Tuesday, 20 December 2016

समृध्दीचा सर्वात मोठा वाटा शेतकर्यांना मिळनार

समृद्धीचा सर्वात मोठा वाटा शेतकऱ्यांना मिळणार  - देवेंद्र फडणवीस 

कुणबी समाजाचे प्रश्न नक्कीच सोडवणार 

# 20 वर्षे महाराष्ट्राला पुढे नेणारा समृद्धी  महामार्ग  

आसनगांव प्रतिनिधी/ प्रशांत गडगे

      नव्याने होऊ घातलेल्या मुंबई - नाशिक महामार्गामध्ये प्रथमच जमिनी जाणारा शेतकरी समृद्ध होणार असून यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सुतवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर येथे केले . पुढे त्यांनी   200 कोटी रुपये भावोली पाणी योजनेसाठी उपलब्ध करून देणार असून नव्याने होणाऱ्या धरणांसाठी जमिनी घेतल्या तर तेथील जनतेला सर्वप्रथम पाणी देणे बंधनकारक ठरण्याचा कायदा करणार असल्याचे सांगितले .  ओबीसी समाजाचे वेगळे मंत्रालय , स्वतंत्र मंत्री लवकरच  उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत  ,  शामराव पेजे महामंडळला या मार्चच्या बजेटपूर्वी 50 कोटींचा निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली .  छत्रपतींच्या स्मारकाला झालेले उशीर याचे दुःख आहे , परंतु जगातील सर्वात उंच स्मारक होत असल्याचा आनंद आहे .  तालुक्यातील आसनगाव येथील जोंधळे मैदानात मागील  तीन दिवसांपासून सुरु असलेल्या कोकण स्तरीय कुणबी स्नेहसंमेलनाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहापुरात आले होते . यावेळी त्यांच्या बरोबरच राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फूडकर , खा कपिल पाटील , आ पांडुरंग बरोरा , आ किसन कथोरे , आ नरेंद्र पवार , माजी आ दौलत दरोडा , कुणबी सेना प्रमुख विश्वानथ पाटील  उपस्थित होते . 

               यावेळी मुरबाडचे आ कथोरे यांनी आपल्या भाषणात पाहिल्यानंदीच कुणबी समाज एकत्र आल्याचे कौतुक करीत कुणबी जनतेचे आभार मानले . निवडणुकीपुरता कुणबी मतदारांची। गरज लागते याचा उल्लेख करीत विकासाच्या नावाने मत मागतो , मी कुणबी म्हणून मतदान मागीत नाही .  बिगर आदिवासी समाजाच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या काढल्याचा निषेध करीत त्या परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली . ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय देण्याची मागणी केली . 75 साली वन कायदा आला आणि हक्काच्या जमिनी गेल्या . समृद्धी महामार्ग  जुन्या महामार्गावरून घेण्याची विनंती या वेळी केली . पर्यटन तालुके म्हणून शहापूर व मुरबाड घोषीत केले तर रोजगार उपलब्ध होण्यास  मदत होईल .  

संघर्ष समितीच्या सदस्यांना शांत राहण्यासाठी  आ कथोरेंची मध्यस्थी !

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे समजताच तालुक्यामध्ये अफवांचे वादळ दोन दिवसांपासून सुरु झाले होते . यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या येण्याच्या मार्गावर काळे झेंडे दाखवावे , मोहत्सवाला मार्गदर्शन करताना निषेधाच्या घोषणा देण्याच्या शक्यता अशा अफवा , मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गात बाधीत होणाऱ्या परिसरात सुरु होत्या . यावर आधीच उपायोजना करण्यासाठी मुरबाड मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेत शहापूर शासकीय विश्रमगृहात संघर्ष समिती बरोबर बैठक घेत शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत मी स्वतः या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याचे तोंडी  आश्वासन दिले .

पत्रकारांची गैरसोई

अनेक वर्षानंतर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री  शहापुर नगरीत येनार म्हणुन व तसेच सध्याचे शहापुर तालुक्यातील दोन मुख्य ज्वलंत विषय समृध्दी माहामार्ग व बिगर आदिवासी नोकरभरती बाबत मुख्यमंत्री काय भुमिका घेतात या सदर्भात आनेक पत्रकारांना उत्सुकता होती परंतु आयोजकांनी दिलेल्या विस पत्रकारांच्या यादीत आनेक पत्रकारांची नावे नसल्यामुळे  अनेक पत्रकारांचा पुरता हिरमोड झाला.


Thursday, 15 December 2016

कुणबी मोहत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कुणबी मोहत्सवाची तयारी अंतीम टप्यात

आसनगांव प्रतिनिधी / प्रशांत गडगे

कुणबी मोहोत्सव प्रतिष्ठान आयोजीत कुणबी मोहोत्सव १६ या कुणबी समाज परंपरा आणि संस्कृतीचे प्रदर्शन करनार्या दिमाखदार कार्यक्रमाची संपुर्ण ठाणे जिल्ह्यात  जोरदार चर्चा सुरु आसुन ही कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्यात आली आहे.
         आसनगांव स्टेशन पुर्वेला पासुन हाकेच्या अंतरावर आसलेल्या  जोंधळे मैदानात या मोहोत्सवाचे आयोजन केले आसुन कोकण विभागीय कुणबी समाजाकडे या मोहत्सवाचे यजमान भुमिका पार पाडनार आसुन हा मोहत्सव सर्वसामावेषक आसेल आसे आयोजक समितीने स्पष्ट केले आहे. या मोहोत्सवात कुणबी संस्कृती व परपंरेची दर्शन घडवनार्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि १८ डिसेंबर ला संध्याकाळी ६ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते या मोहोत्सवाचे उद्घाटन होनार आसुन खासदार छत्रपती संभाजी राजे, माणिकराव ठाकरे, पालकमंत्री  एकनाथ शिंदे, खासदार कपील पाटील,कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार पांडुरंग बरोरा आदि मान्यवरांन सोबत राज्यातील अनेक आमदार या मोहोत्सवात सहभागी होनार आहेत. मोहोत्सवाच्या  चर्चासत्र , शहापुर टँलेंट हंट, पाककला स्पर्धा, विश्वास नांगरे पाटील व नितीन बानगुडे पाटील यांची व्याख्याने तर  नंदेश उमप निर्मित शिवसोहळा हा भव्य सांस्कृतीक कार्यक्रम व अनेक मराठी कलाकारांचे रेलचेल आसनारा उत्सव शहापुरकरांचा हा दिमाखदार सांस्कृतीक कार्यक्रम पार पडनार आहे. या मोहत्सवात कुणबी गौरव पुरस्कार देण्यात येनार आसुन  १००० वारकर्यांचा हरीपाठ करुन मोहत्सवाची रंगत वाढवनार आहेत.
     या कार्यक्रमासाठी मोहत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र चंदे, मी कुणबी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राजेश गडगे, सचिव रविंद्र लकडे,  प्राचार्य प्रकाश भांगरथ,  आसनगांव चे उपसरपंच सुनिल चंदे, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे,काँग्रेसच्या अपर्णा ताई खाडे, प्रसिध्दी समिती योगेश हजारे,महेश विशे, शशांक हरड, राम जागरे, जयवंत तारमळे, माजी उपसरपंच नितीन चंदे, उद्योजक भगवान वेखंडे आदि मान्यवर मेहनत घेत आसुन या मोहोत्सवात तरुणांचा सहभाग लक्षणिय आहे. शहापुर,वाडा, विक्रमगड,मुरबाड,कल्याण, भिवंडी, बदलापुर, अंबरनाथ इत्यादि विभागातुन हजारो नागरीक या मोहत्सवात सहभागी होनार आसल्याने मोहत्सवाची तयारी आता अंतिम टप्यात आली आहे.


Friday, 9 December 2016

शहापुर तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा...



शहापुर तालुक्याच्या च्या शिरपेचातला मानाचा तुरा..

सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापुर

प्रशांत गडगे

शहापुर तालुक्यातली नावाजलेली शैक्षणिक संस्था आणि शहापुर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान करुन गोर गरीब आडल्या नडल्या विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणन्यात मुख्य वाटा आसनार्या ज्ञानवर्धिनी ट्रस्ट च्या सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाने कात टाकली आसुन सध्या काँलेज ची वाटचाल प्रगती पथावर होत आहे.
               शहापुर तालुक्यातील अनेक पिढ्या ज्या महाविद्यालयात घडल्या किंबहुना अानेक विद्यार्थांची शैक्षणिक पायाभरनी ज्या महाविद्यालयात घडली ते शहापुरकरांचे लाडके सोनुभाऊ महाविद्यालय आता प्रगती पथावर आसुन संस्थेचे विद्यमान विश्वस्थ मंडळ व कार्यकारी मंडळाच्या अथक परीश्रमानंतर महाविद्यालयाचे रुपडे बदलतांनाचे चित्र शहापुर तालुकावासिंना दिसते आहे. शहापुर तसा आदिवासी व दुर्गम तालुका, आशा तालुक्यात एखादी  शिक्षण संस्था सुरु करुन ती चालवायची म्हणजे तारेवरची करसत पण हे शिवधनुष्य ज्ञानवर्धिनी संस्थेनी लिलया पेलले. 1987 साली सुरु झालेले सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाचा आजवरचा आलेख चढताच राहीला आहे. शहापुर तालुक्यातील कसारा डोळखांब किन्हवली विभागातुन अनेक विद्यार्थी या महाविद्यालयात शिकले आसुन पुढे यशस्वी उद्योजक, इंजिनियर्स ,डाँक्टर्स, वकिल ,अर्किटेक झालेले आहेत.
       आज सोनुभाऊ बसवंत कला वाणिज्य महाविद्यालयाला भेट दिली या वेळी  संस्थेचे संचालक व कार्यकारी मंडळाचे सचिव बाळा पाटील यांनी महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालय, व्यायमशाळा, डिजीटल रुम, यांची माहीती दिली, तसेच महाविद्यालयाला ISO मानांकन मिळाले आसल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे. यावेळी काँलेज तर्फे प्रकाशित करण्यात येनार्या आविष्कार या  वार्षिक अंकांत महाविद्यालयाचा चढता अलेख मांडला आहे.यात अनेक विद्यार्थांनी लेखन करुन अंक वाचनिय केला आहे. संस्थेचे शासकिय विशेष अनुदानातुन तयार आसलेले आदिवासी मुलींसाठी भव्य वस्तीगृहाची देखनी इमारत महाविद्यालयाच्या सौंदर्यात भर घालीत आसुन महाविद्यालयाने प्रगती करत आसतांना आपला वेगळा ठसा जनमाणसात उमटवीला आहे.



Posted via Blogaway


Tuesday, 6 December 2016

नव्याने झालेल्या वासिंद पिवळी रस्त्याची दुरावस्ता

नव्याने झालेल्या  वासिंद पिवळी रस्त्याची दुरावस्ता

खड्डे भरणी च्या कामात ही घोटाळा झाल्याचा आरोप

विचारमंथन वृत्त सेवा / प्रशांत गडगे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहापुर उपविभागा च्या देखरेखी खाली करण्यात येनार्या कामांच्या सुमार दर्जा बाबत नेहमीच चर्चा होत आसतांना शहापुर तालुक्यात मार्च ते मे महिन्यांच्या कालावधीत शहापुर तालुक्यातील आनेक रस्त्यांची नव्याने कामे करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनानाच्या  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यांनसाठी करोडो रुपयाचा निधी खर्च केला, परंतु ही नव्याने केलीली कामे पहिल्याच पावसाळ्यात  वाहुन गेल्याने रस्त्यांची दुरावस्ता झाल्याचे चित्र समोर येत आहे.
        शहापुर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात विविध रस्त्यांच्या कामा पैकी वासिंद- पिवळी- कांबारे या २३ किमी रस्त्याचे काम मागच्या मार्च ते मे महिन्यांत करण्यात आले होते. या कामासाठी सुमारे विस लक्ष रुपये येवढा निधी खर्च करण्यात आला होता परंतु एका पावसाळ्यातच हा रस्ता चाळन झाली आसुन रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पडले आसल्याच्या तक्रारी नागरीक नेहमीच करीत आहेत. या रस्ता बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आसुन रस्त्याचे सुमार व निकृष्ट काम करुन  शासनाचा निधी हडप केला आसल्याचे  इथल्या स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे. नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे रस्त्यावर पडलेले खड्डे भरन्यात आले आसले तरी हे खड्डे वासिंद ते पिवळी याच पट्ट्यात मोजुन ५० खड्डेच भरले आसल्याचे कळते. पिवळी ते कांबारे या सुमारे पंधरा किमी पट्ट्यातील खड्डे आजुन जैसे थे परीस्थितीत आसुन खड्डे भरन्याच्या कामातही सदर ठेकेदाराने हलगर्जी पणा केला आसुन खड्डे भरन्याच्या काम सुमार दर्जाचे झाले आसल्याचे आरोप स्थानिकांन कडुन केला जात आहे. या रस्त्याच्या माहीती व प्रतिक्रीयेसाठी  शाखा आभियंते गोरे यांना फोन केला आसता त्यांनी फोन उचला नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणा मुळे शहापुर तालुक्यात नव्याने झालेल्या सर्वच रस्यांची काही प्रमाणात दुरावस्ता झाली आसल्याने या कामांच्या दर्जा बाबत नागरीकांना शंका उपन्न झाली आहे.

सदर रस्त्याला मे महिन्यामध्ये 20 लाखाचा ई-टेन्डरींग झालं आहे.हा निधी वासिद ते कांबारे दरम्यानचा ख॓ड्डे भरण्यासाठी आहे परंतु मोजुन 50 खड्डे ही ठेकेदाराने भरलेले नाही आणि हे काम फक्त वासिद ते पिवली (वांद्रे) येथ पर्यतच केले आहे पिवळी  पासुन कांबारे इकडे एकही खड्डा बुजवण्यात आलेला नाही. जे खड्डे भरलेत ते ही अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.
देविदास भोईर
स्थानिक रहिवाशी


Saturday, 3 December 2016

विष्णु चंदे यांचा सेनेत प्रवेश

विष्णु चंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

विचारमंथन वृत्तसेवा

भिवंडी तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे विद्यमान भिवंडी विधान सभा तालुका अध्यक्ष विष्णु चंदे यांनी नुकताच उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीतीत शिवसेनेत प्रवेश केल्याने भिवंडी तालुका भारतीय जनता पार्टी ला मोठा धक्का बसला आहे.
   विष्णु चंदे हे पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे कार्यकर्ते आसुन त्यांनी भिवंडी उपतालुका प्रमुख म्हणुन काम केले आहे. मागच्या विधानसभा निवडनुकीत त्यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करुन भाजपात प्रवेश केला होता. खासदार कपील पाटील यांचे ते निकटवर्तीय होतो. आगामी जि. प. व पं.स निवडनुका पाहता शिवसेनेला विष्णु चंदे यांच्या प्रवेशाचा फायदा होनार आसुन विष्णु चंदे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला आहे.


Tuesday, 29 November 2016

शहापुर तहसिल कार्यालया समोरच २ कोटी वृक्षलागवडीचा फज्जा

शहापुर तहसिल कार्यालया समोरील पाण्याआभावी सुकलेले वृक्ष

शहापुर तहसिल कार्यालया समोरच २ कोटी वृक्षलागवडीचा फज्जा

मोहीमेत लावलेली झाडे सुकली..

