Saturday, 27 February 2021

शहापुर नगरपंचायत मतदार याद्यामध्ये आदला बदली;पाचशे च्या वर हरकती दाखल


शहापुर/प्रशांत गडगे

शहापुर नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अंतिम मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, १७ ही प्रभागांत मतदार याद्यांमधे प्रचंड घोळ निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे.  जवळपास शहापुर नगर पंचायतीच्या सर्वच प्रभागांच्या याद्यांमधे मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून, एका प्रभागात राहनारे अनेक मतदार दुसर्या प्रभागात तर इतर प्रभागातील मतदारांना इतरत्र समाविष्ट करण्यात आले आहे. 

शहापुर नगरपंचायत हद्दीत १७ प्रभाग आहेत. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असून, सध्या प्रशासकराज सुरू आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धिकरण करून अद्ययावत करण्याचे काम बीएलओंना देण्यात आले होते. त्यामधे मृतांचे नाव वगळणे, लग्न होऊन गेलेल्यांची नावे वगळणे, नव्याने आलेले व १८ वर्षे झालेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, प्रभाग बदलून गेलेल्यांची नावे शोधणे ही कामे गृहभेटीच्या माध्यमातून बीएलओंना करायची होती. मात्र, ही सर्व कामे घरी बसूनच करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, ज्या प्रभागात जे लोक राहतात, त्या मतदारांना इतर प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट करुन काही जन राजकिय पोळी भाजण्याच्या विचारात आहेत. 

शहरातील जवळपासच्या गावांतील लोकांची नावेसुद्धा नगरपंचायतच्या मतदार यादीत आल्याची चर्चा शहरात आहे. याचा अर्थ बोगस मतदारांचा शिरकाव तर झाला नाहीना, अशी शंका निर्माण झाली आहे. तसेच नुकत्याच झालेले ग्राम पंचायत निवडनुकीत गावांकडे मतदान करनार्या मतदारांची नावे ही नगर पंचायतीच्या यादीत आल्याने याप्रकरणी काही सुज्ञ नागरिकांनी मतदार यादीवर हरकत घेऊन ही गंभीर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती आहे. शहरातील राजकीय वर्तुळात वजन असणारे मतदार याद्यांमधे घोळ करण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. तर काही जणांनी हरकतीची मुदत संपण्याच्या काही तास आधी भाडेकरार करुन नाव नोंदवन्याचा प्रकार केला आहे. काही इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांचा अभ्यास करताना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदार पळवापळवीची बाब निदर्शनास आली असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

शहापुर नगरपंचायतीच्या मतदार यांद्यामध्ये प्रचंड घोळ झाला आसुन हेतुपुरस्कर एका प्रभागा मधुन दुसर्या प्रभागामध्ये भाडेकरार करुन मतदांरांची नावे नोंदवन्यात आली आसुन या विरोधात आम्ही पुराव्यानिशी हरकती घेतल्या आहेत, निवडनुक आधिकारी याची दखल घेवुन कारवाई करतील का? हे आंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर कळेल.
मनोज पानसरे
नागरीक, व हरकतकर्ता

नगरपंच्यायतीच्या प्ररुप याद्यांवर 500 पेक्षा जास्त हरकती प्राप्त झाल्या आसुन निवडनुक आयोगाने यासाठी पंधरा दिवस मुदतवाढ दिली आसुन या हरकतीची शहानिशा केली जाईल
वैभव गारवे
मुख्य कार्यकारी आधिकारी
शहापुर नगर पंचायत

Friday, 26 February 2021

शहापूर पंचायत समितीचे बीडीओ अशोक भवारी सक्तीच्या रजेवर



हनुमंतराव दोडके शहापूर पंचायत समितीचे नवे बीडीओ


२६सदस्यांच्या आंदोलनाला  मिळाले यश!

शहापुर/प्रशांत गडगे

मासिक सभेवर बहिष्कार टाकून बीडीओ अशोक भवारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आज सभापती, उपसभापती सह २६ सदस्य करणार होते उपोषण.


शहापूर-
   शहापूर पंचायत समितीचे सभापती ,उपसभापती व सदस्यांना विश्वसात न घेता मनमानी करीत असल्याचा निषेधार्थ अकार्यक्षम गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी याना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले असून त्याजागी हनुमंतराव दोडके यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
    १५ वा वित्त आयोगाचा आराखडा न बनविणे तसेच सभापती , उपसभापती व सदस्यांना यांना विश्वासात न घेणे अश्या तक्रारी सर्व सदस्यांनी केल्या होत्या. गटविकास अधिकारी अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या बदलीचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमुखाने घेतला होता. परंतु त्यावर कार्यवाही होत नसल्याने सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन पस्टे, गटनेते सुभाष हरड सर, दशरथ भोईर, स्नेहल शिंगे, पद्माकर वेखंडे,एकनाथ भला, प्रकाश वीर, आदींसह सर्व सदस्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची १७ फेब्रुवारी रोजी भेट घेऊन निवेदन दिले होते.
    २६ फेब्रुवारी रोजीच्या शहापूर पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकून उपोषण करण्याचा इशारा सर्व सदस्यांनी निर्णय घेतला होता.
    त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांना २५ फेब्रुवारी रोजी शहापूर पंचायत समितीमध्ये चौकशी साठी पाठवून सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
   त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तात्काळ अशोक भवारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शहापुर पांच्यात समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून हनुमंतराव दोडके यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचे आंदोलन स्थगित करून आजची मासिक सभा घेण्यात आली.

