समृद्धीचा सर्वात मोठा वाटा शेतकऱ्यांना मिळणार - देवेंद्र फडणवीस
कुणबी समाजाचे प्रश्न नक्कीच सोडवणार
# 20 वर्षे महाराष्ट्राला पुढे नेणारा समृद्धी महामार्ग
आसनगांव प्रतिनिधी/ प्रशांत गडगे
नव्याने होऊ घातलेल्या मुंबई - नाशिक महामार्गामध्ये प्रथमच जमिनी जाणारा शेतकरी समृद्ध होणार असून यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सुतवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर येथे केले . पुढे त्यांनी 200 कोटी रुपये भावोली पाणी योजनेसाठी उपलब्ध करून देणार असून नव्याने होणाऱ्या धरणांसाठी जमिनी घेतल्या तर तेथील जनतेला सर्वप्रथम पाणी देणे बंधनकारक ठरण्याचा कायदा करणार असल्याचे सांगितले . ओबीसी समाजाचे वेगळे मंत्रालय , स्वतंत्र मंत्री लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत , शामराव पेजे महामंडळला या मार्चच्या बजेटपूर्वी 50 कोटींचा निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली . छत्रपतींच्या स्मारकाला झालेले उशीर याचे दुःख आहे , परंतु जगातील सर्वात उंच स्मारक होत असल्याचा आनंद आहे . तालुक्यातील आसनगाव येथील जोंधळे मैदानात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या कोकण स्तरीय कुणबी स्नेहसंमेलनाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहापुरात आले होते . यावेळी त्यांच्या बरोबरच राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फूडकर , खा कपिल पाटील , आ पांडुरंग बरोरा , आ किसन कथोरे , आ नरेंद्र पवार , माजी आ दौलत दरोडा , कुणबी सेना प्रमुख विश्वानथ पाटील उपस्थित होते .
यावेळी मुरबाडचे आ कथोरे यांनी आपल्या भाषणात पाहिल्यानंदीच कुणबी समाज एकत्र आल्याचे कौतुक करीत कुणबी जनतेचे आभार मानले . निवडणुकीपुरता कुणबी मतदारांची। गरज लागते याचा उल्लेख करीत विकासाच्या नावाने मत मागतो , मी कुणबी म्हणून मतदान मागीत नाही . बिगर आदिवासी समाजाच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या काढल्याचा निषेध करीत त्या परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली . ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय देण्याची मागणी केली . 75 साली वन कायदा आला आणि हक्काच्या जमिनी गेल्या . समृद्धी महामार्ग जुन्या महामार्गावरून घेण्याची विनंती या वेळी केली . पर्यटन तालुके म्हणून शहापूर व मुरबाड घोषीत केले तर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल .
संघर्ष समितीच्या सदस्यांना शांत राहण्यासाठी आ कथोरेंची मध्यस्थी !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे समजताच तालुक्यामध्ये अफवांचे वादळ दोन दिवसांपासून सुरु झाले होते . यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या येण्याच्या मार्गावर काळे झेंडे दाखवावे , मोहत्सवाला मार्गदर्शन करताना निषेधाच्या घोषणा देण्याच्या शक्यता अशा अफवा , मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गात बाधीत होणाऱ्या परिसरात सुरु होत्या . यावर आधीच उपायोजना करण्यासाठी मुरबाड मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेत शहापूर शासकीय विश्रमगृहात संघर्ष समिती बरोबर बैठक घेत शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत मी स्वतः या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याचे तोंडी आश्वासन दिले .
पत्रकारांची गैरसोई
अनेक वर्षानंतर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री शहापुर नगरीत येनार म्हणुन व तसेच सध्याचे शहापुर तालुक्यातील दोन मुख्य ज्वलंत विषय समृध्दी माहामार्ग व बिगर आदिवासी नोकरभरती बाबत मुख्यमंत्री काय भुमिका घेतात या सदर्भात आनेक पत्रकारांना उत्सुकता होती परंतु आयोजकांनी दिलेल्या विस पत्रकारांच्या यादीत आनेक पत्रकारांची नावे नसल्यामुळे अनेक पत्रकारांचा पुरता हिरमोड झाला.
Tuesday, 20 December 2016
समृध्दीचा सर्वात मोठा वाटा शेतकर्यांना मिळनार
Thursday, 15 December 2016
कुणबी मोहत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
कुणबी मोहत्सवाची तयारी अंतीम टप्यात
आसनगांव प्रतिनिधी / प्रशांत गडगे
कुणबी मोहोत्सव प्रतिष्ठान आयोजीत कुणबी मोहोत्सव १६ या कुणबी समाज परंपरा आणि संस्कृतीचे प्रदर्शन करनार्या दिमाखदार कार्यक्रमाची संपुर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आसुन ही कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्यात आली आहे.
आसनगांव स्टेशन पुर्वेला पासुन हाकेच्या अंतरावर आसलेल्या जोंधळे मैदानात या मोहोत्सवाचे आयोजन केले आसुन कोकण विभागीय कुणबी समाजाकडे या मोहत्सवाचे यजमान भुमिका पार पाडनार आसुन हा मोहत्सव सर्वसामावेषक आसेल आसे आयोजक समितीने स्पष्ट केले आहे. या मोहोत्सवात कुणबी संस्कृती व परपंरेची दर्शन घडवनार्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि १८ डिसेंबर ला संध्याकाळी ६ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते या मोहोत्सवाचे उद्घाटन होनार आसुन खासदार छत्रपती संभाजी राजे, माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपील पाटील,कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार पांडुरंग बरोरा आदि मान्यवरांन सोबत राज्यातील अनेक आमदार या मोहोत्सवात सहभागी होनार आहेत. मोहोत्सवाच्या चर्चासत्र , शहापुर टँलेंट हंट, पाककला स्पर्धा, विश्वास नांगरे पाटील व नितीन बानगुडे पाटील यांची व्याख्याने तर नंदेश उमप निर्मित शिवसोहळा हा भव्य सांस्कृतीक कार्यक्रम व अनेक मराठी कलाकारांचे रेलचेल आसनारा उत्सव शहापुरकरांचा हा दिमाखदार सांस्कृतीक कार्यक्रम पार पडनार आहे. या मोहत्सवात कुणबी गौरव पुरस्कार देण्यात येनार आसुन १००० वारकर्यांचा हरीपाठ करुन मोहत्सवाची रंगत वाढवनार आहेत.
या कार्यक्रमासाठी मोहत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र चंदे, मी कुणबी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राजेश गडगे, सचिव रविंद्र लकडे, प्राचार्य प्रकाश भांगरथ, आसनगांव चे उपसरपंच सुनिल चंदे, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे,काँग्रेसच्या अपर्णा ताई खाडे, प्रसिध्दी समिती योगेश हजारे,महेश विशे, शशांक हरड, राम जागरे, जयवंत तारमळे, माजी उपसरपंच नितीन चंदे, उद्योजक भगवान वेखंडे आदि मान्यवर मेहनत घेत आसुन या मोहोत्सवात तरुणांचा सहभाग लक्षणिय आहे. शहापुर,वाडा, विक्रमगड,मुरबाड,कल्याण, भिवंडी, बदलापुर, अंबरनाथ इत्यादि विभागातुन हजारो नागरीक या मोहत्सवात सहभागी होनार आसल्याने मोहत्सवाची तयारी आता अंतिम टप्यात आली आहे.
Friday, 9 December 2016
शहापुर तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा...
शहापुर तालुक्याच्या च्या शिरपेचातला मानाचा तुरा..
सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापुर
प्रशांत गडगे
शहापुर तालुक्यातली नावाजलेली शैक्षणिक संस्था आणि शहापुर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान करुन गोर गरीब आडल्या नडल्या विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणन्यात मुख्य वाटा आसनार्या ज्ञानवर्धिनी ट्रस्ट च्या सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाने कात टाकली आसुन सध्या काँलेज ची वाटचाल प्रगती पथावर होत आहे.
शहापुर तालुक्यातील अनेक पिढ्या ज्या महाविद्यालयात घडल्या किंबहुना अानेक विद्यार्थांची शैक्षणिक पायाभरनी ज्या महाविद्यालयात घडली ते शहापुरकरांचे लाडके सोनुभाऊ महाविद्यालय आता प्रगती पथावर आसुन संस्थेचे विद्यमान विश्वस्थ मंडळ व कार्यकारी मंडळाच्या अथक परीश्रमानंतर महाविद्यालयाचे रुपडे बदलतांनाचे चित्र शहापुर तालुकावासिंना दिसते आहे. शहापुर तसा आदिवासी व दुर्गम तालुका, आशा तालुक्यात एखादी शिक्षण संस्था सुरु करुन ती चालवायची म्हणजे तारेवरची करसत पण हे शिवधनुष्य ज्ञानवर्धिनी संस्थेनी लिलया पेलले. 1987 साली सुरु झालेले सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाचा आजवरचा आलेख चढताच राहीला आहे. शहापुर तालुक्यातील कसारा डोळखांब किन्हवली विभागातुन अनेक विद्यार्थी या महाविद्यालयात शिकले आसुन पुढे यशस्वी उद्योजक, इंजिनियर्स ,डाँक्टर्स, वकिल ,अर्किटेक झालेले आहेत.
आज सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाला भेट दिली या वेळी संस्थेचे संचालक व कार्यकारी मंडळाचे सचिव बाळा पाटील यांनी महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालय, व्यायमशाळा, डिजीटल रुम, यांची माहीती दिली, तसेच महाविद्यालयाला ISO मानांकन मिळाले आसल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे. यावेळी काँलेज तर्फे प्रकाशित करण्यात येनार्या आविष्कार या वार्षिक अंकांत महाविद्यालयाचा चढता अलेख मांडला आहे.यात अनेक विद्यार्थांनी लेखन करुन अंक वाचनिय केला आहे. संस्थेचे शासकिय विशेष अनुदानातुन तयार आसलेले आदिवासी मुलींसाठी भव्य वस्तीगृहाची देखनी इमारत महाविद्यालयाच्या सौंदर्यात भर घालीत आसुन महाविद्यालयाने प्रगती करत आसतांना आपला वेगळा ठसा जनमाणसात उमटवीला आहे.
