते, पाणी , विज या यासारख्या प्राथमिक सुविधाही या गावात पोहचल्या नाहीत. आतिशय मागास आसलेले हे गांव भाजप नेते विनय सहस्रबुध्देयांनी दत्तक घेतले आसुन आगामी काळात येथे रस्ते पाणी विज आशा मुलभुत सुविधा तर उपलब्ध करुन देवुच पण त्या बरोबर इथल्या आदिवासिंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करनार आसल्याची माहीती भाजप चे विधान सभा क्षेत्र अध्यक्ष रवी पाटील यांनी सा. विचारमंथन ला दिली. या आधी ही शहापुर तालुक्यातील खरीवली सो हे गांव आमदार रामनाथ मोते यांनी खासदार कपील पाटील यांनी सापगांव हे गांवदत्तक घेतले आहे



Posted via Blogaway


2 comments:

  1. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1169368656428291&substory_index=0&id=1169035836461573

    ReplyDelete
  2. Campaign MH SH 44 : Good News to all,
    शहापूर-घाटघर रस्ता मार्गे अकोले ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्‍या शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१ मध्ये सर्वेक्षण होऊनही १५ वर्षे हा रास्ता रखडला.⛳ लालफीतीच्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याच्या पुनर्सर्वेक्षणासाठी तसेच सरकारस्तरावरील विविध परवानग्यांसाठी २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे या कामाला वेग येणार होता? अकोले तालुका - मुंबई अंतर कमी होणार होते. मुबई-नाशिक महामार्गावरून कसारा-घोटी-भंडारदरा मार्गे जाणार्‍या रस्त्याऐवजी, MH SH 44 HIGHWAY हा रास्ता तुटलेल्या ठिकाणी जोडला गेल्यास नगर जिल्ह्यात जाण्यासाठी 6 तासांचे अंतर कमी होणार आहे. शिवाय वेळेचीही बचत होणार आहे. मुंबईवरून कल्याण शहापूर घाटघर +( जोड रस्त्यामुळे) + राजूर अकोले,शनिशिंगणापूर / शिडी हे अंतर 6 तासाने कमी होणार.
    नगर जिल्ह्य़ातुन भंडारदरा, घाटघर कोकण कड्यावरून चोंढे घाटातून शहापूर तालुक्यातील डोळखांब, तळवाडे, मेट, हिंगळून गावांच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता थेट मुंबईकडे जाणार आहे.
    आमदार किसन कथोरे, प्रकाश भोईर यांनी २०१३ च्या विधिमंडळ अधिवेशनात या रस्त्याची मागणी केली होती. आमदार पांडुरंग बरोरा व सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी याबाबत पाठपुरावा केला, तर युतीचे सरकार आल्यानंतर भाजपचे अशोक भांगरे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांनीही या कामाला पाठबळ दिल्याचे समजते. ठाणे जिल्ह्यातील शहापूर व नगर जिल्ह्यातील अकोले हे दोन्ही तालुके आदिवासी उपयोजनेत येत असल्यामुळे आदिवासी विकास खात्याकडून या रस्त्यासाठी निधीची मागणी करण्यात येत होती. या घाटमार्ग रस्त्यामुळे ठाणे व नगर हे दोन्ही जिल्हे दळणवळण, व्यापार व्यवसायाच्या देवाणघेवाणीने एकत्र येऊ शकणार आहेत. रस्ता या मार्गामुळे शहापूरचे चोंढे धरण, २५० मेगा वॉटचा वीज प्रकल्प त्याला लागूनच तालुक्यातील घाटघर, भंडारदरा, रंधा, रतन वाडी, कळसूबाई, शिखरामुळे पर्यटन विकासाला संधी मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार होईल. आदिवासी तरुण आजही रोजगारासाठी नारायणगाव, नाशिक, जुन्नर, ठाणे या भगत जातात; मात्र, हा रस्ता झाला तर भविषात रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध होणार आहेत कोट - ठाणे व नगर जिल्ह्याला जोडणारा शहापूर चोढे-घाटघर हा रस्ता सर्वेक्षणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद भाजप सरकारने अर्थसंकल्पात केली. चोढे-घाटघर रस्ता होण्यासाठी अनेक वर्षे या भागातील जनतेची मागणी होती. तत्कालीन कार्यकारी अभियंता हि. ता. मेंढीगिरी यांनीही सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनीही या कामात मदत केली. भंडारदरा घाटघर येथील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होईल

    ReplyDelete

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...