शहापुर /प्रशांत गडगे
शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळे तालुक्यात दिलासादायक वातवरण आहे. परंतु ओसरलेल्या दुसर्या लाटेत लसिकरणाचा वेग वाढवुन जास्तीत नागरीकांना सुरक्षीत करुन संक्रमन आटोक्यात आणन्या साठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे.त्यासाठी जि.प.ठाणे व आरोग्य विभाग शहापुर या दोन्ही मार्फत आज 15 जुन रोजी शहापुर तालुक्यातील 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण करण्यात येनार आहे.
ठाणे जिल्हा परीषदेचे विशेष कार्यकारी आधीकारी भाऊसाहेब दांडगे यांनी मध्यंतरी शहापुर तालुक्यातील गोठेघर कोविड सेंटर ला भेट दिली होती या वेळी शहापुर तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या संदर्भात सुचना केल्या होत्या त्या अनुशंघाने, जिल्हा आरोग्य आधिकारी मनिष रेंघे, गटविकास आधिकारी आशोक भवारी व तालुका आरोग्य आधिकारी डाँ तारुलता धानके यांनी ठाणे जिल्ह्यातील पहिलाच ग्रामपंचायत प्रशासन शिक्षण विभाग,महिला बालकल्यान विभाग, यांच्या सहकार्यातुन एकाच दिवसात 25 आरोग्य उपकेंद्रात लसिकरणाचा मोठी मोहीम हाती घेतली आहे.यात 45 वर्षावरील व्यक्तींना लसिकरण करण्यात येनार आसुन प्रत्येक उपकेद्रात 100 लसी उपलब्ध करुन देण्यात येनार आहेत. ग्रामपंचीयती जनजागृती करण्यात.येनार आहे.तसेच प्रत्येक उपकेंद्रात 100 व्यक्तीचे लसिकरपुर्ण करनार्या उपकेंद्रातील कर्मचार्यांचा सत्कार पंचायत समिती सभापती जगन पष्टे यांच्या हस्ते करण्यात येनार आहे.