Monday, 14 June 2021

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण


 शहापुर /प्रशांत गडगे
शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळे तालुक्यात दिलासादायक वातवरण आहे. परंतु ओसरलेल्या दुसर्या लाटेत लसिकरणाचा वेग वाढवुन जास्तीत नागरीकांना सुरक्षीत करुन संक्रमन आटोक्यात आणन्या साठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे.त्यासाठी जि.प.ठाणे व आरोग्य विभाग शहापुर या दोन्ही मार्फत आज 15 जुन रोजी शहापुर तालुक्यातील 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण करण्यात येनार आहे.

ठाणे जिल्हा परीषदेचे विशेष कार्यकारी आधीकारी भाऊसाहेब दांडगे यांनी मध्यंतरी शहापुर तालुक्यातील गोठेघर कोविड सेंटर ला भेट दिली होती या वेळी शहापुर तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या संदर्भात सुचना केल्या होत्या त्या अनुशंघाने, जिल्हा आरोग्य आधिकारी मनिष रेंघे, गटविकास आधिकारी आशोक भवारी व तालुका आरोग्य आधिकारी डाँ तारुलता धानके यांनी  ठाणे जिल्ह्यातील पहिलाच ग्रामपंचायत प्रशासन शिक्षण विभाग,महिला बालकल्यान विभाग, यांच्या सहकार्यातुन  एकाच दिवसात 25 आरोग्य उपकेंद्रात लसिकरणाचा मोठी मोहीम हाती घेतली आहे.यात 45 वर्षावरील व्यक्तींना लसिकरण करण्यात येनार आसुन प्रत्येक उपकेद्रात 100 लसी उपलब्ध करुन देण्यात येनार आहेत. ग्रामपंचीयती जनजागृती करण्यात.येनार आहे.तसेच प्रत्येक उपकेंद्रात 100 व्यक्तीचे लसिकरपुर्ण करनार्या उपकेंद्रातील कर्मचार्यांचा सत्कार पंचायत समिती सभापती जगन पष्टे यांच्या हस्ते करण्यात येनार आहे.

Friday, 11 June 2021

कुंडन च्या स्मशान भुमिचे पत्रे उडाले:उघड्यावर अंत्यसंस्कार

प्रशांत गडगे/शहापुर

शहापुर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंडन पाडा येथिल स्मशान भुमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे.स्मशान भुमीवरचे पत्रे उडाल्या मुळे पावसाळ्यात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास अडचणी येत आहेत. तसेच उघड्यावर अंत्यसंस्कार केल्या मुळे मृतदेहांची हेळसांड होत आसुन या स्मशान भुमीवरचे पत्रे लवकरच बसवण्यात यावे आशी मागणी होत आहे.

Saturday, 29 May 2021

प्रफुल हमरे यांची निवड

प्रफुल हमरे यांची निवड


विचारमंथन वृत्तसेवा (प्रशांत गडगे)
शहापुर तालुक्यातील आसनगांव येथील माध्यमिक विद्यालय आसनगांव येथे शिक्षक म्हणुन कार्यरत आसलेले प्रफुल हमरे यांची श्री कृष्ण सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित पळसुंडा ता.मोखाडा,जि .पालघर  मा.आमदार श्री किसन‌ कथोरे साहेब माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शासन मान्यताप्राप्त संस्थेच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.हि निवड पाच वर्षासाठी आसुन शिक्षक म्हणुन विद्यालयात काम करण्याचा आनुभव आसल्यामुळे त्यांना सदर शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिशय दुर्गम भागातएखाद्या शिक्षण संस्थेला संस्था चालवन्यास अडचणी येत आसतात परंतु प्रफुल हमरे यांचा या परीसरात आसलेला दांडगा लोकसंपर्क पाहता अतिशय कमी वयात हे पद भुषवण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आसनगांव परीसरातुन त्यांचे सर्वत्र आभिनंदन केले जात आहे.

Thursday, 20 May 2021

आसनगांव ग्रामपंचायत दिवाळखोरीच्या मार्गावर ??


#भ्रष्ट्राचाराचा ठपका आसलेल्या ग्राम विकास आधिकार्यांनी दप्तर पळवले
#माहितीआधिकाराचे अनेक अर्ज प्रलंबित
शहापुर/प्रशांत गडगे

शहापुर  तालुक्यातील एकेकाळची सधन म्हणुन ओळखल्या जानार्या आसनगांव ग्रामपंचायतीला सध्या उतरती कळा लागली आहे. आनेक समस्यांनीग्रस्त आसलेल्या या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागगरीकांना प्राथमिक सुविधा मिळवन्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक बाजु ही कमकुवत होत आसल्याने ही ग्रामपंचायतीचा कारभार डबघाईस आला आहे.त्यात भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे उघडकिस आल्याने ग्रामपंचायतीची अब्रु चव्हाट्यावर आली आहे.

शहापुर तालुक्यातील झापाट्याने शहरीकरण होत आसलेले शहर म्हणुन आसगांव कडे पाहीले जाते. सुमारे विस हजार लोकसंख्या आसलेल्या या गावात सतरा सदस्यांची ग्रामपंचायत आहे.वार्षीक दोन ते आडीच कोटी या ग्रामपंचायतीचे उपन्न आहे तर पन्नाच्या वर कर्मचारी या ग्रामपंचायतीत काम करीत आहे एकेकाळी तालुक्यातली श्रिमंत, व सधन ग्रामपंचायत म्हणुन या ग्रामपंचायतीची ओळख होती पण गेल्या काही वर्षात या ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याने हि ग्रामपंच्यायत सध्यामितीस आर्थिक डबघाईस आली आहे.अचानक उपन्नात झालेली घट, आणी आनागोंदी कारभार यामुळे ग्रामपंचायत लवकरच दिवाळ खोरीत निघते का काय आसा प्रश्न नागरीक विचारत आहे.तर ग्रमपंचायत सदस्य ही कामकाजात सक्रीय नसल्याने ग्रामपंचायत कारभाराचा विचका झाला आसुन त्याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे.

#भ्रष्ट्राचारी ग्रामसेवकांनी दप्तर पळवले

आसनांव ग्रामपंचायती मध्ये गेल्या पाच.ते दहा वर्षात मोठ्या प्रमानावर भ्रष्ट्राचार करण्यात आला, काही सामाजिक कार्यकत्यांनी या भ्रष्टाचारा विरोधाच जाब विचारला व माहीती काढली असता तत्कालीन ग्रामसेवक एच व्ही जाधव व बाळा पाटील यांनी सरपंच व इतरांशी परस्पर संगन मत करुन लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याची आनेक प्रकरणे उघड झाली आहेत,या प्रकरणांच्या चौकश्या पुर्ण होऊन लाखो रुपयांच्या अपहाराचा दोन्ही ग्रामसेवकावर ठपका ठेवन्यात आला आहे.  एच व्ही जावध या ग्राम विकास आधिकार्यवर सध्या सेवेतुन निलंबनाची कारवाई केली आहे तर ग्रामविकास आधिकारी बाळा पाटील व सरपंच यावर अपहारा प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल आसुन पाटील हे निलंबित आहेत, या दोन्ही ग्राम विकास आधिकार्यांनी आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन ग्रामपंचायती चे दप्तर अनाधिकृत रित्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला माहीती आधिकारात आलेल्या आर्जावर माहिती देण्यास बर्याच अडचणी येत आहे.त्यामुळे माहीती आर्ज उत्तर  देतांना ग्रामपंचायत अर्जदाराला सदरचे दप्तर कार्यालयात उपलब्ध नसल्याचे कारण देत पंचायत समितीला पत्र व्यवहार केल्याचा पत्र देत आहे. त्या मुळे आसनगांव ग्रामपंचायतीत सध्या माहीती आधिकाराचे शेकडो प्रलंबीत आहेत, त्यामुळे या ग्राम विकार आधिकार्यांकडे वर्ष पडुन आसलेले दप्तर ताब्यात घेवुन फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

