*सार्वजनिक बांधकाम विभागाचा आजब कारभार**
*दहा तासात रस्त्याचे बांधकाम पुर्ण - स्थानिक ग्रामपंचायत न कळवता उरकले काम*
*शाखा आभियंता गोरे यांची माहीती देण्यास टाळाटाळ*
*कामाबाबत नागरीकांच्या तक्रारी*
*प्रशांत गडगे / विचारमंथन वृत्तसेवा*
आसनगांव ग्रामपंचायत हद्दीत नुकताच ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतुन आसनगांव आदिवासी पाडा ते शिवाजी नगर या रस्त्याच्या डांबरी करण व मजबुती करणासाठी सात लाख चाळीस हजार रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. परंतु हे काम करनार्या ठेकेदाराने हे काम घाईघाईत दहा तासात पुर्ण केले आसल्यांने सदर काम निकृष्ट झाले आसल्याच्या आनेक तक्रारी नागरीक करत आहे.
शहापुर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार जगजाहीर आसुन नागरीकांच्या तक्रारी असतांना ही विविध विकासकामे आधिकार्यांच्या आशिर्वादाने बिनादिक्त सुरु आहेत. आसनगांवात ही याच प्रकारे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतुन सुमारे साडेसात लाख रुपयाचे रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु करतांना सदर ठेकेदाराने ग्रामपंचायतीला कोणतीही सुचना न देता दहा तासात घाई घाईने पुर्ण केले तसेच रात्री आठ वाजता शाखा आभियंता उपस्थित नसतांना सदर रस्त्यावर डांबर टाकण्यात आली. या रस्त्याबाबत शाखा आभियंता गोरे यांना विचारले आसता त्यांना या रस्त्याच्या कामा विषयी माहीतच नसल्याची धक्कादायक माहीती मिळाली. वास्तविक कोणतेही विकासकाम करीत आसतांना त्या ठिकाणी सदर विकासकामाशी निगडीड शाखा आभियंत्यांनी उपस्थित आसने गरजेचे आसतांना सदर विकासकामे करतांना ठेकेदाराने मनमानी करुन घाई घाईने काम आटपते घेतल्याने रस्त्याच्या दर्जा विषयी आनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या बाबत सदर कामाचे आंदाजपत्रक, प्रशासकिय मान्यता इत्यादी गोष्टी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी नागरीकांना उपलब्ध करुन देत नाही त्यामुळे निकृष्ट काम करनार्या ठेकेदारांचे फावले आहे आसनगांवातील शिवाजी नगर ते आदिवासी वाडी या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामा बद्दल आसनगांव मनसे सां. बा. च्या आधिकार्यांना जाब विचारनार आसुन आंदोलनाच्या पावित्र्यात आसल्याची माहीती मिळते आहे.
Sunday, 22 January 2017
सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार
Wednesday, 18 January 2017
नोटबंदी ची झळ तमाशांना....
नोटबंदीची झळ तमाशांना..
प्रशांत गडगे
सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांच यात्रा आणि जत्रा भरल्या आहेत. ग्रामीन भागात या यात्रा आणि जत्रांना धार्मिक व पारंपारीक महत्व आसल्याने या जत्रा यात्रांना मोठा प्रतिसाद मिळत आसुन हजारोंच्या लोक गर्दी करीत आसतात. या जत्रेतील आणि यात्रेतील अकर्षण आसनार्या लोककला तमाशा मंडळांना देखील नोट बंदीचा फटका बसला आसुन तमाशाच्या फडांवरची गर्दी कमी झाली आसल्याची माहीती तमाशा मंडळाच्या मालकांनी दिली आसल्याने आधीत नामशेष होत आसलेली तमाशेमंडळे आता आर्थिक संकटात सापल्याचे चित्र दिसत आहे.
शहापुर तालुक्यातील साडेचारशे वर्षांंची परंपरा असलेली ठुणे येथील विठ्ठल-रखुमाईची यात्रा सुरू झाली आहे. नवसाला पावणारा विठोबा प्रसिद्ध असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी असते.शहापूर तालुक्यातील शेणवा-किन्हवली मार्गावरील मळेगाव गावाच्या पुढे असलेल्या ठुणे गावात विठोबा-रखुमाईचे देऊळ आहे. पौष शुद्ध एकादशीला येथे यात्रा भरते. पौष शुद्ध एकादशीला पहाटे श्री विठ्ठल-रखुमाईची विधीवत पूजा करून यात्रेला
प्रारंभ होतो. मंदिरापर्यंत वाजत-गाजत येऊन मुलांना वजनकाटय़ात बसवून त्यांच्या वजनाची केळी किंवा गूळ प्रसाद म्हणून वाटला जातो. तीन दिवस चालनार्या या यात्रेत भावीक भक्त मोठ्या संखेने उपस्थित होतात. या वर्षी या यात्रेत काळुबाळु लोककला मंडळाचा तमाशा आला होता. यात्रेच्या ठीकाणी आशा तमाशांना मोठा प्रतिसाद मिळत आसतो. ग्रामिन भागात लोकप्रिय आसलेल्या या तमाशा मंडळात आनेक प्रकारच्या लोककला सादर केल्या जातात. गावरान ठसका आसलेल्या या तमाशा मंडळाना एकेकाळी मोठी लोकप्रियता मिळाली होती. पण एकविसाव्या शतकात माहीती तंत्रज्ञानाच्या प्रसारनाने टिव्ही, मोबाईल सारखी अत्याधुनिक करमनुकीची साधने बाजारात आल्याने तमाशा सारख्या प्राचिन लोककला काळाच्या ओघात मागे पडल्या. पण आजही यात्रा जत्रांन मधे आनेक तमाशे दाखवले जात आसुन रसिक प्रेक्षकही या तमाशात सादर केल्या जानार्या लोकलांचा मनमुरात अनंद घेतो. तमाशा मंडळांन मुळे आनेक ग्रामिन भागातील लोककलाकारांना रोजगार मिळत आसतो पण बदलत्या काळानुसार आणि स्पर्धेच्या युगात तमाशा मंडळे मागे पडली आसल्याने या लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी याच लोककला मार्फंत ग्रामिन भागातील समाज प्रबोधन केले जात होतो. पण आज ही लोककला डबघाईला आली आसुन काही वर्षात नामशेष होण्याच्या मार्गावर आसल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या उदासीन भुमिके मुळे तमाशा मंडळांना आतिशय तुटपुंजी मदत मिळत आहे.या लोककलाकारांच्या नशिबी सरकारी उपेक्षाच आली आसुन नोटबंदी मुळे तमाशांना येनार्या प्रेक्षकांनमध्ये लक्षणिय घट झाली आहे आहे. यामुळे तमाशांचे काही खेळ तोट्यात करावे लागत आहेत. तमाशात काम करनारे लोककलाकार, तमाशा संच यांचे खर्चातही वाढ झाली आसुन दिवसेंदिवस तमाशा मंडळे चालवने जिकरीचं काम झाले आसल्याची खंत आसुन उपस्थित करुन शासनाने या लोककलाकारांना लक्ष देण्याची गरज आसल्याचे मनोगत काळु बाळु लोककला तमाशा मंडळाचे मालक लोककलावंत विजयकुमार खाडे यांनी दिली.
Monday, 9 January 2017
मुख्यमंत्री साहेब, दिलेल्या अश्वासनांची याद ठेवा..
मुख्यमंत्री साहेब, दिलेल्या अश्वासनांची याद ठेवा..
मागच्या महिन्यात शहापुर तालुक्यात मोठ्या दिमाखात कुणबी महोत्सव पार पडला. हजारो कुणबी समाज बांधवान सहित शहापुर तालुक्यातल्या सगळ्याच समाजबांधवानी या महोत्सवाला हजेरी लावुन महोत्सव यशस्वी केला. त्या राज्याचे दस्तखुद्द मुख्यमंत्री या महोत्सवाच्या समारोपाला हजेरी लावुन गेल्या मुळे शहापुर तालुक्यात आनंदाचे वातावरन आहे. आपल्या पंचवीस मिनिटांच्या भाषनात मुख्यमंत्र्यांनी तालुक्यासह राज्यातील अनेक विषयांवर आपल्या खुमासदार शैलीत हात घातला आसला तरी शहापुरातील सगळेच प्रश्न चुटकीसरशी सुटले आहेत आसे मुळीच नाही.उलट चारीही बाजुंनी आमच्या तालुक्यावर अन्याय होत आसतांनाही आम्ही तुमचे अनंदाने स्वागत केले हा आमचा मोठेपणा आहे.
शहापुर तालुक्यात सध्या महोत्सवांची जोरदार चर्चा सुरु आहे आता कुणबी महोत्सव पार पडला काही दिवसांत आदिवासी महोत्सव होनार आहे मग शहापुर महोत्सव नंतर आगरी महोत्सव हे सगळे महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत आसतांनाच शहापुर तालुक्याचे बरेचशे प्रश्न अनुत्तरीत राहीले आसल्याची खंत नक्कीच वाटते. शहापुर तालुक्याने नेहमीच त्यागाची भुमिका स्विकारली आहे, त्यामुळे शहापुर करांच्या दातृत्वाला आणि संयमाला तोड नाही. आम्ही आसे का म्हणतो याचा उहापोह करतांना काही गोष्टी समजुन घेने अवश्यक आहे. मुंबई ठाणे या सारख्या विशालकाय शहरांची तहान भागवनारी तीन मोठी धरणे शहापुर तालुक्यात आहेत या धरणांन साठी सुमारे चाळीसवर्षा पुर्वी शहापुर तालुक्यातील शेकडो शेतकर्यांच्या हाजारो हेक्टर जमिनी शासनाने संपादित केल्या मोठी मोठी धरणे बांधली. याच धरणांच्या पाण्यावर मुंबई ठाणे यासारख्या मोठ्या शहरांचा विकास झाला. या विकासातुन शासनाला करोडो रुपयांचा महसुल प्राप्त झाला पण आमच्या शहापुर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या सुपिक जमिनी या धरणांन मध्ये बाधीत झाल्या त्या शेतकर्यांच्या मागण्या शासनदरबारी चाळीस वर्ष उलटुन गेल्या नंतरही आजुन प्रलंबीत आहेत त्याच काय..??या नंतर मंबरी शाही आणि नामपाडा आशी अजुन तिन धरणे शासनाने शहापुर तालुक्यात प्रस्थापित आहेत.मागचा अनुभव पाहता या वेळी तालुक्यातला शेतकरी काही प्रमाणात जागृत झाला शारनाने जोर जबदस्ती करुन काही जागा कागदोपत्री तरी संपादित केली आसली तरी शहापुर चा शेतकरी राजा शासनाविरुध्द निकराची लढाई लढतो आहे. मागच्या महिन्यातच त्याचा प्रत्यय काही शासकिय आधिकार्यांना आला. मुंबरी धरणासाठी प्रस्थापित आसलेल्या जमिनीवर काही वनविभागाचे आधिकारी वृक्षतोड व मोजमाफ घेण्यासाठी गेले आसता त्यांना तेथील शेतकर्यांनी मारहान केली. अर्थात या मारहनीचे आम्ही समर्थन करीत नसलो तरी शेतकरी विरुध्द शासन यांचा वाद येवढा विकोपाला जाण्या मागची कारणे शासनाने समजुन घेतली पाहीजेत. शाही धरणा बाबत हीच परीस्थिती स्थिती आहे. भासता धरण बांधतांना शासनाने या धरणातील पाण्यावर काही अरक्षण जाहीर केले होते. यात शहापुर तालुक्यातील शेतकर्यांना सिंचनासाठी डाव व उजवा कालव्याची निर्मिती करणार होते त्यातला उजवा कालवा झाला पण डावा कालव्याचा प्रश्न आजुन अनुत्तरीतच आहे ? हे झाले धरणांबाबत आता मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग सुध्दा शहापुर तालुक्यातुन गेला आहे. या महामार्गाच्या निर्मिती साठी पुन्हा शेकडो शेतकर्यांच्या जमिनी शासनाने काडीमोल किंम्मत देवुन संपादित केल्या, पुढे दोन पदरी महा मार्ग आज चौपदरी झाला त्यासाठी हि काडीमोल भावात जमिनी घेतल्या पुन्हा सहापदरी साठी शासनाने जमीनी संपादित केल्या आहेत. हे कमी की काय याच महामार्गाला लागुन या नंतर मुंबई मनमाड या पेट्रोल लाईन साठी ही शासनाने जमिनी संपादित केल्या. त्यानंतर कोणतीही पुर्वसुचना न देता शासनाने शेकडो हेक्टर जमीनींना १३५ सेक्शन अंतर्गत वन जमिनी घोषीत केल्या या जमिनी आज शेती सोडली तर विशेष काही करता येत नाही. त्यानंतर इकोसेसिंटिव म्हणुन काही क्षेत्र घोषीत केल्याने शेतकर्यांची चहुबाजुने कोंडी झाली आहे. हे कमी की काय म्हणुन शासनाने मुंबई नागपुर समृध्दी महामार्गा साठी शहापुर तालुक्यात पुन्हा नव्याने हजारो हेक्टर जमिनी संपादन करण्याचा घाट घातला आहे. हा नवा संघर्ष शहापुर तालुक्यात जोराने सुरु आहे.शेतकर्यांवर येवढ्या मोठ्या प्रमाणात जमिन संपादित करत आसतांना शासनाने शहापुर तालुक्यातील शेतकर्यांना दिले काय ?? आजही या शेतकर्यांची मुले शासकिय नोकर्यांन साठी शासनाचे उंबरे झिजवतात हे तालुक्याचे दुर्दैव आहे.
सन २०१४ मध्ये अनुसुचीत जनजाती सल्लागार समितीच्या सल्ल्याने तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायन यांनी एक अध्यादेश काढला होता त्यानुसास अनुसुचित जाती जमाती साठी अरक्षीत आसलेल्या तालुक्यात मध्ये क व ड वर्गातील शासकिय भरतीमधे आदिवासींना १०० % अरक्षण देण्यात आले. वास्तविक पाहता शहापुर तालुक्याची लोकसंख्या पाहता ६५% हा बिगर आदिवासी समाज व ३५% लोकसंख्या आदिवासी समाजाची आसतांना गेली अनेक वर्ष या तालुक्याची जातीनिहाय जनगणना न केली गेल्या मुळे हा तालुका अनुसुचित जमाती साठी आरक्षित ठेवला गेला आहे. शासनाच्या या कामचुकार आणी बोट चेपी धोरणांचा फटका शहापुर तालुक्याल ६५% बिगर आदिवासि भुमिपुत्रांना बसला आसुन आपल्या हक्काच्या नोकर्यांनवर पाणी सोडण्याचे वेळ या समाजावर आली आहे. आसो या बाबत आनेक अंदोलने झाली रस्त्यावरच्या लढाया झाल्या शासनदरबारी अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित केला पण शासनाची इच्छाशक्ती नसल्या मुळे शहापुर तालुकावासियांचा हा ही प्रश्न अनुत्तरीतच आहे. ऐवढा सगळा शहापुरकरांचा त्या असतांना शहापुर तालुक्याचा विकास मात्र कागदावरच राहीला आहे. पावला पावलावर येथे संघर्ष करीत आसतांना शहापुर तालुका त्यागाचा,दातृत्वाचा प्रतिक तर आहेच पण तो आता सोशीक तालुका म्हणुन ओळखला जावु नये म्हणुन या ठिकाणी सांगावेसे वाटते मुख्यमंत्री साहेब गेल्या अनेक वर्षात शासनाने आम्हाला दिलेल्या अश्वासनांची याद ठेवा.
Thursday, 5 January 2017
आखेर त्यांना मिळाला हक्काचा रस्ता...
आखेर त्यांना मिळाला हक्काचा रस्ता...
पळसपाडा-शहापुर रस्त्याचा प्रश्न सुटला..
आसनगांव प्रतिनिधी
शहापुर-आसनगांव या दोन शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी आसनार्या पण आसनगांव ग्रामपंचायत हद्दीत येनार्यी पळसपाडा चाळीस पन्नास आदिवासी लोकवस्तीला रस्त्यासाठी गेली तीस वर्ष संंघर्ष करावा लागला. आखेर त्यांच्या या संघर्षाला यश आले आसुन ज्ञानवर्धिनी ट्रस्ट खाजगी प्लाँट धारकांनच्या सांजमस्य भुमीकेतुन या वाडीला कामय स्वरुपी रस्ता मिळाला आसल्याने गेल्या तिस वर्षा पासुन चाललेला हा संघर्ष आता मिटला आहे.
आसनगांव परीसरातील भांरंगी नदी किनारी आदिवासी लोकसंख्या जास्ता आ सलेले पळसपाडा म्हणुन वाडी आहे. ही वाडी आसनगांव व शहापुर या दोन शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी आसल्यामुळे या पाड्याल्या आधिकृत रस्ता नव्हता तसेच या परीसराचा पुरेसा विकास न झाल्यामुळे गेली तिस वर्ष या पाड्यावरील नागरीक एका पायवाटेने प्रवास करुन रस्त्यासाठी संघर्ष करीत होते. पावसाळ्याच्या वेळी तर या रस्त्याच्या अडचणी आधिक भर पडत होती. आखेर ज्ञानवर्धीनीसे संस्थे चे कार्यकारी व विश्वस्त मंडळाचे संचालक बाळा पाटील,दिलीप भोपतराव, शेखर आधिकारी, श्री कुडव सर व खाजगी प्लाँट धारक अरुण कासार व जयेश खंबायत यांनी समाेपचाराची भुमिका घेवुन सदर पळसपाडा नागरीकांच्या तक्रारी ऐकुन घेत सांजमस्याने दहा फुटाच्या रस्त्यासाठी जागा देण्याचे मान्य केल्याने पळसपाडा रहिवासिंचा रस्त्याचा प्रश्न निकाली लागला आहे. यासाठी आसनगांव चे माजी उपसरपंच नितीन चंदे,पत्रकार प्रशांत गडगे,मदन चंदे, शिवाजी चंदे यांना मध्यस्ती केली तर या रस्त्यासाठी सुनिल गंभिरराव, आनिल गंभिरराव यांनी पुढाकार घेतला. तिस वर्षानंतरच्या संघर्षाने का होईना पण रस्ता मिळाल्याने पळसपाड्यातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण
शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...
-
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांड...
-
प्रशांत गडगे/शहापुर शहापुर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंडन पाडा येथिल स्मशान भुमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली...
-
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न शहापुर/ प्रशांत गडगे मा ऊ ली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंद...