नोटा बदलन्यासाठी ग्राहकांची तारांबळ :बँकांनमधे प्रचंड गर्दी
विचारमंथन LIVE न्युज नेटवर्क
काळ्या पैसा आळा घालुन भ्रष्टाचारा आवर घालुन अर्थव्यवस्थेला नवसंजिवनी देण्यासाठी सरकारने चलनातुन पाचशे व हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्याने जुन्या नोटा बदलुन घेण्यासाठी ग्रामिण भागात ग्राहकांनी सकाळ पासुनच बँकांनमधे गर्दी केली. त्यात नविन चलनी नोटा बँकांना प्राप्त न झाल्यामुळे बँक कर्मचार्यांन सहित ग्राहकांची एकच तारांबळ उडाली.
काल सकाळ पासुन खरेदी करीता आलेल्या ग्राहका कडुन कोणताही व्यापारी पाचशे आणि हजार रुपयाची नोटा घेऊन सामान द्यायला तयार नव्हता त्यामुळे अनेकांची पंचायत झाली. काल तालुक्यातील काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली तर काहींनी ओळखीच्या ग्राहकांना उधार सामान देवुन ग्राहकांची नड भागवली.मेडीकल,ज्वेलर्स आणि काही दुकानदारांनी आपल्या दुकानात शंभर रुपयाचा तुटवडा असल्या मुळे कोणीही पाचशे, हजार रुपयाचे सुट्टे रुपये मागु नये असे फलक लावले असल्याने.खेड्या पाड्यावरील ग्राहकांना सामान खरेदी करता आले नाही.तर रेल्वे स्टेशन आणि पेट्रोल पंपावरही शंभर रुपयांचा तुटवडा भासत असल्याने पाचशे रुपयाची नोट देउन गाडीमध्ये ग्राहकाला कमीत कमी तीनशे रुपयाचा पेट्रोल विकत घ्यावे लागत होते.हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या हॉटेल समोर पाचशे हजार रुपयाच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत असे फलक लावले आहेत. त्यामुळे शंभर पन्नास च्या चलनी नोटांन शिवाय बाजारात कोणताही व्यवहार होत नसल्यामुळे आज सकाळी बँका उघडताच ग्राबकांनी बँकांन मधे प्रचंड गर्दी केली. अपेक्षीत गर्दी मुळे बँक कर्मचारी जरी सावध आसले तरी नवीन चलनी नोटा उपलब्ध नसल्यामुळे बँक कर्मचार्यांची पंचायत झाली आसली तरी प्रत्येक ग्राहक केवळ दोन हजार रुपयाच्या सुट्या नोटा ग्राहकांना उपलब्ध होत होत्या.
एटीएम मशिन बंद
सरकारने आचानक पाचशे व एक हजार रु. चलनी नोटा बंद केल्याने काल बँक अंतर्गत कामकाजासाठी बंद होत्या व नवीन चलनी नोटा उपलब्ध नसल्या मुळे एटीएम मशिन ही बंद आसल्या मुळे ग्राहकांचे आधिकच हाल झाले आसले तरी किरकोळ वादाची प्रकरणे वगळता सर्वच नागरीकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आसल्याचे जाणवते आहे.
No comments:
Post a Comment