#पाणी टंचाई ने आसनगांकर हैरान

आसनगांवाची वाढती लोकसंख्या पाहता आसनगांवात ग्रामपंचायतीला आसनगांवातील सर्व वार्ड मध्ये पाणी पुरवठा करने अशक्य झाले आहे. त्यामुळे काही वार्डात सात ते आठ दिवसानंतर एक दिवस पाणी आसा नित्यनेम ठरला आहे.परंतु यातही तांत्रीक अडचणीमुळे काही विभागात पंधरा दिवस पाण्यासाठी नागरीकांना वाट पाहावी लागत आहे. त्यातच मोटार जळने, पाईप लाईन फुटने आशा कारनांमुळे पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आसल्यामुळे आसनगांवातील नागरीक त्रस्थ झाले आहेत.त्यात आनेक वर्षानंतर एकही पाणी योजना ग्रामपंचायतीला आणता आली नसल्याने आसगांवातली पाणी टंचाई आगामी काळात भिषन रुप धारण करनार आल्याचे चित्र दिसते आहे.

#टंचाई आराखड्यातल्या पैशाचा हिशोब गुलदस्त्यात

ठाणे जिल्हा परीषदे कडुन दरवर्षी शहापुर तालुक्यातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजुर केला जातो. यामध्ये आसनगांव पुर्व व पश्चिम या दोन विभागा साठी मागच्या वर्षी विस लाख तर चालु वर्षी चाळीस लाख रुपये निधी मंजुर झाला आहे. परंतु हा निधी कुठे खर्च केला जातो याची माहीती नागरीकांवा मिळत नाही.त्यामुळे याचा हिशोब गुलदस्त्यातच ठेवला जातो का आसा सवाल नागरीक विचारत आहेत.

#विज वितरणन विभागाची लाखो रुपयांची थकबाकी

आसनगांव ग्रामपंचायतीचा आर्थिक डोलारा कोसळला आसल्यामुळे पाणी पुरवठा विभागाची दानादान उडाली आहे.नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आसनगांव ग्रामस्थांनमध्ये नाराजी पसरली आहे.त्यामुळे अनेक जण पाणी पट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच वसुली होत नसल्यामुळे विज वितरन कंपणी चे अंदाजे तिसते पस्तीस लाख रुपये ग्रामपंचायती कडुन थकीत आहेत, त्यामुळे वसुलीसाठी विज वितरण कंपणी ही पाणी पुरवठ्याचे मिडट सिल करीत आसते. त्यामुळे एकंदरीत आसनगावच्या पाणीपुरवठ्याची आवस्था दयनिय झाली आहे.

#कर्मचार्यांच्या पगारातही अनियमितता

आसनगांव ग्रामपंचायतीत सध्या 55 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, त्यामुळे उत्पन्न घटलेल्या आवस्थेत या कर्मचार्यांच्या पगाराच्या लाखो रुपयांचा भार ग्रामपंचायतीवर पडला आहे.आधिच दिवाळ खोरीची टांगती तलवार आसलेल्या या ग्रामपंचायतीत गेल्या काही वर्षापासुन कर्मचार्यांचा पगार ही अनियमित स्वरुपात दिला जात आसल्याने अनेक वेळा कर्मचारी काम बंद आदोलन करीत आसतात.

सभापती पद फक्त शोभेसाठी

शहापुर पंचायत समितीच्या सभापती पदी वर्षभरा पुर्वी आसनगांव पंचायत समिती गणातुन निवडुन आलेल्या रेश्मा मेमाने यांना पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान करण्यात ाले परंतु गेल्या वर्षभारात त्यांनी कोणतीच कारवाई किंवा भरघोस काम आसनगांव साठी केले नसल्याने आसनगांवाला पहिल्यांदाचसभापतीचा मान मिळाला खरा, पण कोणतीच काम झाले नसल्यामुळे हे पद फक्त आसनगावकरांसाठी शोभेचो बाहुले ठरले आसुन या विषयी आसनगांन ग्रामस्थांनमध्ये नाराजी पसरली आहे.

-----------------------------------

ग्रामसेवकांवी दप्तर पळवल्याची काही कल्पना नाही, तसे ग्रामपंचायतीने ही कळविले नाही,सबंधित प्ररकणाची माहीती घेवुन कळवतो.

आशोक भवारी
गटविकास आधिकारा
पं.स.शहापुर
------------------------
गेल्या वर्षभरा पासुन काही तत्कालीन ग्राम विकास आधिकार्यांनी दप्तर ग्रामपंचायतीत जामा केले नाही, या बाबत पंचायत समितीचे विस्तार आधिकारी महाले यांना कळविले आसुन त्यांच्या कडुन कारवाईस कसुर होत आसल्याने माहीती आधिकारा च्या अर्जांना उत्तरे देतांना अडचणी निर्मान होत आहेत.

शरद फर्डे
प्रभारी ग्रामसेवक
ग्रामपंचायत आसनगांव
------------------------------

ग्रामपंचायत दफ्तर पळवन्याची बाब गंभिर आसुन कायदेशिर गुन्हा आहे, तरी सबंधित ग्रामविकास आधिकार्यांवर गुन्हा दाखल होवुन ग्रामपंचायतीने दफ्तर ताब्यात घेने गरजेचे आहे.

प्रविन उमवने
नागरीक

Wednesday, 19 May 2021

नंदकुमार मोगरे यांचे दात्रुत्व: मुलीच्या वाढदिवसानिमित्त 300 स्टिमर, व 1000 मास्क चे वाटप

नंदकुमार मोगरे यांचे दात्रुत्व
मुलीच्या वाढदिवसानिमित्त 300 स्टिमर, व 1000 मास्क चे वाटप
प्रशांत गडगे
विचारमंथन वृत्त सेवा शहापुर

सध्या राज्यभर करोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकुळ घातला आहे.हजारो जन या लाटेत बाधीत झाले आहेत, त्यामुळे शासकिय यंत्रनेवर या रुग्णांना उपचार करण्यास तान येत आसुन शासकिय साधन सामुग्री ही कमी पडत आहेत. त्यातच कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदार संघात पारनेर येथे स्वतंत्र शरद पवार आरोग्य मंदीर नावाने कोविड सेंटर सुरु केले आसुन हजारो रुग्ण या कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.याच कोवीड सेंटर ला शहापुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष, तथा शेतकरी विकासमंच चे अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी आपली मुलगी नेहा हिच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथील कोविड सेंटर ला 300 वाफेच्या मशिन व एक हजार मास चे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. या आधी त्यांनी असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातुन कौतुक होत आसुन यापुठे ही आसेच उपक्रम सुरु ठेवनार आसल्याचे मोगरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Monday, 10 May 2021

लसिकरणासाठी "कँप्चा कोड" ठरतोय अडथळा:कोविंन अँप मधील तांत्रिक चुकांमुळे शहापुरकरांच्या हक्काच्या लसींवर उपर्यांचा डल्ला

कोविंन अँप मधील तांत्रिक चुकांमुळे
शहापुरकरांच्या हक्काच्या लसींवर उपर्यांचा डल्ला

लसिकरणासाठी "कँप्चा कोड" ठरतोय अडथळा


शहापुर/प्रशांत गडगे

शहापुर तालुक्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरीकांनसाठी शेंद्रुन आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय शहापुर येथे लसीकरनाला सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रावर लस घेण्यासाठी  कोविंद अँप वर नोंदनी व स्लाँट बुक करने अनिवार्य आहे. त्यात शहापुर तालुक्यात अनेक विभाग दुर्गम आहेत, काही ठिकाणी साध्या इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत तर दुसरी कडे कोविंन अँप मधील तांत्रीक अडचणीमुळे लसिकरनासाठी नोंदनी करणे स्लाँट बुक करतांना नाना अडचणींचा सामना करावा लागत आसल्याने इथल्या स्थानिकांना लसिकरणात प्राधान्य न मिळता उपर्यांनीच शहापुर तालुक्याच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारल्याचे चित्र दिसत आहे.या बाबत लवकरच सुधारना करण्याची मागणी पत्रकार प्रशांत गडगे यांनी तालुका आरोग्य आधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्यात आसलेलेल्या लसीच्या तुडवड्यामुळे शहापुर तालुक्यात सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच 18+ वयोगटातील तरुणांना लसिकरना साठी आँनलाईन नोंदनी करुन स्लँट बुक करने आनिवार्य आसल्याने  शहापुर तालुक्यातील हक्काच्या लसींवर मुंबई,वसई विरार,ठाणे या शहरी भागातील नागरीकांनी डल्ला मारल्याने तालुक्यात आधिच असंतोष पसरला आहे.त्या कोविंन आँप वर सध्या स्लँट बुक करतांना कँप्चा कोड विचारत आसल्याने हा कँप्चा कोड टाकतांना आनेकांची भांबेरी उडत आसुन बहुसंख्य वेळा कँप्चा कोड टाकुन ही चुकीचा दाखवला जातो, कधी कधी टाईप केलेला कोड दिसतच नाही , त्यात दोनशे तिनशे लसीसांठी संपुर्ण जिल्हा व जिल्हा बाहेरील लोक प्रयत्न करत आसल्याने पंधरा ते तिस सेकंदा मध्ये स्लाँट बुक होत आहे. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडत आसुन कोविन आँप मधील अनेक त्रुटीमुळे लसीकरनाची नोंदनी करतांना अडचनी येत आहेत.प्रामुख्याने स्लाँट बुक करतांना कँप्चा कोड टाईप करण्यातच बराचसा वेळ निघुन जात आसल्यामुळे स्लाँट बुक होत नाही, तरी शासनाने याचा विचार करुन कँप्चा कोड टाकण्याचे अँप्शन बंद करुन नागरीकांना स्लाँट बुक करणे सहज सोपे कसे होईल याकडे लक्ष देेे गरजेचे आसुन कोविन अँप मधुन कँप्चा कोड काढुन टाकण्याची मागणी दिलेल्या निवेदनात  केली आहे.

Friday, 7 May 2021

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य केंद्रांना मदत

विचारमंथन वृत्तसेवा 
शहापुर तालुक्यात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आसुन, दररोज शेकडो रुग्ण कोरोना ने बाधित होत आहेत.एकी कडे रुग्णांची संख्या वाढत आसतांना, दुसरी कडे आरोग्य विभागा मार्फत विविध उपाय योजना सुरु आहेत.दि. 7मे रोजी तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपला वाढदिवस अत्यंत्य साध्या पध्दतीत साजरा करुन आरोग्य विभागातील शेंद्रुन, वासिंद,खर्डी,टेंभा, शेणवा सह इतर आरोग्य केंद्रांन साठी पल्स आँक्सिमिटर, थर्मामिटर गन, व आरोग्य कर्मचारांविषयी कृतज्ञता म्हणुन अन्नदान, व बिस्किट वाटप करुन साजरा करण्यात आला.तर याच वेळी शिवसेना पंचायत समिती सदस्य दशरथ भोईर यांनी शेद्रुन आरोग्य केंद्रा साठी पाच हजाराची रोख मदत केली.
              शहापुर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा दस-र्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेकडो नागरीकांना कोरोनाची लागन होत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ही परीस्थिती आसल्याने व रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत आसल्याने या रुग्णांना खाटा उपलब्ध करुन देने, इंजेक्शन उपलब्ध करुन देने, आँक्सिजन व्हेन्टिलेटर उपलब्ध करुन देण्यासाठी मा.आमदार पांडुरंग बरोरा सुरुवाती पासुन सक्रीय काम करीत आहे.एकी कडे रुग्ण सेवा देत आसतांनाच, प्रशासनाशी पत्रव्यवहार, दुरध्वनी द्वारे संपर्क करुन आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आनुन देत आहेत,तर काही सुरु आसलेल्या कामे यांवर देखरेख ठेवुन लवकरात लवकर ही कामे पुर्ण करण्यासाठी ही प्रयत्न करीत आहे. त्यांच्या मागणी नुसार शिवसेनेच्या वंदनिय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातुन सेमी कार्डियाक रुग्णवाहिका शहापुर तालुक्याला मिळाली आसुन या आरोग्य कक्षाचे शहापुर तालुका अध्यक्ष मिलिंद देशमुख आणी टिम च्या माध्यमातुन शेकडो रुग्णांना या रुग्णवाहीकेने सेवा दिली आहे. तसेच पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापुर तालुक्याला पाच आँक्सिजन काँन्सलेटर दिले आसल्याने अँक्सिजन लेवल कमी झालेल्या रुग्णांना याचा फायदा होत आहे.मा. आमदर पांडुरंग बरोरा, शिवसेना जेष्ठ नेते काशिनाथ तिवरे, व तालुक्यातील शिवसैनिक यांचे करोना काळातअडचणीत सापडलेल्या नागरीकांनसाठी कार्य सुरु आसुन वैद्यकीय मदत कक्षा कडुन राहुल भोईर, वैभव गंधे आनिल मानिवडे, मोहन कंठे, पृथ्वी आधिकारी,पँडी मोकाशी, सुरेंद्र तेलवने आदि कार्यकर्ते काम करीत आहेत.तर उपसभापती पद्माकर वेखंडे, गणेश राऊत, प्रशांत खर्डीकर, बाळु विशे,स्वप्निल भेरे, दिपक लकडे,विकास चौधरी,आविनाश साबळे, अरुण आधिकारी, सागर देशमुख आदि पदाधिकार्यांनी वाढदिवसा निमित्त मदतीचे वाटप केले.

वाढदिवसा निमित्त भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेश

मा.आमदार पांडुरंग बरोरा यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवत शहारुर नगर पंचायत मधील प्रभाग 13 व14 मधील भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद केणे या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.

Monday, 19 April 2021

आसनगांवात पुन्हा अग्नितांडव :सुहान आँरोसोल कारखाना जळुन खाक




लाखो रुपयाची वित्तहनी
प्रशांत गडगे
शहापुर तालुक्यातील आसनगांव औद्योगिक वसाहतीतील कृष्णा पाँलिमर्स या कारखाना आगीत भस्मसात झाल्याची घटना ताजी आसतांनाच रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास आसनगांव येथिल राध्येशाम इंडस्ट्रीय काँम्पेक्स मधील सुहान आँरोसोल काँसस्मेटिक या कंम्पनीला आग लागुन मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नसली तरी करोडो रुपयांची वित्त हनी झाली आहे.

आसनगांव औद्योगिक वसाहतीत आग लागन्याच्या घटनांंमध्ये वाढ झाली आसुन काल रात्री सौंदर्य प्रसाधने बनवण्याचे काम करनार्या सुहान आरोसोल या कारखान्यात रात्री आकरा साडे आकराच्या सुमारास आग लागुन मोठ्या प्रमानात वित्त हनी झाली आहे. या कारखान्यात सौंदर्य प्रसाधाने बनवण्यासाठी लागनारे प्लास्टिक चा कच्चा माल, आनेक रसायने, मशनरी, सह सगळाच कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला आसुन काही तासातच कारखाना मालकाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे कल्याण व ठाणे, भिवंडी येथिल आग्निशामक दलाचे जवान व ग्रामस्तांच्या अथक प्रयत्ना नंतर ही आग आटोक्यात आली.शहापुर तालुक्यात आग्निशामक यंत्रना नसल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील आग लागल्यास आग आटोक्यात आणन्यासााठी स्थानिक वाँटर टँकरवाले कौतुकास्पद काम करीत आहेत.तर घटनेची माहीती मिळताच माजी आमदार पांडुरंग बरोरा, जि.प. सदस्य मधुकर चंदे , शहर प्रमुख प्रविन कदम आदिंनी घटना स्थळाला भेट देवुन पाहनी केली.

Friday, 16 April 2021

सावद येथील कोविड सेंटर सुरु करा ; शहापुर तालुक्यातील नागरीकांची मागणी


शहापुर/प्रशांत गडगे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  शहापुर तालुक्यासह ठाणे जिल्ह्याल ग्रामिन  भागातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची मोठी अडचण निर्माण होत आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने भिवंडीतील सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय उभारले असून, तेथे ८१८ बेड आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. मात्र, उद्घाटनाच्या २० दिवसानंतरही हे रुग्णालय बंद असल्याने रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शहापुरात सध्या शंभर खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु जरी करण्यात आले आसले तरी या ठिकाणी पुरेशी व्यवस्था नसल्या कारणाने रुग्णांना ठाणे उपचारा साठी जावे लागत आहे. नागरिकांच्या या गैरसोयीची दखल घेवुन हे कोविड जिल्हा रुग्णालय सुरु करण्यात यावे आशी मागणी शहापुरातुन जोर धरीत आहे. तसेच त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व औषध पुरवठा करावा, अशी मागणी ही आनेक संस्था व राजकिय पक्ष करीत आहे.

आरोग्य कर्मचारी-डॉक्टर अभावी रुग्णालय बंद...

भिवंडी तालुक्यातील सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयात एकूण २ लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत बनविण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात ३६० महिला ३७९ पुरुष ऑक्सीजन बेड असून तर ८८ अतिदक्षता बेड, ज्यात विभागात २० व्हेंटिलेटर , २० बायपॅक व ४० हाय फ्लो नेझल कॅनुला ऑक्सिजन थेरपी असे सर्व सोयीसुविधा असलेले एकूण ८१८ बेड आहेत. अशा सर्व सोयी सुविधा असलेले हे भव्य जिल्हा कोविड रुग्णालयात शहापुर, मुरबिड, वरप, व भिवंडी येथिल रुग्णांसाठी सुविधा होण्यासाठी हे रुग्णालय जिल्हा प्रशासनाने उभारले आहे. मात्र, उद्घाटन होऊन २० दिवसांनातरही हे रुग्णालय बंद अवस्थेत आहे. १० डॉक्टर आणि काही आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांवर आर्थिक संकट...

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संकटात नागरिकांना कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यातच आता कडक निर्बंधांमुळे येथील नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे हे रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Sunday, 28 March 2021

ठाणे जिल्हा सहकारी बँकेची निवडनुक रंगतदार ठरनार;पडवळ यांना प्रकाश वरकुटेंचे कडवे अव्हान


प्रकाश वरकुटे विरुध्द इंद्रजीत पडवळ लढत चुरशीची ठरनार

विचारमंथन न्युज/प्रशांत गडगे

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या होऊ घातलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत शहापुरातुन प्रकाश वरकुटे निवडणुक रिंगणात उतरले आहेत. महाविकास  परिवर्तन फँनल मधुन  प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेच्या राखीव मतदार संघातुन वरकुटे ही निवडणुक लढवत असुन एक टर्म संचालक राहिलेले इंद्रजित पडवळ यांन समोर त्यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.
       दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या आगामी संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. 21 जागांसाठी ही निवडणुक होत असुन येत्या 30 मार्च रोजी मतदान होणार आहे. शहापुरात सेवा व विविध कार्यकारी संस्थांमधुन 68 मतदार असुन या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या मतदार संघातुन प्रकाश नारायण वरकुटे हे पहिल्यांदाच निवडणुक रिंगणात उतरले आहेत. शेणवे विविध कार्यकारी सहकारी संस्थेतुन मतदार प्रतिनिधि म्हणुन ठराव झालेल्या प्रकाश वरकुटे यांनी गेल्या काही दिवसात मतदारांशी संपर्क साधत आपलेच पारडे जड असल्याचे वातावरण निर्माण केले आहे. वरकुटे यांच्या उमेदवारीमुळे माजी संचालक इंद्रजित उर्फ कैलास पडवळ यांचे अस्तित्व पणाला लागले असून त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिल्याचे चिञ तालुक्यातील राजकीय वर्तुळात पहावयास मिळते आहे.  दरम्यान प्रकाश वरकुटे यांच्या उमेदवारीला माजी संचालक इंद्रजित पडवळ यांनी छाणनी वेळी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. फम निवडनुक आधिकारी यांनी प्रकाश वरकुटे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याने पडवळ यांची डोकेदुखी आणखीनच वाढली होती. शिवाय जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वात जास्त जाळे असलेल्या शहापूर तालुक्यात या दोघांमध्ये काटे की टक्कर पहावयास मिळणार असून अवघ्या जिल्ह्याचे लक्ष्य   या लढती कडे लागले आहे. प्रकाश वरकुटे यांना विजयाची खात्री आसुन उद्या होनार्या मतदान प्रक्रीयेत मतदार आपले बहुमुल्य मत कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहने औच्युक्याचे ठरनार आहे.

Friday, 26 March 2021

शहापुर वनपरीक्षेत्रात वणवा भडकला; वन विभागाचे दुर्लक्ष


अवैध्य वृक्षतोड ही जोमात

वनसंरक्षणात जनजागृतीचा अभाव;

प्रशांत गडगे / शहापुर

मागील काही दिवसापासुन शहापुर वनपरीक्षेत्रातील आटगांव साखरोली माहुली, सावरोली, चांदरोटी,चेरपोली परीसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहे. या वणव्यांन मुळे वन संपदा नष्ट होत आसुन मुक्याप्राण्यांना ही अगीची झळ सोसावी लागत आहेत. हे वणवे लावले जातात की आपोआप लागतात याचा शोध घेणे गरजेचे आसुन शहापुर वणपरीक्षेत्रातील अधिकारी याबात कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्यामुळे वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वन विभागाच्या जागृतीअभावी वणवा लागत असल्याने पर्यावरण वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.त्यावर संबंधित विभागाने सखोल प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यावेळी खासगी क्षेत्रातील वणवा लावणाऱ्यावर कारवाई करावी,प्रसंगी जी.पी.आर.एस  प्रणालीचा वापर करून गुन्हेगारास शिक्षा करावी हा उपायही होऊ शकतो.दरवर्षी वणवा लागण्याच्या घटनेत वाढच होताना दिसत आहे. ही अतिशय दुदैर्वी बाब असून, यावर उपाय शोधून पर्याय निवडावा व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळावे, अशी काहीशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधूनही करण्यात येत आहे.वनसंरक्षणात जनजागृतिच्या अभावाने व अधिकाऱ्यांच्या हलगर्जिपणामुळे या विभागात वणवा लागत असल्याचा ठपका वन अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.तसेच सुस्त पडलेल्या वन विभागाने वणव्यांचा विषय गांभिर्याने घ्यावा आशी मागणी होत आहे. 


#कारवाई अभावी धाडस वाढले#

वनविभाग हा वणवा लागलेला भूखंड किंवा परिसर, खासगी मालकीचा आहे हे कारण पुढे करत दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करताना दिसत आहे.वन विभागाच्या जनजागृतीच्या अभावाने डोंगर रांगातील शेतकरी,आदिवासी स्वत:च्या शेतीच्या बांधाला वणवा लावून नामानिराळ राहतो.वनविभाग वणवा लागलेली जागा खासगी असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या ठिकाणी वणवा लावणाऱ्यांचे धाडस वाढत आहे.

#डोंगर भकास झाले#

शहापुर वनपरीक्षेत्रात माहुली डोंगर ताणसा अभयअरांण्यामधे येतो तर आटगांव साखरोली, आवाळे, सावरोली, चेरपोली ते पिवळी पर्यंत मध्ये वनविभागाच्या मालकीचे, काही खाजगी मालकीचे डोंगर भकास झाले आसुन वन विभागासाठी ही शर्मेची बाब आहे.


नेहमीच अश्या प्रकारचे वणवे लागत असल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जागा कोणाची आहे, हे न पाहता वणवा लावणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणीही वन्यप्रेमींनी वनविभागाकडे केली आहे. तालुक्यातील सर्व डोंगररांगा जळून उजाड झाल्यानंतर संबंधित विभागाला जाग येणार असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून, त्वरित संबंधित दोषींवर कारवाई व्हावी,अशी मागणीही इतर स्तरांतूनही करण्यात येत.

##वनकर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करत नाहीत##

शहापुर रेंज कार्यालय अंतर्गत असणारे बहुतांशी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वणवा लावणारांचे मोठ्या प्रमाणात धाडस होत असते.तरी सबंधीत दोषी आधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरन प्रेमी संघटना करीत आहेत.

##शेतकरी,पशुपालक यांचा तीव्र संताप##

या ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो एकर गवताळ प्रदेश जळून खाक झाल्याने शेतीसाठी लागणारे गवत तसेच म्हैस,गाय पाळणारे दुग्धव्यावसायिकांमध्ये वणवा लावणाऱ्याविरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला आहे.तसेच वनविभाग अज्ञातविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने त्यांविरुद्धही मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.

Friday, 19 March 2021

ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर: पहा काय आहे या अर्थ संकल्पात


ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१चा सुधारित आणि २०२१-२२ चा मूळ अर्थ संकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर

 २०२१-२२ चा मूळ अर्थ संकल्प ८५ कोटी ५० लाख ४६ हजार ५००

 उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ समिती सुभाष पवार यांनी सादर केला अर्थसंकल्प

ठाणे दि. १९ मार्च २०२१ :

 ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१ चा सुधारित आणि सन २०२१-२२ चा ८५ कोटी ५० लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ समिती सुभाष पवार यांनी सादर केला. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे,  आरोग्य व बांधकाम समिती सभापती 
कुंदन पाटील, कृषि, पशुसंवर्धन व  दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे , समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार , तसेच सर्व सन्मानीय सदस्य, पंचायत समिती सभापती व सर्व जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित होते. 

करोनाकाळात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विकास विषयक योजना प्रभावीपणे व परिणामकारक राबविण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ असणे आवश्यक असते. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा मुख्यत: राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानावर अवलंबून असतो. माहे मार्च 2020 ते आजतागायत जगभर तसेच भारतात व राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या संसंर्गजन्य आजाराच्या साथ रोगामुळे राज्यशासनाचे उत्पन्न कमालीचे घटले असल्याने पर्यायाने जिल्हा परिषदेचे उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे. तरी देखील सर्व बाबींचा विचार करता सन 2020-21च्या  मूळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत सुधारीत अंदाजपत्रकामध्ये महसूली जमा कमी असली तरी आरंभीच्या शिलकेसह सुधारीत अंदाजपत्रकामध्ये जमेच्या रकमेमध्ये 7.25 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

सन 2020-21 च्या मूळ अर्थसंकल्पात आरंभीच्या शिलकेसह महसूली जमा रक्कम रु.124,59,98,815/-(एकशे चोविस कोटी एकोणसाठ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंधरा मात्र.) इतकी होती. महसूली खर्चाचा मूळ अर्थसंकल्प रक्कम रु.124,59,52,600/-(एकशे चोविस कोटी एकोणसाठ लाख बावन्न हजार सहाशे) एवढया रकमेचा होता. तसेच सन 2021-22 च्या मूळ अर्थसंकल्पात आरंभिच्या शिलकेसह महसूली अपेक्षित जमा रक्कम रु.85,50,94,315/- (पंच्याऐशी कोटी पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार तिनशे पंधरा मात्र.) एवढी धरण्यात आली असून रक्कम रु.85,50,46,500/- (पंचाऐंशी कोटी पन्नास लाख सेहेचाळीस हजार पाचशे मात्र.) एवढा खर्च अपेक्षित धरण्यात आलेला आहे. सन 2021-22 चे मूळ अथंसंकल्पात मागील तीन वर्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाची सरासरी, जमीन महसूल अनुदान, बिगर शेती कर, पाणीपटटी उपकर इ. बाबींचा प्रामुख्याने विचार करुन अपेक्षित जमा दर्शविण्यात आलेली आहे. या  अर्थसंकल्पामध्ये सर्व पंचायत समित्यांच्या उपकर जमा खर्चाचा समावेश  करण्यात आला आहे.

 पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भरीव तरतूद

नविन पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो.  तथापी, देखभाल दुरूस्तीसाठी अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध होतो हे विचारात घेऊन देखभाल दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात स्वतंत्ररीत्या भरीव तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून नादुरूस्त किंवा बंद योजना चालू करून ग्रामिण भागात सुरळीत पाणी पुरवठा उपलब्ध होईल.

जि.प.चा सन  2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ अर्थसंकल्प तयार करतांना म.जि.प. व पं.स. अधिनियमातील तरतूदी  व ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभागाने निर्गमित केलेले शासन निर्णय, अधिसूचनांप्रमाणे जिल्हा परिषद उत्पन्नाच्या ठराविक बाबींच्या 20 % रक्कम पाणी पुरवठा, 20% रक्कम समाज कल्याण, व 10% रक्कम महिला व बालकल्याण विभागासाठी  ठेवण्यात आलेली आहे.  

मागील अनुशेषापोटी सन 2020-21 च्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये समाजकल्याण विभागासाठी रक्कम रु.3,62,09,298/- (तीन कोटी बासष्ट लाख नऊ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मात्र) व महिला व बाल कल्याण विभागास रक्कम रु. 2,55,40,640/- (दोन कोटी पंचावन्न लाख चाळीस हजार सहाशे चाळीस मात्र) इतकी रक्कम देण्यात आलेली आहे.

 दिव्यांगांसाठी 5% निधी
राखीव

दिव्यांगांसाठी 5% निधी राखीव ठेवण्याबाबत शासनाच्या सुचना असल्यामुळे तशी तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असून त्यांनी प्रस्तावित केलेल्या योजनांसाठी निधी वितरण करण्यात आले आहे. याचा फायदा ग्रामिण भागातील दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसाठी होईल. शासन निर्णय दि.18/6/2010 मधील तरतूदीनुसार ई-गव्हर्नन्स योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी ठेवण्यात आला आहे.  ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सन 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदे अंतर्गत जमा व खर्चाची सर्वसमावेशक माहिती मिळण्याकामी संगणक प्रणाली राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 जिल्ह्याच्या विकासाकरीता ठळक नवीन योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

 शिक्षण विभाग 
• पर्यवेक्षण व सनियंत्रणासाठी सॉफ्टवेअर निर्मिती.
• जिल्हा परिषद शाळांमधील विद्युत जोडणी व देयक अदा करणे ( छोट्या ग्रामपंचायतीमधील शाळांकरिता अनुदान देणे)  
• शिक्षण खात्यातील मालमत्तेचे तसेच अभिलेख सर्वेक्षण/संरक्षण व संवर्धन करणे.

 आरोग्य
• महाआरोग्य शिबिर आयोजित करणे.

 ग्रामपंचायत
• ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण कार्यक्रम.

 कृषि

कृषि विभागातर्गत आपत्कालीन परिस्थितीत उपाय योजना करणे.

सन 2021-22 च्या मूळ अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या निरनिराळया विभागांकडील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केला आहे.  ठाणे जिल्हा परिषद ही सामान्य जनांचे हित जोपासणारी जिल्हा परिषद असून, जिल्हा परिषदेचा प्रत्येक सभापती, सदस्य, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा जिल्हा परिषदेसाठी झटत आहे. ही जिल्हा परिषद जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी होईल तसेच माझ्या तळागाळातील बांधवांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असल्याचे श्री.पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.

Tuesday, 9 March 2021

आसनगांव औद्योगिक वसाहतीत अग्नितांडव#कारखाना जळुन खाक




प्रशांत गडगे 

शहापुर तालुक्यातील आसनगांव औद्योगिक वसाहतीत क्रिश्ना प्रमोशन या कारखान्यात पाहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागुन संपुर्ण कारखानाच जळुन खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हनी झाली नसली तरी कारखाना मालकाचे करोडो रुपयांची वित्त हानी झाली आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त आसे की शहापुर तालुक्यातील आसनगांव औद्योगिक वसाहतीतील वेहळोली रस्त्यालगत आसलेल्या क्रिश्ना प्रमोशन  या प्लाँस्टिक ची विविध उपकरणे बनवनार्या कारखान्याला पाहाटेच्या  च्या सुमाराला मोठी आग लागली. या विविध प्लँस्टिकच्या वस्तूचा साठा व उत्पादन करनारा हा कारखाना होता. त्यामुळे मंगळवारी पाहाटे लागलेल्या आगीमध्ये प्लास्टीक वस्तूंनी तात्काळ पेट घेतला आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले होते. यामुळे ही आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती.
आगीची माहिती मिळताच कल्याण, भिवंडी, ठाणे येथील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी  आग्निशामक दलाच्या जवानांचे दुपार पर्यत प्रयत्न सुरु आहेत. या आगीची तिव्रता येवढी प्रचंड होती की आसनगांव व वासिंद पर्यत धुराचे मोठे लोट पसरले होते. या आगीत करोडो रुपयांच्या प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.सदर घटने मुळे  शहापुर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनेचे तिन तेरा वाजले आसुन सदर कारखान्याला आग लागल्या पासुन दिड तास उलटल्यानंतर ही प्रशासना कडुन कोणीतीही मदत उपलब्ध झाली नसल्याने आग वाढत गेली. या वेळी स्थानिकांनी आग आटोक्यात आणन्याचे प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले.अगीचे कारण अजुन स्पष्ट झाले नसले तरी ही आग लागली की लावली गेली या बाबत नागरीक शंका घेत आहेत.शहापुर तालुक्यातील झपाट्याने होनारे नागरीकरण,औद्योगिक वसाहती पाहता शहापुर तालुक्यात आग्निशामक दल आसने गरजेचे आहे.पण जनतेच्या या मागणी कडे शासनाने आजही दुर्लक्ष केले आहे.

Saturday, 27 February 2021

शहापुर नगरपंचायत मतदार याद्यामध्ये आदला बदली;पाचशे च्या वर हरकती दाखल


शहापुर/प्रशांत गडगे

शहापुर नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अंतिम मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, १७ ही प्रभागांत मतदार याद्यांमधे प्रचंड घोळ निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे.  जवळपास शहापुर नगर पंचायतीच्या सर्वच प्रभागांच्या याद्यांमधे मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून, एका प्रभागात राहनारे अनेक मतदार दुसर्या प्रभागात तर इतर प्रभागातील मतदारांना इतरत्र समाविष्ट करण्यात आले आहे. 

शहापुर नगरपंचायत हद्दीत १७ प्रभाग आहेत. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असून, सध्या प्रशासकराज सुरू आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धिकरण करून अद्ययावत करण्याचे काम बीएलओंना देण्यात आले होते. त्यामधे मृतांचे नाव वगळणे, लग्न होऊन गेलेल्यांची नावे वगळणे, नव्याने आलेले व १८ वर्षे झालेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, प्रभाग बदलून गेलेल्यांची नावे शोधणे ही कामे गृहभेटीच्या माध्यमातून बीएलओंना करायची होती. मात्र, ही सर्व कामे घरी बसूनच करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, ज्या प्रभागात जे लोक राहतात, त्या मतदारांना इतर प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट करुन काही जन राजकिय पोळी भाजण्याच्या विचारात आहेत. 

शहरातील जवळपासच्या गावांतील लोकांची नावेसुद्धा नगरपंचायतच्या मतदार यादीत आल्याची चर्चा शहरात आहे. याचा अर्थ बोगस मतदारांचा शिरकाव तर झाला नाहीना, अशी शंका निर्माण झाली आहे. तसेच नुकत्याच झालेले ग्राम पंचायत निवडनुकीत गावांकडे मतदान करनार्या मतदारांची नावे ही नगर पंचायतीच्या यादीत आल्याने याप्रकरणी काही सुज्ञ नागरिकांनी मतदार यादीवर हरकत घेऊन ही गंभीर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती आहे. शहरातील राजकीय वर्तुळात वजन असणारे मतदार याद्यांमधे घोळ करण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. तर काही जणांनी हरकतीची मुदत संपण्याच्या काही तास आधी भाडेकरार करुन नाव नोंदवन्याचा प्रकार केला आहे. काही इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांचा अभ्यास करताना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदार पळवापळवीची बाब निदर्शनास आली असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

शहापुर नगरपंचायतीच्या मतदार यांद्यामध्ये प्रचंड घोळ झाला आसुन हेतुपुरस्कर एका प्रभागा मधुन दुसर्या प्रभागामध्ये भाडेकरार करुन मतदांरांची नावे नोंदवन्यात आली आसुन या विरोधात आम्ही पुराव्यानिशी हरकती घेतल्या आहेत, निवडनुक आधिकारी याची दखल घेवुन कारवाई करतील का? हे आंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर कळेल.
मनोज पानसरे
नागरीक, व हरकतकर्ता

नगरपंच्यायतीच्या प्ररुप याद्यांवर 500 पेक्षा जास्त हरकती प्राप्त झाल्या आसुन निवडनुक आयोगाने यासाठी पंधरा दिवस मुदतवाढ दिली आसुन या हरकतीची शहानिशा केली जाईल
वैभव गारवे
मुख्य कार्यकारी आधिकारी
शहापुर नगर पंचायत

Friday, 26 February 2021

शहापूर पंचायत समितीचे बीडीओ अशोक भवारी सक्तीच्या रजेवर



हनुमंतराव दोडके शहापूर पंचायत समितीचे नवे बीडीओ


२६सदस्यांच्या आंदोलनाला  मिळाले यश!

शहापुर/प्रशांत गडगे

मासिक सभेवर बहिष्कार टाकून बीडीओ अशोक भवारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आज सभापती, उपसभापती सह २६ सदस्य करणार होते उपोषण.


शहापूर-
   शहापूर पंचायत समितीचे सभापती ,उपसभापती व सदस्यांना विश्वसात न घेता मनमानी करीत असल्याचा निषेधार्थ अकार्यक्षम गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी याना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले असून त्याजागी हनुमंतराव दोडके यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
    १५ वा वित्त आयोगाचा आराखडा न बनविणे तसेच सभापती , उपसभापती व सदस्यांना यांना विश्वासात न घेणे अश्या तक्रारी सर्व सदस्यांनी केल्या होत्या. गटविकास अधिकारी अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या बदलीचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमुखाने घेतला होता. परंतु त्यावर कार्यवाही होत नसल्याने सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन पस्टे, गटनेते सुभाष हरड सर, दशरथ भोईर, स्नेहल शिंगे, पद्माकर वेखंडे,एकनाथ भला, प्रकाश वीर, आदींसह सर्व सदस्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची १७ फेब्रुवारी रोजी भेट घेऊन निवेदन दिले होते.
    २६ फेब्रुवारी रोजीच्या शहापूर पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकून उपोषण करण्याचा इशारा सर्व सदस्यांनी निर्णय घेतला होता.
    त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांना २५ फेब्रुवारी रोजी शहापूर पंचायत समितीमध्ये चौकशी साठी पाठवून सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
   त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तात्काळ अशोक भवारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शहापुर पांच्यात समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून हनुमंतराव दोडके यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचे आंदोलन स्थगित करून आजची मासिक सभा घेण्यात आली.

Tuesday, 23 February 2021

आसनगांवात रेल्वे उड्डान पुलाची मागणी


शहापुर/प्रशांत गडगे

शहापुर तालुक्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक आसलेल्या आसनगांव रेल्वे स्थानक परीसराचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच वाढती रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेता या स्थानक परीसरात विविध विकास कामे होने गरजेचे आहे. गेली कित्तेक वर्ष आसनगांव पुर्व व पश्चिम यांना जोडनारा रेल्वेवरील उड्डान पुल नसल्यामुळे आनेक प्रवासी व स्थानिक नागरीकांची गौरसोई होत आहे. प्रवासी आणी ग्रामस्थांनी वारंवार या उड्डानपुलाची मागणी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन यावर दुर्लक्ष करीत आहे.
  नुकताच भिंवडी लोकसभेचे खासदार कपील पाटील व रेल्वेचे मराव्यवस्थापक संजिव मित्तल यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शहापुर तालुक्यातील आसनगांव येथे पुर्व व पश्चिम ला जोडनारा उड्डान पुल नसल्या मुळे आसनगांव परीसरातील आनेक वाहन चालक व चाकरमानी प्रवाश्यांना पुर्वेतुन पश्चिम कडे जान्यासाठी तिन चे चार किमीचा वळसा घालावा लागत आहे. तसेच याठिकाणी एकजुने फाटक आहे तेही बंद केले आसल्याने आनेक प्रवाशी नागरीकांना नाईलाजाने रेल्वे पटरी ओलांडावी लागत आहे. त्यामुळे आनेक अपघात या ठिकाणी होत आसतात. या बाबीची गंभिर दखल घेवुन खा. कपिल पाटील यांनी हा मुद्दा बैठकीत मांडला आसुन याबाबत शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे यांनी निवेदन दिले होते. लवकरच या मुद्दावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी सबंधित रेल्वे आधिकार्यांनी दिले आहे.

Friday, 19 February 2021

शिवसंपर्क आभियाना बाबत शिवसेनेची बैठक; जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी केले मार्गदर्शन



हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते शिवपुजन करुन या बैठकीची सुरुवात करण्यात आली.

शहापुर/प्रतिनिधी

आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडनुकांन मध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे या यशावर हुळुन न जाता महाराष्ट्राच्या काना कोपर्यात  पक्ष बांधनी आणी संघटनात्मकवाढी बरोबर कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने राज्यभर शिवसेने तर्फे शिवसंपर्क आभियान येत्या फेब्रु 23 ते 27 तारखेला संपुर्ण महाराष्ट्र भर राबवन्यात येनार आहे.
              याच निमित्ताने ठाणे जिल्हा ग्रामिन चे जिल्हा प्रमुख मा.श्री प्रकाश पाटील यांनी  शहापुर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेवुन पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले, तसेच आभियाना संदर्भात काही सुचना केल्या. तसेच पदाधिकार्यांनी अपापसातील मतभेद विसरुन एक होवुन एक दिलाने पक्षवाढी काम करण्याचे आहवान कार्यकर्त्यांना केले. शिवसंपर्क आभियाना मार्फत कार्यकर्ते मेळावे,मार्गदर्श शिबिरे, शासनाच्या योजना तळागाळात पोहचवने, आशा विविध गोष्टी केल्या जानार आहेत या बैठकिला तालुका प्रमुख मारुती धिर्डे, माजी आमदार पांडुरंग बरोरा,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रश्मी निमसे,सभापती रेश्मा मेमाने, तालुका संघटक अरुण कासार, काशिनाथ तिवरे चंद्रकांत जाधव,माजी जिल्हा परीषद अध्यक्षा मंजुषा जाधव, किसन भांडे, शिवाजी देशमुख आदि पधाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.तर शिवसेनेचे उपसभापती जिल्हापरीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शहर प्रमुख उपतालुका प्रमुख विभागप्रमुख आदि सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या बैठकीला उपस्थित होते.

Wednesday, 17 February 2021

दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव शासकीय अभिवादन यादीत समाविष्ट



मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक `दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले असून येत्या शनिवारी, दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209व्या जयंतीदिनी राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका येथील शासकीय कार्यालयांमधून जांभेकर यांना अभिवादन करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्याकरीता शासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र उपलब्ध करून दिले जाणार असून त्याकरीता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये विराजमान असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राची निवड करण्यात आली आहे. सदर तैलचित्र सुप्रसिध्द चित्रकर्ती सौ. चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले आहे. 
   मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून संघातर्फे शासनाला धन्यवाद दिले आहेत. दि. 20 रोजी सकाळी 11.00 वाजता पत्रकार संघात देखील जांभेकर यांना अभिवादन करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.

   सदर तैलचित्राचा यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर 1985 मध्ये  SOCIAL REFORMERS OF MAHARASHTRA या नावाचे प्रसिध्द केलेल्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. ते पुस्तक माहिती आणि जनसंपर्क विभागांतर्गत नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येऊन ते कॉपीराईट करण्यात आले आहे. सदर पुस्तक तयार करण्याची जबाबदारी सुप्रसिध्द साहित्यिक दिवंगत श्री.णय. दि. फडके यांच्यावर सोपविली होती. या पुस्तकासाठी महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांची चित्रे तयार करून देण्याचे काम सौ. चंद्रकला कुमार कदम यांच्यावर सोपविले गेले होते. त्यासाठी त्यांना आवश्यक ती संदर्भयुक्त माहिती पुरविण्यात आली होती. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर तसेच इतर समाजसुधारकांची तैलचित्रे दिवंगत श्री.णफडके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली होती. त्या छायाचित्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचेही हे छायाचित्र आहे. ते छायाचित्र त्यावेळी माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे नियुक्त केलेल्या अंतर्गत समितीने अधिकृत म्हणून मान्य केलेले आहे.

   सौ. चंद्रकला कुमार कदम या सुप्रसिद्ध चित्रकर्ती असून त्यांनी भारतीय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेले स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे तैलचित्र तसेच महाराष्ट्र विधान भवनातील महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, दादासाहेब मावळंकर, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, एस. एम. जोशी, गुजरात विधानसभेतील स्वा. वि. दा. सावरकर, मुंबई उच्च न्यायालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, मौलाना अब्दुल कलाम आझाद, लोकमान्य टिळक, सी. डी. देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, शंकर दयाळ शर्मा आदींची तैलचित्रे तयार केलेली आहेत. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, पिंप्री-चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका आदी संस्थांसाठी मान्यवरांची तैलचित्रेही सौ. कदम यांनीच तयार करून दिलेली आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहासाठीही भव्य तैलचित्रे नुकतीच तयार करून दिलेली आहेत.

शहापुरात वनविभागाने साकारलेल्या नक्षत्रवनाची उद्घाटना आधिच दुरावस्था;लाखो रुपयांचा शासननिधी मातीमोल


#वनविभागाचे दुर्लक्ष



शहापुर /प्रशांत गडगे

शहापुर तालुक्यातील मौजे कानविंदे येथे वन विभागा तर्फे स्व. उत्तमराव पाटील वनउद्याची निर्मिती करण्यात आली आहे. 12.10 हेक्टर परीसरात सकारन्यात आलेल्या या नक्षत्रवनाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आसुन हे उद्यान नागरीकांना खुले होण्या आधीच भेसुर झाल्याने शारनाचा लाखो रुपयांचा निधी मातीमोल झाला आसुन  याठीकाणी वन विभागाने केलेली लाखो रुपयांची विकास कामे ठेकेदारांच्या आर्थिक फायद्या साठी होती का ?आसा सवाल शहापुर तालुक्यातील जनता करीत आहे.

शहापुर तालुक्यात वन विभागाकडुन पर्यटनाला चालना देण्यासाठी सन 2015-16 मध्ये सामाजिक वनीकरनातंर्गत वन व वनोत्तर जमिनीवर स्व. उत्तमराव पाटील वनोद्यानाची संकल्पना साकारण्यात आली.गेली पाच वर्ष या ठिकाणी वन विभागा मार्फत विविध विकास कामे करण्यात आली.परंतु सामाजिक वनीकरण कडुन हे उद्यान प्रादेशिक वन विभागाकडे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागल्याने या उद्यानाची दुरावस्था झाली आहे.

        शासनाने चांगला हेतु बाळगुन 12 हेक्टर परीसरात बारा राशिंच्या पंचागाकृती नक्षत्र वनाची निर्मीती केली आहे. या इको फ्रेंडली वनोद्यानात स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड करुन त्यांचे राशी प्रमाने नामकरण्यात आले आहे.तसेच या उद्यानाच्या माध्यमांतुन फळवन, चंपक वन, कदंब वन, चरक वन, लता वन, सारीका वन, आतिथी वन आशा विविध प्रकारच्या उपवनांची निर्मिती केली आहे.तसेच या ठिकाणी लहान मुलांनसाठी बाग खेळनी, जेष्ठांसाठी विश्रांती केंद्र, फिरण्यासाठी पायवाटा आशा विविध संकल्पना घेवुन या उद्यानाची निर्मीती केली आहे.परंतु याची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने शासनाचा हा निधी फक्त ही विकास कामे करनार्या ठेकेदारांच्या फायद्या साठी केला  का आसा सवाल नागरीक विचारत आसुन हे उद्यान लवकरच नागरीकांसाठी सुरु करावे आशी मागणी जनतेतुन होत आहे.


सदर वनो उद्यान आत्ताच प्रादेशिक विभागाकडे हस्तांतरीत झाला आसुन, या ठिकाणी बरेच गवत वाढले होते, ते काढुन उद्यानाची साफ सफाई वनविभागाकडुन काम सुरु आहे.


वसंत घुले

उपवन संरक्षक, ठाणे


सदर उद्यानाची दुरावस्था झाल्याचे आत्ताच कळले,माहीती घेवुन हे उद्यान सुरु करण्यासाठी होनार्या दिरंगाई बाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल.

दौलत दरोडा

आमदार शहापुर

शहापुर पंचायत समितीत सावळा गोंधळ कायम;प्रशासना विरोधात सत्ताधारी एकवटले


अकार्यक्षम बिडीओ अशोक भवारीच्या बदलीची मागणी

प्रशांत गडगे

शहापुर पंचायत समिती मध्ये सध्या विकासकामांची बोंब सुरु आसतांना सत्ताधारी विरोधात बिडीओ यांच्या वादाचा चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. गेल्या दोन तिन महिन्यांपासुन सुरु आसलेल्या या शित युध्दाने आता टोकाची पायरी गाठली आसुन अकार्यक्षम गटविकास आधिकारी आशोक भवारी यांची तत्काळ बदली न झाल्यास मासिक सभेवर बहिष्कार टाकुन आमरण उपोषन करण्याचा इशारा  जिल्हा परीषद अध्यक्ष्या सुषमा लोणे यांना दिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी व दुर्गम तालुका म्हणुन शहापुर तालुक्याची ओळख आहे.पन्नास कि.मी ची परिघ आसलेल्या या तालुक्याच शासनाच्या विविध योजना तळा-गाळा पर्यत पोहचवुन तालुक्याचा सर्वांगिन विकास करण्यासाठी जिल्हा परीषद व पंचायत समिती या दोन यंत्रना महत्वाची भुमिका बजावत आसतांना, शहापुर पंचायत समिती मध्ये गेल्या काही वर्षापासुन सत्ताधारी शिवसेना,राष्ट्रवादी चे पंचायत समिती सदस्य विरोधात प्रशासन आसा कलगीतुरा रंगल्याचे चित्र दिसत आहे. शहापुर पंचायत समितीचे विद्यमान गटविकास आधिकारी आशोक भवारी यांच्या विरोधात दि. 5/11/20 रोजी झालेल्या मासिक बैठकीत सर्व पंचायत समितीचे सभापती उपसभापती व सदस्य यांनी मिळुन आशोक भवारी यांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित करीत चांगलेच फैलावर घेत अकार्यक्षम गटविकास आधिकारी यांची बदली करण्याचा ठराव मांडला होता हा ठराव पुर्ण बहुमताने मंजुर करण्यात आला होता व कारवाई साठी व पुढे ही पाठवण्यात आला होता. परंतु आज मिती पर्यत याठरावार कारवाई नझाल्याने संतप्त झालेल्या सर्व सदस्यांनी नुकताच ठाणे जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेवुन बदली करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास आमरण उपोषनाचा इशारा ही दिला आसल्याने तालुक्याच चर्चेला उधान आले आसुन गटविकार आधिकारी अशोक भवारी हे संपुर्ण कोविड काळात कुठे दिसले नसल्याची चर्चा आहे, तसेच तालुतक्याती ग्रामपंचायती मध्ये वाढत आसलेला भष्ट्रचार, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले ग्रामसेवक व इतर प्रशासकीय आधिकार्यांना पाठिशी घालन्याच काम गट विकास आधिकारी यांनी केले आहे आसा बहुसंख्य पं.स. सदस्यांचा आरोप आहे. तसेच पंचायत समिती सदस्यांना अपमानास्पद वागनुक देणे, आसे  विविध आरोप भवारी यांवर होत आसुन आता प्रशासन आशा अकार्यक्षम आधिकार्याची उचलबांगडी करते का हे पाहने औचुक्याचे ठरेल.एकंदरी या दोन्हीच्या वादामुळे शहापुर तालुक्याचा विकास काहीसा मंदावला आसुन या वादात जनतेची नाहक होरपळ सुरु आहे.

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...