Posted via Blogaway
Tuesday, 6 December 2016
नव्याने झालेल्या वासिंद पिवळी रस्त्याची दुरावस्ता
नव्याने झालेल्या वासिंद पिवळी रस्त्याची दुरावस्ता
खड्डे भरणी च्या कामात ही घोटाळा झाल्याचा आरोप
विचारमंथन वृत्त सेवा / प्रशांत गडगे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहापुर उपविभागा च्या देखरेखी खाली करण्यात येनार्या कामांच्या सुमार दर्जा बाबत नेहमीच चर्चा होत आसतांना शहापुर तालुक्यात मार्च ते मे महिन्यांच्या कालावधीत शहापुर तालुक्यातील आनेक रस्त्यांची नव्याने कामे करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनानाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यांनसाठी करोडो रुपयाचा निधी खर्च केला, परंतु ही नव्याने केलीली कामे पहिल्याच पावसाळ्यात वाहुन गेल्याने रस्त्यांची दुरावस्ता झाल्याचे चित्र समोर येत आहे.
शहापुर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात विविध रस्त्यांच्या कामा पैकी वासिंद- पिवळी- कांबारे या २३ किमी रस्त्याचे काम मागच्या मार्च ते मे महिन्यांत करण्यात आले होते. या कामासाठी सुमारे विस लक्ष रुपये येवढा निधी खर्च करण्यात आला होता परंतु एका पावसाळ्यातच हा रस्ता चाळन झाली आसुन रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पडले आसल्याच्या तक्रारी नागरीक नेहमीच करीत आहेत. या रस्ता बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आसुन रस्त्याचे सुमार व निकृष्ट काम करुन शासनाचा निधी हडप केला आसल्याचे इथल्या स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे. नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे रस्त्यावर पडलेले खड्डे भरन्यात आले आसले तरी हे खड्डे वासिंद ते पिवळी याच पट्ट्यात मोजुन ५० खड्डेच भरले आसल्याचे कळते. पिवळी ते कांबारे या सुमारे पंधरा किमी पट्ट्यातील खड्डे आजुन जैसे थे परीस्थितीत आसुन खड्डे भरन्याच्या कामातही सदर ठेकेदाराने हलगर्जी पणा केला आसुन खड्डे भरन्याच्या काम सुमार दर्जाचे झाले आसल्याचे आरोप स्थानिकांन कडुन केला जात आहे. या रस्त्याच्या माहीती व प्रतिक्रीयेसाठी शाखा आभियंते गोरे यांना फोन केला आसता त्यांनी फोन उचला नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणा मुळे शहापुर तालुक्यात नव्याने झालेल्या सर्वच रस्यांची काही प्रमाणात दुरावस्ता झाली आसल्याने या कामांच्या दर्जा बाबत नागरीकांना शंका उपन्न झाली आहे.
सदर रस्त्याला मे महिन्यामध्ये 20 लाखाचा ई-टेन्डरींग झालं आहे.हा निधी वासिद ते कांबारे दरम्यानचा ख॓ड्डे भरण्यासाठी आहे परंतु मोजुन 50 खड्डे ही ठेकेदाराने भरलेले नाही आणि हे काम फक्त वासिद ते पिवली (वांद्रे) येथ पर्यतच केले आहे पिवळी पासुन कांबारे इकडे एकही खड्डा बुजवण्यात आलेला नाही. जे खड्डे भरलेत ते ही अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.
देविदास भोईर
स्थानिक रहिवाशी
Saturday, 3 December 2016
विष्णु चंदे यांचा सेनेत प्रवेश
विष्णु चंदे यांचा शिवसेनेत प्रवेश
विचारमंथन वृत्तसेवा
भिवंडी तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे विद्यमान भिवंडी विधान सभा तालुका अध्यक्ष विष्णु चंदे यांनी नुकताच उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीतीत शिवसेनेत प्रवेश केल्याने भिवंडी तालुका भारतीय जनता पार्टी ला मोठा धक्का बसला आहे.
विष्णु चंदे हे पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे कार्यकर्ते आसुन त्यांनी भिवंडी उपतालुका प्रमुख म्हणुन काम केले आहे. मागच्या विधानसभा निवडनुकीत त्यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करुन भाजपात प्रवेश केला होता. खासदार कपील पाटील यांचे ते निकटवर्तीय होतो. आगामी जि. प. व पं.स निवडनुका पाहता शिवसेनेला विष्णु चंदे यांच्या प्रवेशाचा फायदा होनार आसुन विष्णु चंदे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला आहे.
लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण
शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...
-
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांड...
-
प्रशांत गडगे/शहापुर शहापुर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंडन पाडा येथिल स्मशान भुमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली...
-
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न शहापुर/ प्रशांत गडगे मा ऊ ली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंद...