आज 'आधार प्रतिष्ठान, शहापुर' ह्या सेवाभावी संस्थेने, 'नको असलेल्या वस्तू द्या, आणि ज्यांना हव्या आहेत त्यांनी त्या वस्तू घेऊन जा' हा अकोला जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेने राबविला जात असलेला "माणुसकीची भिंत" ह्या उपक्रमाचा शुभारंभ, शहापुर शहरात केला.या प्रसंगी संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार बाळ जगे, शिवसेना ठाणे ग्रामीण, उपजिल्हा प्रमुख सन्मा. शंकर खाडे, शहापुरच्या नगराध्यक्षा योगिता धानके, राष्ट्रवादीचे अविनाश थोरात, शिवसेनेचे किरण सोकांडे,भाजपचे
अशोक इरनक, रवि पाटील, भाजपा महिला आघाडीच्या अलका झंवर,पत्रकार वसंत पानसरे, जितू अधिकारी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी, शहरातील बहुतेक नागरिकांच्या घरात अतिरिक्त वस्तूचा साठा होत असून त्या वस्तू द्यायच्या कोणाला? हा प्रश्न पडतो, अशा वेळी ह्या नागरिकांना 'माणुसकीची भिंत' चा आधार मिळतो. आपल्या घरात अतिरिक्त पडून राहिलेल्या वस्तू गरजवंतांकडे पोहोचविण्याचे काम ही "माणुसकीची भिंत" करते. हा लोकोपयोगी उपक्रम शहापुरात प्रथमच 'आधार प्रतिष्ठान' कडून राबविला जात असून, ह्याचे अनुकरण शहापुर तालुक्यातील इतरही सेवाभावी संस्थांनी करून, समाजात 'माणुसकी'चे दर्शन घडवावे असे प्रबोधन उपस्थित मान्यवरांनी केले.
उपक्रमाचे आयोजन आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश घुमरे, यांचेसह सुरेंद्र साळवी, प्रदीप पितळे, समीर शेख यांनी केले.
Thursday, 10 November 2016
आधार प्रतिष्ठानची माणुसकी भिंत
Subscribe to:
Post Comments (Atom)
लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण
शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...
-
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांड...
-
प्रशांत गडगे/शहापुर शहापुर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील कुंडन पाडा येथिल स्मशान भुमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली...
-
बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न शहापुर/ प्रशांत गडगे मा ऊ ली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंद...
Campaign MH SH 44 : Good News to all,
ReplyDeleteशहापूर-घाटघर रस्ता मार्गे अकोले ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्या शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१ मध्ये सर्वेक्षण होऊनही १५ वर्षे हा रास्ता रखडला.⛳ लालफीतीच्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याच्या पुनर्सर्वेक्षणासाठी तसेच सरकारस्तरावरील विविध परवानग्यांसाठी २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे या कामाला वेग येणार होता? अकोले तालुका - मुंबई अंतर कमी होणार होते. मुबई-नाशिक महामार्गावरून कसारा-घोटी-भंडारदरा मार्गे जाणार्या रस्त्याऐवजी, MH SH 44 HIGHWAY हा रास्ता तुटलेल्या ठिकाणी जोडला गेल्यास नगर जिल्ह्यात जाण्यासाठी 6 तासांचे अंतर कमी होणार आहे. शिवाय वेळेचीही बचत होणार आहे. मुंबईवरून कल्याण शहापूर घाटघर +( जोड रस्त्यामुळे) + राजूर अकोले,शनिशिंगणापूर / शिडी हे अंतर 6 तासाने कमी होणार.
नगर जिल्ह्य़ातुन भंडारदरा, घाटघर कोकण कड्यावरून चोंढे घाटातून शहापूर तालुक्यातील डोळखांब, तळवाडे, मेट, हिंगळून गावांच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता थेट मुंबईकडे जाणार आहे.
आमदार किसन कथोरे, प्रकाश भोईर यांनी २०१३ च्या विधिमंडळ अधिवेशनात या रस्त्याची मागणी केली होती. आमदार पांडुरंग बरोरा व सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी याबाबत पाठपुरावा केला, तर युतीचे सरकार आल्यानंतर भाजपचे अशोक भांगरे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांनीही या कामाला पाठबळ दिल्याचे समजते. ठाणे जिल्ह्यातील शहापूर व नगर जिल्ह्यातील अकोले हे दोन्ही तालुके आदिवासी उपयोजनेत येत असल्यामुळे आदिवासी विकास खात्याकडून या रस्त्यासाठी निधीची मागणी करण्यात येत होती. या घाटमार्ग रस्त्यामुळे ठाणे व नगर हे दोन्ही जिल्हे दळणवळण, व्यापार व्यवसायाच्या देवाणघेवाणीने एकत्र येऊ शकणार आहेत. रस्ता या मार्गामुळे शहापूरचे चोंढे धरण, २५० मेगा वॉटचा वीज प्रकल्प त्याला लागूनच तालुक्यातील घाटघर, भंडारदरा, रंधा, रतन वाडी, कळसूबाई, शिखरामुळे पर्यटन विकासाला संधी मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार होईल. आदिवासी तरुण आजही रोजगारासाठी नारायणगाव, नाशिक, जुन्नर, ठाणे या भगत जातात; मात्र, हा रस्ता झाला तर भविषात रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध होणार आहेत कोट - ठाणे व नगर जिल्ह्याला जोडणारा शहापूर चोढे-घाटघर हा रस्ता सर्वेक्षणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद भाजप सरकारने अर्थसंकल्पात केली. चोढे-घाटघर रस्ता होण्यासाठी अनेक वर्षे या भागातील जनतेची मागणी होती. तत्कालीन कार्यकारी अभियंता हि. ता. मेंढीगिरी यांनीही सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनीही या कामात मदत केली. भंडारदरा घाटघर येथील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होईल
https://www.google.co.in/maps/dir/19.5352395,73.6515699/19.535211,73.6516473/19.5352318,73.6515908/@19.5376263,73.6485576,16z/data=!4m2!4m1!3e0?nogmmr=1
ReplyDelete