Tuesday, 23 February 2021

आसनगांवात रेल्वे उड्डान पुलाची मागणी


शहापुर/प्रशांत गडगे

शहापुर तालुक्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक आसलेल्या आसनगांव रेल्वे स्थानक परीसराचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच वाढती रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेता या स्थानक परीसरात विविध विकास कामे होने गरजेचे आहे. गेली कित्तेक वर्ष आसनगांव पुर्व व पश्चिम यांना जोडनारा रेल्वेवरील उड्डान पुल नसल्यामुळे आनेक प्रवासी व स्थानिक नागरीकांची गौरसोई होत आहे. प्रवासी आणी ग्रामस्थांनी वारंवार या उड्डानपुलाची मागणी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन यावर दुर्लक्ष करीत आहे.
  नुकताच भिंवडी लोकसभेचे खासदार कपील पाटील व रेल्वेचे मराव्यवस्थापक संजिव मित्तल यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शहापुर तालुक्यातील आसनगांव येथे पुर्व व पश्चिम ला जोडनारा उड्डान पुल नसल्या मुळे आसनगांव परीसरातील आनेक वाहन चालक व चाकरमानी प्रवाश्यांना पुर्वेतुन पश्चिम कडे जान्यासाठी तिन चे चार किमीचा वळसा घालावा लागत आहे. तसेच याठिकाणी एकजुने फाटक आहे तेही बंद केले आसल्याने आनेक प्रवाशी नागरीकांना नाईलाजाने रेल्वे पटरी ओलांडावी लागत आहे. त्यामुळे आनेक अपघात या ठिकाणी होत आसतात. या बाबीची गंभिर दखल घेवुन खा. कपिल पाटील यांनी हा मुद्दा बैठकीत मांडला आसुन याबाबत शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे यांनी निवेदन दिले होते. लवकरच या मुद्दावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी सबंधित रेल्वे आधिकार्यांनी दिले आहे.

2 comments:

  1. नागरिकांची मागणी जर आहे आणि तो उड्डाणं पूल होण अतिआवश्यक आहे .तर प्रशासन का लक्ष घालत नाही . कोणत्याही परिस्थितीत तो पूल होण गरजेच आहे .

    ReplyDelete
  2. तसेच संभाजी नगर पासून तुलसीविहार ला जाणारा उड्डाणपूल होण गरजेच आहे .

    ReplyDelete

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...