शहापुर तहसिल कार्यालया समोरच २ कोटी वृक्षलागवडीचा फज्जा
मोहीमेत लावलेली झाडे सुकली..
विचारमंथन वृत्तसेवा / प्रशांत गडगे
जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेला निसर्ग आणि ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे गेल्या काही वर्षांत मानवी जीवनावर मोठे विपरित परिणाम झाले असून भविष्यात यामुळे निर्माण होणार्या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार केला असून पर्यावरणाचा हा ढासळलेला समतोल सावरण्यासाठी आरोग्य विभागाने 1 जुलै रोजी राज्यात वनमोहत्सवाचे औचित्य साधुन २ कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली होती.
या योजनेत शासकिय सर्वच विभागांनी सहभाग घेत सुमारे अडीच कोटी वृक्ष लागवड केली. यात सहभाग म्हणुन सेल्फी विथ ट्री आशा आभिनव कल्पनाही राबवल्या गेल्या. शहापुर तालुक्यात ही २ कोटी वृक्ष लागवड संकल्पना राबवली गेली महसुल विभागा तर्फे तहसिल कार्यालया समोर मोठ्या थाटाट वृक्षरोपण करण्यात आले पण या वृक्षरोपणात लावन्यात आलेली झाडांवर महसुल विभागाचे दुर्लक्ष होत आसुन ऐन वर्दळीच्या आणि तालुक्याच्या मध्यवर्ती मुख्य कार्यालयातच शासनाच्या २ कोटी वृक्षलागवड संकल्पनेचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. शहापुर तालुक्यात आनेक ठिकाणी झालेल्या वृक्षलागवडीची ही परीस्थिती आसुन सर्वच शासकिय आधिकारी आणि नागरीकांनी या वृक्षांचे संगोपन करणे गरजेचे आहे. अन्यथा शासन विविध योजना राबवते त्यासाठी खर्च ही करते पण उदासिनते मुळे या योजना उद्देश सफल होत नसल्याने शासनाचा करोडो रुपये निधी वाया जातो याची नोंद घेने गरजेचे आहे.
Tuesday, 29 November 2016
शहापुर तहसिल कार्यालया समोरच २ कोटी वृक्षलागवडीचा फज्जा
Friday, 25 November 2016
शहापुर मध्ये सात लाख रुपयाची चोरी
विचारमंथन वृत्तसेवा/ प्रशांत गडगे
वाढत्या थंडीचा फायदा घेवुन शहापुर तालुक्यात सध्या चोरांनी धुमाकुळ घातला आहे. आलिकडेच दुचाकी चोरीच्या घटनेट वाढ झाली आसुन रात्री दुकाने फोडुन चोरी होण्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. शहापुरातील द टायर जंक्शन हे दुकानात रात्री तीन च्या सुमारास चोरी झाली आसुन ७ लाख रु मुद्देमाल चोरीला गेल्याने परीसरात खळबळ माजली आहे.
प्रशांत भेरे यांच्या मालकीच्या शहापुर गोठेघर येथील बी टायर जंक्शन हे दुकान दि ८ नोंव्हेबर ला पहाटे ३ च्या सुमारास चोरट्यांनी फोडले आसुन सात लाख किंमतीचे विविध कंपन्यांचे टायर चोरुन नेले आहेत. चोरट्यांनी चोरी करतांनाची संपुर्ण घटना सिसि टिव्ही कँमेर्यात कैद झाली आसुन चोरांचे चेहरे त्यात स्पष्टपणे दिसत आहे. या चोरट्यांनी सदर दुकानातील ७ लाख रु किंमतीचे विविध कंपन्यांचे ९० टायर चोरी केले आहेत. याबाबत शहापुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद झाला आसुन पंधरा दिवस उलटुन ही चोरांचा तपास लागला नसल्याचे दुकानाचे मालक प्रशांत भेरे यांनी सांगितले आसुन शहापुर तालुक्यात विशेषता शहरी भागात चो-यांचे प्रकार वाढले आहेत. सदर घटना रोखन्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवुन या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालन्याची मागणी परीसरातुन होत आहे
शहापुरची तहान भागनार
विचारमंथन वृत्तसेवा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर
तालुक्याची तहान भागवू शकणाऱ्या इगतपुरी
तालुक्यातील १९२ कोटी खर्चाच्या भावली
धरणातून पाणी घेण्याच्या योजनेला तांत्रिक
मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही योजना
मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल
पडल्याचे मानले जात आहे
इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून ग्रीड
पद्धतीने आणि गुरुत्वाकर्षणावर आधारित
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या धर्तीवर ही
पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे.
स्टेम वॉटर डिस्ट्रब्यिुशन प्रा. लि. कंपनी आणि
राज्य सरकार भागिदारी तत्त्वावर ही
योजना राबवणार आहे. १९२ कोटींतील
सरकारचा निम्मा वाटा आदिवासी योजनेतून
उपलब्ध करून देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आधीच मान्यता दिली आहे.
या योजनेला नुकतीच तांत्रिक मान्यता
देण्यात आली असून ही योजना देखभाल व
दुरुस्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी
व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहित
धरण्यात आला आहे. यामुळे शहापूर
तालुक्यातील टँकरग्रस्त, टंचाईग्रस्त व
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या आदिवासी
जनतेस अल्पदरात पाणी उपलब्ध करून देण्याच्या
दृष्टीने योजनेचे निमव्यावसायिक स्वरूप,
योजनेचा आवाका लक्षात घेता ही योजना ३०
वर्षांसाठी माणशी ७० लिटरने संकल्पित
करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचे तांत्रिक
मंजुरी देताना स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेमुळे शहापूर तालुक्यातील माळ, दांड
सारख्या दुर्गम भागातील गावांसह वाशाळ,
खर्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव
अशा दोन लाख वस्तीच्या २०६ गाव-
पाडयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
मार्गी लागणार आहे. या योजनेत समावेश
करण्याबाबत संबधित ग्रामपंचायतींचे ठराव
आधीच झाले आहेत.
Thursday, 24 November 2016
५० हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक
पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना ५० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जमीनी संदर्भात शिवाजी दावभट यांनी ५० लाखाची लाच मागितली होती.
अँटी करप्शन ठाणे शाखेने कारवाई केली असुन गेल्या २९ ऑगस्ट २०१६ पासुन दावभट यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले असुन अँटी करप्शन शाखेने तपासणी केली होती. त्यांनंतर २० सप्टेंबर२०१६ व २४ नोव्हेंबर२०१६ रोजी तपासणी झाल्यावर साफळा रचुन प्रांत अधिकारी शिवाजी दावभट, नायबतहसीलदार सतिश मानिवडे व वाहन चालक जयेश पाटील यांना रंगेहाथ पकडले.
पालघर तालुक्यातील सालवड गावतील एका पारशी कुटुंबाच्या ६० वर्षापूर्वीच्या वेगवेगळ्या चार जमिनीच्या प्रकरणाचे निकाल गेले काही महिने अडकून ठेवण्यांत आले होते. ही प्रकरणे निकालात काढण्याठी दावभात यांनी ५० लाख रूपयांची मागणी केली होती. दावभट यांना देण्यात आलेल्या रक्कमेत ३ लाख रूपये खरे होते तर, ४७ लाख रूपये खोट्या नोटा होत्या. कार्यालयात हि ५० लाख रुपयाची रक्कम स्वीकारताना शिवाजी दावभाट यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आले. हे वृत्त समजताच पालघर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपजिलहधिकारी कार्यालया जवळ उपस्थित झाले व फटाके वाजऊन दावभट यांच्या विरोधात घोषणा दिल्या. दावभट यांना अटक केली असुन, त्यांची चौकशी सुरु आहे.
ग्रामसेवकांचा संप: ग्रामीन कामकाज ठप्प
ग्रामसेवकांचा संप: ग्रामीन कामकाज ठप्प
आसनगांव प्रतिनिधी / प्रशांत गडगे
७ नोव्हेंबर पासुन राज्यभरातील ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांनासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसल्या मुळे राज्यभरातील ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट पसरला आसुन ग्रामिन भागातील प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे.
ग्रामविकासासाठी ग्रामपंचायती या ग्रामिन व्यवस्थेचा कणा मानल्या जातात. अनेक शासकिय योजना, शासनाची भुमिका ग्रामस्थांन पर्यंत पोहचवण्याचे मुख्य काम ग्रामसेवक करीत आसतात त्यामुळे ग्रामसेवकांना शासन आणि जनते मधला दुवा संबोधन्यात येते परंतु याच ग्राम सेवकांच्या विविध मागण्या शासन दरबारी आनेक वर्षापासुन प्रलंबीत आसल्याने राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. राज्य भरातील सुमारे २२ हजार ग्रामसेवक या संपात सहभागी झाले आसुन गेल्या काही दिवसापासुन ग्राम पंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे.शासनाने ग्रामसेवकांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढुन ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत करावा आशी मागणी होत आसुन या संपामुळे ग्रामपंचायती ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
Wednesday, 23 November 2016
शिक्षण विभागाची शोकांन्तीका
प्रशांत गडगे / विचारमंथन
आमचे पत्रकार मित्र भरत उबाळे यांची *शाळाबाह्या विद्यार्थांकडे शिक्षणाधिकार्यांची डोळेझाक* या माथळ्या खाली प्रसिध्द झालेली बातमी आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यांत झनझनीत अंजन घालनारी आहे. खर तर ही बातमी वाचुन धक्काच बसला. देशाला स्वतंत्र मिळुन सहा दशके लोटली तरी ग्रामिन भागात शिक्षणाचे बरेचशे प्रश्न अजुन अनुत्तरीत आसल्या खंत वाटते.
या बातमीत त्यांनी पिवळी शासकिय अश्रमशाळे बाहेर रएका बांधकामावर रोंजदारीवर काम करनार्या दहा वर्षीय सागर आणि आई बहिन मामा यांच्या रोजीरोटी साठी चाललेल्या कसरतीवर प्रकाझोत टाकला आहे. शासनाच्या सर्व शिक्षण हक्क व सर्वशिक्षा आभियनाचा फोलपणा यात उघड होत आहे.
काही महीन्यापुर्वी शहापुर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या फिरती प्रयोगशाळा उपक्रमाच्या रौप्य मोहत्सवी स्मरणीका प्रकाशनाच्या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे शहापुरात आले होतो. आतिशय साध्या पध्दतीने साजर्या झालेल्या या पत्रकार परीषदेत शिक्षणमंत्र्यांनी शाळाबाह्या विद्यार्थांच्या प्रश्नावर शासन गंभिर आसुन शिक्षण बाह्या विद्यार्थी दाखवा हजार रुपये मिळवा आशा योजनेची घोषना केला केली होती. शिक्षण विभागाला एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणा पासुन वंचीत राहु नये यासाठी कडक आदेश दिले होते. पण काही दिवसानंतर नेहमी प्रमाणे शिक्षण मंत्र्यांची ही घोषणा हवेत विरली त्याचे भिषन वास्तव शासकिय अश्रमशाळा पिवळीच्या दारातच पाहायला मिळाले. धुळे येथिल शाळाबाह्य विद्यार्थी सागर राजु जाधव (वय १०, रा.टिकी,ता.जि.धुळे) या बालका मजुरी करण्याची वेळ येन्यासारखे दुर्दैव तरी काय ? शाळाबाह्य मुले दाखवा हजार रु मिळवा या घोषनेला या शाळेतील शिक्षक,मुख्यधापक, आधिक्षकांनी काळे फासल्याचे या मुळे जाहिर झाले आसुन शासन शाळाबाह्य मुले आणि सर्व शिक्षण हक्क , बाल मजुरी या प्रश्नांबाबत किती गंभिर आहे याचा प्रत्यय आला.
शहापुर तसा आदिवासी दुर्गम तालुका त्याात तालुक्याचा भौगोलीक विस्तार मोठा आसल्या मुळे बराचसा भाग शहापुर तालुका मुख्यालया पासुन चाळीस ते पन्नास किमी परीसरात विघुरलेला आहे. त्यात बेरोजगारी जास्त आसल्यामुळे भात शेती व शेती पुरक उद्योगांवर येथील जनतेचा उदरनिर्वाह चालतो. तालुक्यात निसर्गसंपदा मुबलक आसल्यामुळे आदिवासिंची संख्या लक्षणीय आहे. परंतु शिक्षणाच्या बाबतीत थोडासा मागासच राहिला आहे. शहरी भाग वगळता ग्रामिन भागात शिक्षणाची परीस्थिती बेताचीच आहे. एकीकडे पष्टे पाडा शाळेचा डिजीटल शाळा पँटर्न राज्यात जरी हिट आसला तरी शहापुर तालुक्यातील अर्धा वर शाळेची पटसंख्या पाहता चिंता वाटते. आसो बेरोजगारीने हैरान झालेला या तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी वर्ग रोजंदारी साठी विशेष करुन विटभट्टी, बांधकाम या ठिकाणी कुटुंबासहित स्थलांतरीत होत आहे. यात बाल मजुरांचे प्रमाण लक्षणीय आसुन सागर सारख्या आनेक निरागस बालकांचे भविष्य घडण्या आधिच उधवस्त होत आहे. एकी कडे येथील राजकीय मंडळी शोणंन शिप मधे बिझी आसुन पाणी वाटप,चिवडा वाटप किंवा एखाद्या आदिवासी वाडीवर पोटभर जेवन देवुन पक्ष प्रवेश देत आसतांनाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत वाढदिवस किंवा पदनियुक्यांच्या बँनर बाजीत हजारो रुपयांचा चुराडा करीत आहेत. पण सामाजिक भान म्हणुन शाळाबाह्य, मुले बालमजुरी या प्रकाराला आळा घालन्यासाठी प्रयत्न किंवा जनजागृती करतांना दिसत नाही ही खंत आहे. शिक्षण व्यवस्थे बद्दल न बोललेले बरे, कागदे रंगवन्यात मशगुल आसलेल्या या बाबुंनी शाळेच्या व्हरांड्यात बालमजुरी करनारा सागर सारखे निरागस जीव दिसु नये म्हणजे शोकांतीका आहे. नोटा बदलन्या साठी नव्हे तर देश बदल्यासाठी रांगेत उभेे राहनार्या सुसंस्कृत तरुणांणी तरी बालमजुरी व शिक्षण हक्क कायदा व सर्व शिक्षण आभियाना कडे लक्ष्य देण्याची गरज आहे.
Tuesday, 15 November 2016
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न
शहापुर/ प्रशांत गडगे
माऊली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी बालदिनाचे औचित्य साधुन शहापुर तालुक्यातील बालकांनसाठी बाल मेळाव्याचे आयोजन केले होते. या बालमेळाव्याला शहापुरकरांनी उत्फुर्त प्रतिसाद देत विविध कार्यक्रमांचा मनमुराद अनंद लुटला.
या मेळाव्याला शेकडो बालकांनसह पालकांनानी हजेरी लावत विविध कार्यक्रमांचा अस्वाद घेतला. या विशेष करुन विविध
लहान मुलांना आवडणारे खेळ, डान्स, जादूचे प्रयोग,बोलक्या बाहुल्या असे विविध कार्यक्रम साजरे झाले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन अंजु अरोरा नेत्या भाजपा,श्रीकांत गायकर जिल्हा अध्यक्ष,भाजयुमो.अरुण कासार,भास्कर जाधव उपजिल्हा अध्यक्ष भाजपा, शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष,सुधीर तेलवणे, विवेक नार्वेकर , गुरुनाथ भोईर , हिरा शेठ थेराणी,विजय देशमुख गौतम गोडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
Posted via Blogaway
Monday, 14 November 2016
भिवंडीत कार्यकर्ता मेळावा संपन्न
भिवंडीत मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाचा कार्यकर्ता मेळावा .
विचारमंथन LIVE वृत्तसेवा
भिवंडी शहरात रविवारी सायंकाळी ६•०० वाजता गरीब नवाज हाॅल , चौहान काॅलनी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुनील बसाखेत्रे, मनसे प्रदेश ऊपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मदन(अण्णा )पाटील रोजगार स्वयंरोजगार चे सरचिटणीस संजय लोणकर , ऊपाध्यक्ष महेंद्र बैसाणे , चिटणीस देवेंद्र ढमढेरे, ठाणे जिल्हा संघटक शैलेश बिडवी , मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत , तालुका चिटणीस शरद नागावकर , रोजगार विभागाचे ऊप जिल्हा संघटक राकेश वारघडे , मनसे ऊपजिल्हासचिव रवि विशे , मनसे तालुका संघटक संतोष पाटील , वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष म्हात्रे , तालुका ऊपाध्यक्ष हनुमान वारघडे , विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष कुलेश तरे , महिला सेनेच्या शहर ऊपाध्यक्षा मधुमाला गड्डम ई. मान्यवर ऊपस्थित होते . या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे शहर संघटक नजीर शेख, ऊपशहरसंघटक मुजम्मिल खान , शहर सचिव अब्दुल्ला मोमीन, शफीक अन्सारी , वसीम कुरेशी , फारूक मोमीन , सादीक खान , अशरफ खान , पप्पू खान यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नेमणूकांचे पत्र देऊन रोजगार स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सेनेचे तालुका सचिव परेश चौधरी यांनी केले . कार्यक्रमास मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते ऊपस्थित होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांजनोली नाक्यापासून गरीब नवाज हाॅलपर्यंत दूचाकी वाहने व रिक्शा , कार, जीप यांची रॅली आयोजित केली होती. मनसेचा झेंडा लावलेली वाहने व गळ्यात मनसेचा मफलर घातलेले तरूण मोठ्या संख्येने रॅलीत असल्यामुळे सारे वातावरण मनसेमय झाले होते . यावेळी मार्गदर्शन करताना सुनील बसाखेत्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजक नजिर शेख व त्यांचे सहकारी यांना धन्यवाद दिले व रोजगार स्वयंरोजगार विभाग बेकार तरूणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भिवंडी शहरात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ४६८ तरूणांना नोकरी मिळाली . यापुढेही असे मेळावे घेऊन तरूणवर्गास संधी ऊपलब्ध केली जाईल असे वचन त्यांनी दिले. यावेळी बोलताना प्रदेश ऊपाध्यक्ष डी.के.म्हात्रे यांनी भिवंडी शहरात असलेल्या समस्यांचा ऊल्लेख करून निवडून गेलेले नगरसेवक फक्त स्वतःचा विचार करतात. शहर सुधारणा करीत नाहीत. अशा नगरसेवकांना घरी बसविण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन केले. यावेळी मदन(अण्णा) पाटील व महेंद्र बैसाणे यांनीही मार्गदर्शन केले.
Sunday, 13 November 2016
ट्रक विद्युत टाँवरला धडकला: एक ठार
ट्रक विद्युत टाँवर ला धडकला : एक ठार
# मुंबई नासिक महामार्गा वरची वाहतुक काही काळ ठप्प
आसनगांव / प्रशांत गडगे
मुंबई नाशिक हायवे वरील आसनगांव नजीक वेहळोली फाटा येथे सकाळी नव च्या सुमारास माल वाहतुक करनारा ट्रक टाटा पावर च्या विद्युत टावर ला धडकल्या मुळे टावर माहामार्गावर कोसळुन मुंबई नाशिक वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.
नाशिक वरुन मुंबई च्या दिशेने जानार्या ट्रकला आसनगांव जवळ आपघात झाला. सदर ट्रक (MH.46.AR 5873)आसनगांव वेहळोली फाट्या जवळ आला आसता महामार्गा शेजारी आसलेल्या टाटा पावर च्या विद्युत टावर ला अदळल्या मुळे टावर माहामार्गावर कोसळुन वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेत ट्रक चालक राकेश गुप्ता (वय २६, रा. नेपाल) हा जागीच ठार झाला तर क्लिनर यशवंत चव्हान (वय २४) किरकोळ जखमी झाला आहे. जखमी क्लिनर ला उपजिल्हा रुग्नालय शहापुर येथे उपचारा साठी दाखल केले आसुन मुंबई नाशिक महामार्गाची ची देखभाल व दुरुस्ती नावात करोडो रुपये टोल वसुली करनार्या ब्रुक फिल्ड कंपनी च्या भोंगळ व अडमुठे धोरना मुळे पडघा ते कसारा दरम्यान अपघातांच्या घटनांन मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यात माहामार्गाला पडलेले खड्डे सदर कंपनी आजुन भरले नसुन ठिकठिकाणी दिलेले सर्विस रोड ना दुरुस्त झाले आहेत व माहामार्गाला दिशादर्शक फलक व संरक्षक कठडे नसल्या मुळे वाहन चालक व प्रवाशांना साठी हा रस्ता मृत्युचा सापळा ठरत आहे. करोडो रुपयांची टोल वसुली करुन सदर कंपनी प्रवासी व वाहनचालकांन साठी काळ ठरत आसुन अपघातांन मधे मृत्यु पावलेल्यांच्या वारसाला कंपनी ने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आता जोर धरीत आहे.
Thursday, 10 November 2016
विनय सहस्रबुध्देंनी दत्तक घेतले विहीगांव
भाजप प्रवक्ते विनय सहस्रबुध्दे व भाजप नेते रवीशेट पाटील
विनय सहस्रबुध्देनी दत्तक घेतले विहीगांव
विचारममंथन LIVE न्युज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते प्रवक्ते तथा रामभाउ म्हळगी प्रबोधनीचे अध्यक्ष विनय सहस्रबुध्दे यांनी शहापुर तालुक्यातील आतिशय दुर्गम समजल्या जानार्या विहिगांव या आदिवासी खेड्याला दत्तक घेतले आसल्याचे नुकताच जाहिर केले.
शहापुर हा तालुका ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका आसुन क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. आतिशय दुर्गम आसलेल्या या तालुक्याका आजुन विकासापासुन वंचितच राहीला आहे. इथला आदिवासी समाज आजही जंगल उपजिवीकेवर आपला चरीतार्थ चालवत आसुन विकासापासुन कोसो दुर राहीला आहा. कसारा विभागातील अत्यंत दुर्गम समजला जानारे विहीगांव ही पाच आदिवासी पाड्यांची वस्ती आसुन रस्ते, पाणी , विज या यासारख्या प्राथमिक सुविधाही या गावात पोहचल्या नाहीत. आतिशय मागास आसलेले हे गांव भाजप नेते विनय सहस्रबुध्देयांनी दत्तक घेतले आसुन आगामी काळात येथे रस्ते पाणी विज आशा मुलभुत सुविधा तर उपलब्ध करुन देवुच पण त्या बरोबर इथल्या आदिवासिंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करनार आसल्याची माहीती भाजप चे विधान सभा क्षेत्र अध्यक्ष रवी पाटील यांनी सा. विचारमंथन ला दिली. या आधी ही शहापुर तालुक्यातील खरीवली सो हे गांव आमदार रामनाथ मोते यांनी खासदार कपील पाटील यांनी सापगांव हे गांवदत्तक घेतले आहे
Posted via Blogaway
आधार प्रतिष्ठानची माणुसकी भिंत
आज 'आधार प्रतिष्ठान, शहापुर' ह्या सेवाभावी संस्थेने, 'नको असलेल्या वस्तू द्या, आणि ज्यांना हव्या आहेत त्यांनी त्या वस्तू घेऊन जा' हा अकोला जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेने राबविला जात असलेला "माणुसकीची भिंत" ह्या उपक्रमाचा शुभारंभ, शहापुर शहरात केला.या प्रसंगी संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार बाळ जगे, शिवसेना ठाणे ग्रामीण, उपजिल्हा प्रमुख सन्मा. शंकर खाडे, शहापुरच्या नगराध्यक्षा योगिता धानके, राष्ट्रवादीचे अविनाश थोरात, शिवसेनेचे किरण सोकांडे,भाजपचे
अशोक इरनक, रवि पाटील, भाजपा महिला आघाडीच्या अलका झंवर,पत्रकार वसंत पानसरे, जितू अधिकारी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी, शहरातील बहुतेक नागरिकांच्या घरात अतिरिक्त वस्तूचा साठा होत असून त्या वस्तू द्यायच्या कोणाला? हा प्रश्न पडतो, अशा वेळी ह्या नागरिकांना 'माणुसकीची भिंत' चा आधार मिळतो. आपल्या घरात अतिरिक्त पडून राहिलेल्या वस्तू गरजवंतांकडे पोहोचविण्याचे काम ही "माणुसकीची भिंत" करते. हा लोकोपयोगी उपक्रम शहापुरात प्रथमच 'आधार प्रतिष्ठान' कडून राबविला जात असून, ह्याचे अनुकरण शहापुर तालुक्यातील इतरही सेवाभावी संस्थांनी करून, समाजात 'माणुसकी'चे दर्शन घडवावे असे प्रबोधन उपस्थित मान्यवरांनी केले.
उपक्रमाचे आयोजन आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश घुमरे, यांचेसह सुरेंद्र साळवी, प्रदीप पितळे, समीर शेख यांनी केले.
खाजगी रुग्णालयांनी नोटा स्वीकाराव्यात -जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर
खाजगी रुग्णालयांनी नोटा स्वीकाराव्यात
ठाणे येथे रुग्णांच्या मदतीसाठी हेल्पडेस्क
अडचणीतील रुग्णांनी संपर्क साधावा
--- जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर
ठाणे दि १०: ठाणे शहरातील काही खाजगी रुग्णालये रुग्णांकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारत नसल्याने रुग्णांची मोठी कुचंबना होत आहे अशा तक्रारी येत आहेत. मा. मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांनी या नोटा स्वीकारण्याबाबत स्पष्ट सुचना देऊनही काही खाजगी रुग्णालयांमध्ये जर रुग्णांची अडचण होत असेल तर त्याच्या मदतीसाठी तातडीने येथील सिव्हील रुग्णालयांत हेल्प डेस्क सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.
काल सह्याद्री अतिथिगृह येथे देखील वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत रुग्णांच्या गैरसोयीचा मुद्दा चर्चिला गेला होता. आणि यावर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सामान्य रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून पाचशे व हजाराच्या नोटा ११ नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत स्वीकाराव्यात अशा सुचना खाजगी रुग्णालयांना केल्या होत्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्फी पाटील यांच्या नियंत्रणाखाली एक हेल्पडेस्क सुरु करण्यात आला असून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कांबळे ( ९८२३१७६४४२) त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती माकोडे( ९४२२२२४०४६,८६५२८०८८,०२२-२५४७२५८२) या हेल्पडेस्कचे काम पाहत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांच्यावर यासंदर्भात समन्वयाची जबाबदारी सोपविली असून रुग्ण आठवा त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पडेस्कच्या संपर्कात राहावे व घाबरून जाऊ नये असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे
लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण
शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...
-
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांड...
-
प्रशांत गडगे/शहापुर शहापुर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंडन पाडा येथिल स्मशान भुमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली...
-
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न शहापुर/ प्रशांत गडगे मा ऊ ली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंद...