Sunday, 13 November 2016

ट्रक विद्युत टाँवरला धडकला: एक ठार

ट्रक विद्युत टाँवर ला धडकला : एक ठार

# मुंबई नासिक महामार्गा वरची वाहतुक काही काळ ठप्प

आसनगांव / प्रशांत गडगे

मुंबई नाशिक हायवे वरील आसनगांव नजीक वेहळोली फाटा येथे सकाळी नव च्या सुमारास माल वाहतुक करनारा ट्रक टाटा पावर च्या विद्युत टावर ला धडकल्या मुळे टावर माहामार्गावर कोसळुन मुंबई नाशिक वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.
       नाशिक वरुन मुंबई च्या दिशेने जानार्या ट्रकला आसनगांव जवळ आपघात झाला. सदर ट्रक (MH.46.AR 5873)आसनगांव वेहळोली फाट्या जवळ आला आसता  महामार्गा शेजारी आसलेल्या टाटा पावर च्या विद्युत टावर ला अदळल्या मुळे टावर माहामार्गावर कोसळुन वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेत ट्रक चालक राकेश गुप्ता (वय २६, रा. नेपाल) हा जागीच ठार झाला तर क्लिनर यशवंत चव्हान (वय २४) किरकोळ जखमी झाला आहे. जखमी क्लिनर ला उपजिल्हा रुग्नालय शहापुर येथे उपचारा साठी दाखल केले आसुन मुंबई नाशिक महामार्गाची ची देखभाल व दुरुस्ती नावात करोडो रुपये टोल वसुली करनार्या ब्रुक फिल्ड कंपनी च्या भोंगळ व अडमुठे धोरना मुळे  पडघा ते कसारा दरम्यान अपघातांच्या घटनांन मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यात माहामार्गाला पडलेले खड्डे सदर कंपनी आजुन भरले नसुन ठिकठिकाणी दिलेले सर्विस रोड ना दुरुस्त झाले आहेत व माहामार्गाला दिशादर्शक फलक व संरक्षक कठडे नसल्या मुळे वाहन चालक व प्रवाशांना साठी हा रस्ता मृत्युचा सापळा ठरत आहे. करोडो  रुपयांची  टोल वसुली करुन सदर कंपनी प्रवासी व  वाहनचालकांन साठी काळ ठरत आसुन अपघातांन मधे मृत्यु  पावलेल्यांच्या वारसाला कंपनी ने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आता जोर धरीत आहे.


No comments:

Post a Comment

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...