Thursday, 10 November 2016

खाजगी रुग्णालयांनी नोटा स्वीकाराव्यात -जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर

खाजगी रुग्णालयांनी नोटा स्वीकाराव्यात

ठाणे येथे रुग्णांच्या मदतीसाठी हेल्पडेस्क

अडचणीतील रुग्णांनी संपर्क साधावा

--- जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर 

ठाणे दि १०: ठाणे शहरातील काही खाजगी रुग्णालये रुग्णांकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारत नसल्याने रुग्णांची मोठी कुचंबना होत आहे अशा तक्रारी येत आहेत. मा. मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांनी या नोटा स्वीकारण्याबाबत स्पष्ट सुचना देऊनही काही खाजगी रुग्णालयांमध्ये जर रुग्णांची अडचण होत असेल तर त्याच्या मदतीसाठी तातडीने येथील सिव्हील रुग्णालयांत हेल्प डेस्क सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.
काल सह्याद्री अतिथिगृह येथे देखील वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत रुग्णांच्या गैरसोयीचा मुद्दा चर्चिला गेला होता. आणि यावर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सामान्य रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून पाचशे व हजाराच्या नोटा ११ नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत स्वीकाराव्यात अशा सुचना खाजगी रुग्णालयांना केल्या होत्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्फी पाटील यांच्या नियंत्रणाखाली एक हेल्पडेस्क सुरु करण्यात आला असून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कांबळे ( ९८२३१७६४४२) त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती माकोडे( ९४२२२२४०४६,८६५२८०८८,०२२-२५४७२५८२) या हेल्पडेस्कचे काम पाहत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांच्यावर यासंदर्भात समन्वयाची जबाबदारी सोपविली असून रुग्ण आठवा त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पडेस्कच्या संपर्कात राहावे व घाबरून जाऊ नये असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे


No comments:

Post a Comment

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...