शहापुर तालुक्याच्या च्या शिरपेचातला मानाचा तुरा..
सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापुर
प्रशांत गडगे
शहापुर तालुक्यातली नावाजलेली शैक्षणिक संस्था आणि शहापुर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान करुन गोर गरीब आडल्या नडल्या विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणन्यात मुख्य वाटा आसनार्या ज्ञानवर्धिनी ट्रस्ट च्या सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाने कात टाकली आसुन सध्या काँलेज ची वाटचाल प्रगती पथावर होत आहे.
शहापुर तालुक्यातील अनेक पिढ्या ज्या महाविद्यालयात घडल्या किंबहुना अानेक विद्यार्थांची शैक्षणिक पायाभरनी ज्या महाविद्यालयात घडली ते शहापुरकरांचे लाडके सोनुभाऊ महाविद्यालय आता प्रगती पथावर आसुन संस्थेचे विद्यमान विश्वस्थ मंडळ व कार्यकारी मंडळाच्या अथक परीश्रमानंतर महाविद्यालयाचे रुपडे बदलतांनाचे चित्र शहापुर तालुकावासिंना दिसते आहे. शहापुर तसा आदिवासी व दुर्गम तालुका, आशा तालुक्यात एखादी शिक्षण संस्था सुरु करुन ती चालवायची म्हणजे तारेवरची करसत पण हे शिवधनुष्य ज्ञानवर्धिनी संस्थेनी लिलया पेलले. 1987 साली सुरु झालेले सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाचा आजवरचा आलेख चढताच राहीला आहे. शहापुर तालुक्यातील कसारा डोळखांब किन्हवली विभागातुन अनेक विद्यार्थी या महाविद्यालयात शिकले आसुन पुढे यशस्वी उद्योजक, इंजिनियर्स ,डाँक्टर्स, वकिल ,अर्किटेक झालेले आहेत.
आज सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाला भेट दिली या वेळी संस्थेचे संचालक व कार्यकारी मंडळाचे सचिव बाळा पाटील यांनी महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालय, व्यायमशाळा, डिजीटल रुम, यांची माहीती दिली, तसेच महाविद्यालयाला ISO मानांकन मिळाले आसल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे. यावेळी काँलेज तर्फे प्रकाशित करण्यात येनार्या आविष्कार या वार्षिक अंकांत महाविद्यालयाचा चढता अलेख मांडला आहे.यात अनेक विद्यार्थांनी लेखन करुन अंक वाचनिय केला आहे. संस्थेचे शासकिय विशेष अनुदानातुन तयार आसलेले आदिवासी मुलींसाठी भव्य वस्तीगृहाची देखनी इमारत महाविद्यालयाच्या सौंदर्यात भर घालीत आसुन महाविद्यालयाने प्रगती करत आसतांना आपला वेगळा ठसा जनमाणसात उमटवीला आहे.
Posted via Blogaway
Friday, 9 December 2016
शहापुर तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण
शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...
-
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांड...
-
प्रशांत गडगे/शहापुर शहापुर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंडन पाडा येथिल स्मशान भुमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली...
-
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न शहापुर/ प्रशांत गडगे मा ऊ ली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंद...
No comments:
Post a Comment