विचारमंथन वृत्तसेवा / प्रशांत गडगे

जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेला निसर्ग आणि ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे गेल्या काही वर्षांत मानवी जीवनावर मोठे विपरित परिणाम झाले असून भविष्यात यामुळे निर्माण होणार्‍या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार केला असून पर्यावरणाचा हा ढासळलेला समतोल सावरण्यासाठी आरोग्य विभागाने  1 जुलै रोजी राज्यात वनमोहत्सवाचे औचित्य साधुन २ कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली होती.
              या योजनेत शासकिय सर्वच विभागांनी सहभाग घेत सुमारे अडीच कोटी वृक्ष लागवड केली. यात सहभाग म्हणुन सेल्फी विथ ट्री आशा आभिनव कल्पनाही राबवल्या गेल्या. शहापुर तालुक्यात ही २ कोटी वृक्ष लागवड संकल्पना राबवली गेली महसुल विभागा तर्फे तहसिल कार्यालया समोर मोठ्या थाटाट वृक्षरोपण करण्यात आले पण या वृक्षरोपणात लावन्यात आलेली झाडांवर महसुल विभागाचे दुर्लक्ष होत आसुन ऐन वर्दळीच्या आणि तालुक्याच्या मध्यवर्ती  मुख्य कार्यालयातच शासनाच्या २ कोटी वृक्षलागवड संकल्पनेचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. शहापुर तालुक्यात आनेक ठिकाणी झालेल्या वृक्षलागवडीची ही परीस्थिती आसुन सर्वच शासकिय आधिकारी आणि नागरीकांनी या वृक्षांचे संगोपन करणे गरजेचे आहे. अन्यथा शासन विविध योजना राबवते त्यासाठी खर्च ही करते पण उदासिनते मुळे या योजना उद्देश सफल होत नसल्याने शासनाचा करोडो रुपये निधी वाया जातो याची नोंद घेने गरजेचे आहे.


Friday, 25 November 2016

शहापुर मध्ये सात लाख रुपयाची चोरी

विचारमंथन वृत्तसेवा/ प्रशांत गडगे

वाढत्या थंडीचा फायदा घेवुन शहापुर तालुक्यात सध्या चोरांनी धुमाकुळ घातला आहे. आलिकडेच दुचाकी चोरीच्या घटनेट वाढ झाली आसुन रात्री दुकाने फोडुन चोरी होण्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. शहापुरातील द टायर जंक्शन हे दुकानात रात्री तीन च्या सुमारास चोरी झाली आसुन ७ लाख रु मुद्देमाल चोरीला गेल्याने परीसरात खळबळ माजली आहे.
      प्रशांत भेरे यांच्या मालकीच्या शहापुर गोठेघर येथील बी टायर जंक्शन हे  दुकान दि ८ नोंव्हेबर ला पहाटे ३ च्या सुमारास चोरट्यांनी फोडले आसुन सात लाख किंमतीचे विविध कंपन्यांचे  टायर चोरुन नेले आहेत. चोरट्यांनी चोरी करतांनाची संपुर्ण घटना सिसि टिव्ही कँमेर्यात कैद झाली आसुन चोरांचे चेहरे त्यात स्पष्टपणे दिसत आहे. या चोरट्यांनी सदर दुकानातील ७ लाख रु किंमतीचे विविध कंपन्यांचे ९० टायर चोरी केले आहेत. याबाबत शहापुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद झाला आसुन पंधरा दिवस उलटुन ही चोरांचा तपास लागला नसल्याचे दुकानाचे मालक प्रशांत भेरे यांनी सांगितले आसुन शहापुर तालुक्यात विशेषता शहरी भागात चो-यांचे प्रकार वाढले आहेत. सदर घटना रोखन्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवुन या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालन्याची मागणी परीसरातुन होत आहे


शहापुरची तहान भागनार


विचारमंथन वृत्तसेवा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर
तालुक्याची तहान भागवू शकणाऱ्या इगतपुरी
तालुक्यातील १९२ कोटी खर्चाच्या भावली
धरणातून पाणी घेण्याच्या योजनेला तांत्रिक
मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही योजना
मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल
पडल्याचे मानले जात आहे

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून ग्रीड
पद्धतीने आणि गुरुत्वाकर्षणावर आधारित
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या धर्तीवर ही
पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे.
स्टेम वॉटर डिस्ट्रब्यिुशन प्रा. लि. कंपनी आणि
राज्य सरकार भागिदारी तत्त्वावर ही
योजना राबवणार आहे. १९२ कोटींतील
सरकारचा निम्मा वाटा आदिवासी योजनेतून
उपलब्ध करून देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आधीच मान्यता दिली आहे.
या योजनेला नुकतीच तांत्रिक मान्यता
देण्यात आली असून ही योजना देखभाल व
दुरुस्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी
व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहित
धरण्यात आला आहे. यामुळे शहापूर
तालुक्यातील टँकरग्रस्त, टंचाईग्रस्त व
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या आदिवासी
जनतेस अल्पदरात पाणी उपलब्ध करून देण्याच्या
दृष्टीने योजनेचे निमव्यावसायिक स्वरूप,
योजनेचा आवाका लक्षात घेता ही योजना ३०
वर्षांसाठी माणशी ७० लिटरने संकल्पित
करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचे तांत्रिक
मंजुरी देताना स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेमुळे शहापूर तालुक्यातील माळ, दांड
सारख्या दुर्गम भागातील गावांसह वाशाळ,
खर्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव
अशा दोन लाख वस्तीच्या २०६ गाव-
पाडयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
मार्गी लागणार आहे. या योजनेत समावेश
करण्याबाबत संबधित ग्रामपंचायतींचे ठराव
आधीच झाले आहेत.


Thursday, 24 November 2016

५० हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक

पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना ५० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जमीनी संदर्भात शिवाजी दावभट यांनी ५० लाखाची लाच मागितली होती.

अँटी करप्शन ठाणे शाखेने कारवाई केली असुन गेल्या २९ ऑगस्ट २०१६ पासुन दावभट यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले असुन अँटी करप्शन शाखेने तपासणी केली होती. त्यांनंतर २० सप्टेंबर२०१६ व २४ नोव्हेंबर२०१६ रोजी तपासणी झाल्यावर साफळा रचुन प्रांत अधिकारी शिवाजी दावभट, नायबतहसीलदार सतिश मानिवडे व वाहन चालक जयेश पाटील यांना रंगेहाथ पकडले.

पालघर तालुक्यातील सालवड गावतील एका पारशी कुटुंबाच्या ६० वर्षापूर्वीच्या वेगवेगळ्या चार जमिनीच्या प्रकरणाचे निकाल गेले काही महिने अडकून ठेवण्यांत आले होते. ही प्रकरणे निकालात काढण्याठी दावभात यांनी ५० लाख रूपयांची मागणी केली होती. दावभट यांना देण्यात आलेल्या रक्कमेत ३ लाख रूपये खरे होते तर, ४७ लाख रूपये खोट्या नोटा होत्या. कार्यालयात हि ५० लाख रुपयाची रक्कम स्वीकारताना शिवाजी दावभाट यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आले. हे वृत्त समजताच पालघर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपजिलहधिकारी कार्यालया जवळ उपस्थित झाले व फटाके वाजऊन दावभट यांच्या  विरोधात घोषणा दिल्या. दावभट यांना अटक केली असुन, त्‍यांची चौकशी सुरु आहे.


ग्रामसेवकांचा संप: ग्रामीन कामकाज ठप्प

ग्रामसेवकांचा संप: ग्रामीन कामकाज ठप्प

आसनगांव प्रतिनिधी / प्रशांत गडगे

७ नोव्हेंबर पासुन राज्यभरातील ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांनासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसल्या मुळे राज्यभरातील ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट पसरला आसुन ग्रामिन भागातील प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे.
         ग्रामविकासासाठी ग्रामपंचायती या ग्रामिन व्यवस्थेचा कणा मानल्या जातात. अनेक शासकिय योजना, शासनाची भुमिका ग्रामस्थांन पर्यंत पोहचवण्याचे मुख्य काम ग्रामसेवक करीत आसतात त्यामुळे ग्रामसेवकांना शासन आणि जनते मधला दुवा संबोधन्यात येते परंतु याच ग्राम सेवकांच्या विविध मागण्या शासन दरबारी आनेक वर्षापासुन प्रलंबीत आसल्याने राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. राज्य भरातील सुमारे २२ हजार ग्रामसेवक या संपात सहभागी झाले आसुन गेल्या काही दिवसापासुन ग्राम पंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे.शासनाने ग्रामसेवकांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढुन ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत करावा आशी मागणी होत आसुन या संपामुळे ग्रामपंचायती ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.


लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...