Sunday, 28 March 2021
ठाणे जिल्हा सहकारी बँकेची निवडनुक रंगतदार ठरनार;पडवळ यांना प्रकाश वरकुटेंचे कडवे अव्हान
Friday, 26 March 2021
शहापुर वनपरीक्षेत्रात वणवा भडकला; वन विभागाचे दुर्लक्ष
वनसंरक्षणात जनजागृतीचा अभाव;
प्रशांत गडगे / शहापुर
मागील काही दिवसापासुन शहापुर वनपरीक्षेत्रातील आटगांव साखरोली माहुली, सावरोली, चांदरोटी,चेरपोली परीसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहे. या वणव्यांन मुळे वन संपदा नष्ट होत आसुन मुक्याप्राण्यांना ही अगीची झळ सोसावी लागत आहेत. हे वणवे लावले जातात की आपोआप लागतात याचा शोध घेणे गरजेचे आसुन शहापुर वणपरीक्षेत्रातील अधिकारी याबात कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्यामुळे वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
वन विभागाच्या जागृतीअभावी वणवा लागत असल्याने पर्यावरण वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.त्यावर संबंधित विभागाने सखोल प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यावेळी खासगी क्षेत्रातील वणवा लावणाऱ्यावर कारवाई करावी,प्रसंगी जी.पी.आर.एस प्रणालीचा वापर करून गुन्हेगारास शिक्षा करावी हा उपायही होऊ शकतो.दरवर्षी वणवा लागण्याच्या घटनेत वाढच होताना दिसत आहे. ही अतिशय दुदैर्वी बाब असून, यावर उपाय शोधून पर्याय निवडावा व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळावे, अशी काहीशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधूनही करण्यात येत आहे.वनसंरक्षणात जनजागृतिच्या अभावाने व अधिकाऱ्यांच्या हलगर्जिपणामुळे या विभागात वणवा लागत असल्याचा ठपका वन अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.तसेच सुस्त पडलेल्या वन विभागाने वणव्यांचा विषय गांभिर्याने घ्यावा आशी मागणी होत आहे.
#कारवाई अभावी धाडस वाढले#
वनविभाग हा वणवा लागलेला भूखंड किंवा परिसर, खासगी मालकीचा आहे हे कारण पुढे करत दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करताना दिसत आहे.वन विभागाच्या जनजागृतीच्या अभावाने डोंगर रांगातील शेतकरी,आदिवासी स्वत:च्या शेतीच्या बांधाला वणवा लावून नामानिराळ राहतो.वनविभाग वणवा लागलेली जागा खासगी असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या ठिकाणी वणवा लावणाऱ्यांचे धाडस वाढत आहे.
#डोंगर भकास झाले#
शहापुर वनपरीक्षेत्रात माहुली डोंगर ताणसा अभयअरांण्यामधे येतो तर आटगांव साखरोली, आवाळे, सावरोली, चेरपोली ते पिवळी पर्यंत मध्ये वनविभागाच्या मालकीचे, काही खाजगी मालकीचे डोंगर भकास झाले आसुन वन विभागासाठी ही शर्मेची बाब आहे.
नेहमीच अश्या प्रकारचे वणवे लागत असल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जागा कोणाची आहे, हे न पाहता वणवा लावणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणीही वन्यप्रेमींनी वनविभागाकडे केली आहे. तालुक्यातील सर्व डोंगररांगा जळून उजाड झाल्यानंतर संबंधित विभागाला जाग येणार असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून, त्वरित संबंधित दोषींवर कारवाई व्हावी,अशी मागणीही इतर स्तरांतूनही करण्यात येत.
##वनकर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करत नाहीत##
शहापुर रेंज कार्यालय अंतर्गत असणारे बहुतांशी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वणवा लावणारांचे मोठ्या प्रमाणात धाडस होत असते.तरी सबंधीत दोषी आधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरन प्रेमी संघटना करीत आहेत.
##शेतकरी,पशुपालक यांचा तीव्र संताप##
या ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो एकर गवताळ प्रदेश जळून खाक झाल्याने शेतीसाठी लागणारे गवत तसेच म्हैस,गाय पाळणारे दुग्धव्यावसायिकांमध्ये वणवा लावणाऱ्याविरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला आहे.तसेच वनविभाग अज्ञातविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने त्यांविरुद्धही मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.
Friday, 19 March 2021
ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर: पहा काय आहे या अर्थ संकल्पात
Tuesday, 9 March 2021
आसनगांव औद्योगिक वसाहतीत अग्नितांडव#कारखाना जळुन खाक
लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण
शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...
-
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांड...
-
प्रशांत गडगे/शहापुर शहापुर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंडन पाडा येथिल स्मशान भुमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली...
-
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न शहापुर/ प्रशांत गडगे मा ऊ ली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंद...