नोटबंदीची झळ तमाशांना..
प्रशांत गडगे
सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांच यात्रा आणि जत्रा भरल्या आहेत. ग्रामीन भागात या यात्रा आणि जत्रांना धार्मिक व पारंपारीक महत्व आसल्याने या जत्रा यात्रांना मोठा प्रतिसाद मिळत आसुन हजारोंच्या लोक गर्दी करीत आसतात. या जत्रेतील आणि यात्रेतील अकर्षण आसनार्या लोककला तमाशा मंडळांना देखील नोट बंदीचा फटका बसला आसुन तमाशाच्या फडांवरची गर्दी कमी झाली आसल्याची माहीती तमाशा मंडळाच्या मालकांनी दिली आसल्याने आधीत नामशेष होत आसलेली तमाशेमंडळे आता आर्थिक संकटात सापल्याचे चित्र दिसत आहे.
शहापुर तालुक्यातील साडेचारशे वर्षांंची परंपरा असलेली ठुणे येथील विठ्ठल-रखुमाईची यात्रा सुरू झाली आहे. नवसाला पावणारा विठोबा प्रसिद्ध असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी असते.शहापूर तालुक्यातील शेणवा-किन्हवली मार्गावरील मळेगाव गावाच्या पुढे असलेल्या ठुणे गावात विठोबा-रखुमाईचे देऊळ आहे. पौष शुद्ध एकादशीला येथे यात्रा भरते. पौष शुद्ध एकादशीला पहाटे श्री विठ्ठल-रखुमाईची विधीवत पूजा करून यात्रेला
प्रारंभ होतो. मंदिरापर्यंत वाजत-गाजत येऊन मुलांना वजनकाटय़ात बसवून त्यांच्या वजनाची केळी किंवा गूळ प्रसाद म्हणून वाटला जातो. तीन दिवस चालनार्या या यात्रेत भावीक भक्त मोठ्या संखेने उपस्थित होतात. या वर्षी या यात्रेत काळुबाळु लोककला मंडळाचा तमाशा आला होता. यात्रेच्या ठीकाणी आशा तमाशांना मोठा प्रतिसाद मिळत आसतो. ग्रामिन भागात लोकप्रिय आसलेल्या या तमाशा मंडळात आनेक प्रकारच्या लोककला सादर केल्या जातात. गावरान ठसका आसलेल्या या तमाशा मंडळाना एकेकाळी मोठी लोकप्रियता मिळाली होती. पण एकविसाव्या शतकात माहीती तंत्रज्ञानाच्या प्रसारनाने टिव्ही, मोबाईल सारखी अत्याधुनिक करमनुकीची साधने बाजारात आल्याने तमाशा सारख्या प्राचिन लोककला काळाच्या ओघात मागे पडल्या. पण आजही यात्रा जत्रांन मधे आनेक तमाशे दाखवले जात आसुन रसिक प्रेक्षकही या तमाशात सादर केल्या जानार्या लोकलांचा मनमुरात अनंद घेतो. तमाशा मंडळांन मुळे आनेक ग्रामिन भागातील लोककलाकारांना रोजगार मिळत आसतो पण बदलत्या काळानुसार आणि स्पर्धेच्या युगात तमाशा मंडळे मागे पडली आसल्याने या लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी याच लोककला मार्फंत ग्रामिन भागातील समाज प्रबोधन केले जात होतो. पण आज ही लोककला डबघाईला आली आसुन काही वर्षात नामशेष होण्याच्या मार्गावर आसल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या उदासीन भुमिके मुळे तमाशा मंडळांना आतिशय तुटपुंजी मदत मिळत आहे.या लोककलाकारांच्या नशिबी सरकारी उपेक्षाच आली आसुन नोटबंदी मुळे तमाशांना येनार्या प्रेक्षकांनमध्ये लक्षणिय घट झाली आहे आहे. यामुळे तमाशांचे काही खेळ तोट्यात करावे लागत आहेत. तमाशात काम करनारे लोककलाकार, तमाशा संच यांचे खर्चातही वाढ झाली आसुन दिवसेंदिवस तमाशा मंडळे चालवने जिकरीचं काम झाले आसल्याची खंत आसुन उपस्थित करुन शासनाने या लोककलाकारांना लक्ष देण्याची गरज आसल्याचे मनोगत काळु बाळु लोककला तमाशा मंडळाचे मालक लोककलावंत विजयकुमार खाडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment