प्रशांत गडगे
शहापुर तालुक्यातील आसनगांव औद्योगिक वसाहतीत क्रिश्ना प्रमोशन या कारखान्यात पाहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागुन संपुर्ण कारखानाच जळुन खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हनी झाली नसली तरी कारखाना मालकाचे करोडो रुपयांची वित्त हानी झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त आसे की शहापुर तालुक्यातील आसनगांव औद्योगिक वसाहतीतील वेहळोली रस्त्यालगत आसलेल्या क्रिश्ना प्रमोशन या प्लाँस्टिक ची विविध उपकरणे बनवनार्या कारखान्याला पाहाटेच्या च्या सुमाराला मोठी आग लागली. या विविध प्लँस्टिकच्या वस्तूचा साठा व उत्पादन करनारा हा कारखाना होता. त्यामुळे मंगळवारी पाहाटे लागलेल्या आगीमध्ये प्लास्टीक वस्तूंनी तात्काळ पेट घेतला आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले होते. यामुळे ही आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती.
आगीची माहिती मिळताच कल्याण, भिवंडी, ठाणे येथील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशामक दलाच्या जवानांचे दुपार पर्यत प्रयत्न सुरु आहेत. या आगीची तिव्रता येवढी प्रचंड होती की आसनगांव व वासिंद पर्यत धुराचे मोठे लोट पसरले होते. या आगीत करोडो रुपयांच्या प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.सदर घटने मुळे शहापुर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनेचे तिन तेरा वाजले आसुन सदर कारखान्याला आग लागल्या पासुन दिड तास उलटल्यानंतर ही प्रशासना कडुन कोणीतीही मदत उपलब्ध झाली नसल्याने आग वाढत गेली. या वेळी स्थानिकांनी आग आटोक्यात आणन्याचे प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले.अगीचे कारण अजुन स्पष्ट झाले नसले तरी ही आग लागली की लावली गेली या बाबत नागरीक शंका घेत आहेत.शहापुर तालुक्यातील झपाट्याने होनारे नागरीकरण,औद्योगिक वसाहती पाहता शहापुर तालुक्यात आग्निशामक दल आसने गरजेचे आहे.पण जनतेच्या या मागणी कडे शासनाने आजही दुर्लक्ष केले आहे.
No comments:
Post a Comment