Tuesday, 23 February 2021

आसनगांवात रेल्वे उड्डान पुलाची मागणी


शहापुर/प्रशांत गडगे

शहापुर तालुक्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक आसलेल्या आसनगांव रेल्वे स्थानक परीसराचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच वाढती रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेता या स्थानक परीसरात विविध विकास कामे होने गरजेचे आहे. गेली कित्तेक वर्ष आसनगांव पुर्व व पश्चिम यांना जोडनारा रेल्वेवरील उड्डान पुल नसल्यामुळे आनेक प्रवासी व स्थानिक नागरीकांची गौरसोई होत आहे. प्रवासी आणी ग्रामस्थांनी वारंवार या उड्डानपुलाची मागणी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन यावर दुर्लक्ष करीत आहे.
  नुकताच भिंवडी लोकसभेचे खासदार कपील पाटील व रेल्वेचे मराव्यवस्थापक संजिव मित्तल यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शहापुर तालुक्यातील आसनगांव येथे पुर्व व पश्चिम ला जोडनारा उड्डान पुल नसल्या मुळे आसनगांव परीसरातील आनेक वाहन चालक व चाकरमानी प्रवाश्यांना पुर्वेतुन पश्चिम कडे जान्यासाठी तिन चे चार किमीचा वळसा घालावा लागत आहे. तसेच याठिकाणी एकजुने फाटक आहे तेही बंद केले आसल्याने आनेक प्रवाशी नागरीकांना नाईलाजाने रेल्वे पटरी ओलांडावी लागत आहे. त्यामुळे आनेक अपघात या ठिकाणी होत आसतात. या बाबीची गंभिर दखल घेवुन खा. कपिल पाटील यांनी हा मुद्दा बैठकीत मांडला आसुन याबाबत शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे यांनी निवेदन दिले होते. लवकरच या मुद्दावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी सबंधित रेल्वे आधिकार्यांनी दिले आहे.

Friday, 19 February 2021

शिवसंपर्क आभियाना बाबत शिवसेनेची बैठक; जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी केले मार्गदर्शन



हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते शिवपुजन करुन या बैठकीची सुरुवात करण्यात आली.

शहापुर/प्रतिनिधी

आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडनुकांन मध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे या यशावर हुळुन न जाता महाराष्ट्राच्या काना कोपर्यात  पक्ष बांधनी आणी संघटनात्मकवाढी बरोबर कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने राज्यभर शिवसेने तर्फे शिवसंपर्क आभियान येत्या फेब्रु 23 ते 27 तारखेला संपुर्ण महाराष्ट्र भर राबवन्यात येनार आहे.
              याच निमित्ताने ठाणे जिल्हा ग्रामिन चे जिल्हा प्रमुख मा.श्री प्रकाश पाटील यांनी  शहापुर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेवुन पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले, तसेच आभियाना संदर्भात काही सुचना केल्या. तसेच पदाधिकार्यांनी अपापसातील मतभेद विसरुन एक होवुन एक दिलाने पक्षवाढी काम करण्याचे आहवान कार्यकर्त्यांना केले. शिवसंपर्क आभियाना मार्फत कार्यकर्ते मेळावे,मार्गदर्श शिबिरे, शासनाच्या योजना तळागाळात पोहचवने, आशा विविध गोष्टी केल्या जानार आहेत या बैठकिला तालुका प्रमुख मारुती धिर्डे, माजी आमदार पांडुरंग बरोरा,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रश्मी निमसे,सभापती रेश्मा मेमाने, तालुका संघटक अरुण कासार, काशिनाथ तिवरे चंद्रकांत जाधव,माजी जिल्हा परीषद अध्यक्षा मंजुषा जाधव, किसन भांडे, शिवाजी देशमुख आदि पधाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.तर शिवसेनेचे उपसभापती जिल्हापरीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शहर प्रमुख उपतालुका प्रमुख विभागप्रमुख आदि सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या बैठकीला उपस्थित होते.

Wednesday, 17 February 2021

दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव शासकीय अभिवादन यादीत समाविष्ट



मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक `दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले असून येत्या शनिवारी, दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209व्या जयंतीदिनी राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका येथील शासकीय कार्यालयांमधून जांभेकर यांना अभिवादन करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्याकरीता शासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र उपलब्ध करून दिले जाणार असून त्याकरीता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये विराजमान असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राची निवड करण्यात आली आहे. सदर तैलचित्र सुप्रसिध्द चित्रकर्ती सौ. चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले आहे. 
   मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून संघातर्फे शासनाला धन्यवाद दिले आहेत. दि. 20 रोजी सकाळी 11.00 वाजता पत्रकार संघात देखील जांभेकर यांना अभिवादन करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.

   सदर तैलचित्राचा यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर 1985 मध्ये  SOCIAL REFORMERS OF MAHARASHTRA या नावाचे प्रसिध्द केलेल्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. ते पुस्तक माहिती आणि जनसंपर्क विभागांतर्गत नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येऊन ते कॉपीराईट करण्यात आले आहे. सदर पुस्तक तयार करण्याची जबाबदारी सुप्रसिध्द साहित्यिक दिवंगत श्री.णय. दि. फडके यांच्यावर सोपविली होती. या पुस्तकासाठी महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांची चित्रे तयार करून देण्याचे काम सौ. चंद्रकला कुमार कदम यांच्यावर सोपविले गेले होते. त्यासाठी त्यांना आवश्यक ती संदर्भयुक्त माहिती पुरविण्यात आली होती. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर तसेच इतर समाजसुधारकांची तैलचित्रे दिवंगत श्री.णफडके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली होती. त्या छायाचित्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचेही हे छायाचित्र आहे. ते छायाचित्र त्यावेळी माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे नियुक्त केलेल्या अंतर्गत समितीने अधिकृत म्हणून मान्य केलेले आहे.

   सौ. चंद्रकला कुमार कदम या सुप्रसिद्ध चित्रकर्ती असून त्यांनी भारतीय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेले स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे तैलचित्र तसेच महाराष्ट्र विधान भवनातील महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, दादासाहेब मावळंकर, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, एस. एम. जोशी, गुजरात विधानसभेतील स्वा. वि. दा. सावरकर, मुंबई उच्च न्यायालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, मौलाना अब्दुल कलाम आझाद, लोकमान्य टिळक, सी. डी. देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, शंकर दयाळ शर्मा आदींची तैलचित्रे तयार केलेली आहेत. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, पिंप्री-चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका आदी संस्थांसाठी मान्यवरांची तैलचित्रेही सौ. कदम यांनीच तयार करून दिलेली आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहासाठीही भव्य तैलचित्रे नुकतीच तयार करून दिलेली आहेत.

शहापुरात वनविभागाने साकारलेल्या नक्षत्रवनाची उद्घाटना आधिच दुरावस्था;लाखो रुपयांचा शासननिधी मातीमोल


#वनविभागाचे दुर्लक्ष



शहापुर /प्रशांत गडगे

शहापुर तालुक्यातील मौजे कानविंदे येथे वन विभागा तर्फे स्व. उत्तमराव पाटील वनउद्याची निर्मिती करण्यात आली आहे. 12.10 हेक्टर परीसरात सकारन्यात आलेल्या या नक्षत्रवनाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आसुन हे उद्यान नागरीकांना खुले होण्या आधीच भेसुर झाल्याने शारनाचा लाखो रुपयांचा निधी मातीमोल झाला आसुन  याठीकाणी वन विभागाने केलेली लाखो रुपयांची विकास कामे ठेकेदारांच्या आर्थिक फायद्या साठी होती का ?आसा सवाल शहापुर तालुक्यातील जनता करीत आहे.

शहापुर तालुक्यात वन विभागाकडुन पर्यटनाला चालना देण्यासाठी सन 2015-16 मध्ये सामाजिक वनीकरनातंर्गत वन व वनोत्तर जमिनीवर स्व. उत्तमराव पाटील वनोद्यानाची संकल्पना साकारण्यात आली.गेली पाच वर्ष या ठिकाणी वन विभागा मार्फत विविध विकास कामे करण्यात आली.परंतु सामाजिक वनीकरण कडुन हे उद्यान प्रादेशिक वन विभागाकडे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागल्याने या उद्यानाची दुरावस्था झाली आहे.

        शासनाने चांगला हेतु बाळगुन 12 हेक्टर परीसरात बारा राशिंच्या पंचागाकृती नक्षत्र वनाची निर्मीती केली आहे. या इको फ्रेंडली वनोद्यानात स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड करुन त्यांचे राशी प्रमाने नामकरण्यात आले आहे.तसेच या उद्यानाच्या माध्यमांतुन फळवन, चंपक वन, कदंब वन, चरक वन, लता वन, सारीका वन, आतिथी वन आशा विविध प्रकारच्या उपवनांची निर्मिती केली आहे.तसेच या ठिकाणी लहान मुलांनसाठी बाग खेळनी, जेष्ठांसाठी विश्रांती केंद्र, फिरण्यासाठी पायवाटा आशा विविध संकल्पना घेवुन या उद्यानाची निर्मीती केली आहे.परंतु याची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने शासनाचा हा निधी फक्त ही विकास कामे करनार्या ठेकेदारांच्या फायद्या साठी केला  का आसा सवाल नागरीक विचारत आसुन हे उद्यान लवकरच नागरीकांसाठी सुरु करावे आशी मागणी जनतेतुन होत आहे.


सदर वनो उद्यान आत्ताच प्रादेशिक विभागाकडे हस्तांतरीत झाला आसुन, या ठिकाणी बरेच गवत वाढले होते, ते काढुन उद्यानाची साफ सफाई वनविभागाकडुन काम सुरु आहे.


वसंत घुले

उपवन संरक्षक, ठाणे


सदर उद्यानाची दुरावस्था झाल्याचे आत्ताच कळले,माहीती घेवुन हे उद्यान सुरु करण्यासाठी होनार्या दिरंगाई बाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल.

दौलत दरोडा

आमदार शहापुर

शहापुर पंचायत समितीत सावळा गोंधळ कायम;प्रशासना विरोधात सत्ताधारी एकवटले


अकार्यक्षम बिडीओ अशोक भवारीच्या बदलीची मागणी

प्रशांत गडगे

शहापुर पंचायत समिती मध्ये सध्या विकासकामांची बोंब सुरु आसतांना सत्ताधारी विरोधात बिडीओ यांच्या वादाचा चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. गेल्या दोन तिन महिन्यांपासुन सुरु आसलेल्या या शित युध्दाने आता टोकाची पायरी गाठली आसुन अकार्यक्षम गटविकास आधिकारी आशोक भवारी यांची तत्काळ बदली न झाल्यास मासिक सभेवर बहिष्कार टाकुन आमरण उपोषन करण्याचा इशारा  जिल्हा परीषद अध्यक्ष्या सुषमा लोणे यांना दिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी व दुर्गम तालुका म्हणुन शहापुर तालुक्याची ओळख आहे.पन्नास कि.मी ची परिघ आसलेल्या या तालुक्याच शासनाच्या विविध योजना तळा-गाळा पर्यत पोहचवुन तालुक्याचा सर्वांगिन विकास करण्यासाठी जिल्हा परीषद व पंचायत समिती या दोन यंत्रना महत्वाची भुमिका बजावत आसतांना, शहापुर पंचायत समिती मध्ये गेल्या काही वर्षापासुन सत्ताधारी शिवसेना,राष्ट्रवादी चे पंचायत समिती सदस्य विरोधात प्रशासन आसा कलगीतुरा रंगल्याचे चित्र दिसत आहे. शहापुर पंचायत समितीचे विद्यमान गटविकास आधिकारी आशोक भवारी यांच्या विरोधात दि. 5/11/20 रोजी झालेल्या मासिक बैठकीत सर्व पंचायत समितीचे सभापती उपसभापती व सदस्य यांनी मिळुन आशोक भवारी यांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित करीत चांगलेच फैलावर घेत अकार्यक्षम गटविकास आधिकारी यांची बदली करण्याचा ठराव मांडला होता हा ठराव पुर्ण बहुमताने मंजुर करण्यात आला होता व कारवाई साठी व पुढे ही पाठवण्यात आला होता. परंतु आज मिती पर्यत याठरावार कारवाई नझाल्याने संतप्त झालेल्या सर्व सदस्यांनी नुकताच ठाणे जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेवुन बदली करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास आमरण उपोषनाचा इशारा ही दिला आसल्याने तालुक्याच चर्चेला उधान आले आसुन गटविकार आधिकारी अशोक भवारी हे संपुर्ण कोविड काळात कुठे दिसले नसल्याची चर्चा आहे, तसेच तालुतक्याती ग्रामपंचायती मध्ये वाढत आसलेला भष्ट्रचार, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले ग्रामसेवक व इतर प्रशासकीय आधिकार्यांना पाठिशी घालन्याच काम गट विकास आधिकारी यांनी केले आहे आसा बहुसंख्य पं.स. सदस्यांचा आरोप आहे. तसेच पंचायत समिती सदस्यांना अपमानास्पद वागनुक देणे, आसे  विविध आरोप भवारी यांवर होत आसुन आता प्रशासन आशा अकार्यक्षम आधिकार्याची उचलबांगडी करते का हे पाहने औचुक्याचे ठरेल.एकंदरी या दोन्हीच्या वादामुळे शहापुर तालुक्याचा विकास काहीसा मंदावला आसुन या वादात जनतेची नाहक होरपळ सुरु आहे.

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...