Monday, 14 November 2016

भिवंडीत कार्यकर्ता मेळावा संपन्न

भिवंडीत मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाचा कार्यकर्ता मेळावा .

विचारमंथन LIVE वृत्तसेवा

भिवंडी शहरात रविवारी सायंकाळी ६•०० वाजता गरीब नवाज हाॅल , चौहान काॅलनी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुनील बसाखेत्रे, मनसे प्रदेश ऊपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मदन(अण्णा )पाटील रोजगार स्वयंरोजगार चे सरचिटणीस संजय लोणकर , ऊपाध्यक्ष महेंद्र बैसाणे , चिटणीस देवेंद्र ढमढेरे, ठाणे जिल्हा संघटक शैलेश बिडवी , मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत , तालुका चिटणीस शरद नागावकर , रोजगार विभागाचे ऊप जिल्हा संघटक राकेश वारघडे , मनसे ऊपजिल्हासचिव रवि विशे , मनसे तालुका संघटक संतोष पाटील , वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष म्हात्रे , तालुका ऊपाध्यक्ष हनुमान वारघडे , विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष कुलेश तरे , महिला सेनेच्या शहर ऊपाध्यक्षा मधुमाला गड्डम ई. मान्यवर ऊपस्थित होते .        या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे शहर संघटक नजीर शेख, ऊपशहरसंघटक मुजम्मिल खान , शहर सचिव अब्दुल्ला मोमीन, शफीक अन्सारी , वसीम कुरेशी , फारूक मोमीन , सादीक खान , अशरफ खान , पप्पू खान यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नेमणूकांचे पत्र देऊन रोजगार स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सेनेचे तालुका सचिव परेश चौधरी यांनी केले . कार्यक्रमास मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते ऊपस्थित होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांजनोली नाक्यापासून गरीब नवाज हाॅलपर्यंत दूचाकी वाहने व रिक्शा , कार, जीप यांची रॅली आयोजित केली होती. मनसेचा झेंडा लावलेली वाहने व गळ्यात मनसेचा मफलर घातलेले तरूण मोठ्या संख्येने रॅलीत असल्यामुळे सारे वातावरण मनसेमय झाले होते .                                     यावेळी मार्गदर्शन करताना सुनील बसाखेत्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजक नजिर शेख व त्यांचे सहकारी यांना धन्यवाद दिले व रोजगार स्वयंरोजगार विभाग बेकार तरूणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भिवंडी शहरात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ४६८ तरूणांना नोकरी मिळाली . यापुढेही असे मेळावे घेऊन तरूणवर्गास संधी ऊपलब्ध केली जाईल असे वचन त्यांनी दिले. यावेळी बोलताना प्रदेश ऊपाध्यक्ष डी.के.म्हात्रे यांनी भिवंडी शहरात असलेल्या समस्यांचा ऊल्लेख करून निवडून गेलेले नगरसेवक फक्त स्वतःचा विचार करतात. शहर सुधारणा करीत नाहीत. अशा नगरसेवकांना घरी बसविण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन केले. यावेळी मदन(अण्णा) पाटील व महेंद्र बैसाणे यांनीही मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...