शहापुर/प्रशांत गडगे
शहापुर नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अंतिम मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, १७ ही प्रभागांत मतदार याद्यांमधे प्रचंड घोळ निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे. जवळपास शहापुर नगर पंचायतीच्या सर्वच प्रभागांच्या याद्यांमधे मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून, एका प्रभागात राहनारे अनेक मतदार दुसर्या प्रभागात तर इतर प्रभागातील मतदारांना इतरत्र समाविष्ट करण्यात आले आहे.
शहापुर नगरपंचायत हद्दीत १७ प्रभाग आहेत. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असून, सध्या प्रशासकराज सुरू आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धिकरण करून अद्ययावत करण्याचे काम बीएलओंना देण्यात आले होते. त्यामधे मृतांचे नाव वगळणे, लग्न होऊन गेलेल्यांची नावे वगळणे, नव्याने आलेले व १८ वर्षे झालेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, प्रभाग बदलून गेलेल्यांची नावे शोधणे ही कामे गृहभेटीच्या माध्यमातून बीएलओंना करायची होती. मात्र, ही सर्व कामे घरी बसूनच करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, ज्या प्रभागात जे लोक राहतात, त्या मतदारांना इतर प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट करुन काही जन राजकिय पोळी भाजण्याच्या विचारात आहेत.
शहरातील जवळपासच्या गावांतील लोकांची नावेसुद्धा नगरपंचायतच्या मतदार यादीत आल्याची चर्चा शहरात आहे. याचा अर्थ बोगस मतदारांचा शिरकाव तर झाला नाहीना, अशी शंका निर्माण झाली आहे. तसेच नुकत्याच झालेले ग्राम पंचायत निवडनुकीत गावांकडे मतदान करनार्या मतदारांची नावे ही नगर पंचायतीच्या यादीत आल्याने याप्रकरणी काही सुज्ञ नागरिकांनी मतदार यादीवर हरकत घेऊन ही गंभीर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती आहे. शहरातील राजकीय वर्तुळात वजन असणारे मतदार याद्यांमधे घोळ करण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. तर काही जणांनी हरकतीची मुदत संपण्याच्या काही तास आधी भाडेकरार करुन नाव नोंदवन्याचा प्रकार केला आहे. काही इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांचा अभ्यास करताना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदार पळवापळवीची बाब निदर्शनास आली असल्याचे नागरिक सांगत आहेत.
शहापुर नगरपंचायतीच्या मतदार यांद्यामध्ये प्रचंड घोळ झाला आसुन हेतुपुरस्कर एका प्रभागा मधुन दुसर्या प्रभागामध्ये भाडेकरार करुन मतदांरांची नावे नोंदवन्यात आली आसुन या विरोधात आम्ही पुराव्यानिशी हरकती घेतल्या आहेत, निवडनुक आधिकारी याची दखल घेवुन कारवाई करतील का? हे आंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर कळेल.
मनोज पानसरे
नागरीक, व हरकतकर्ता
नगरपंच्यायतीच्या प्ररुप याद्यांवर 500 पेक्षा जास्त हरकती प्राप्त झाल्या आसुन निवडनुक आयोगाने यासाठी पंधरा दिवस मुदतवाढ दिली आसुन या हरकतीची शहानिशा केली जाईल
वैभव गारवे
मुख्य कार्यकारी आधिकारी
शहापुर नगर पंचायत
No comments:
Post a Comment