Thursday, 10 November 2016

शहापुर तालुका दत्तक घेण्याची मागणी

 शहापुर तालुका दत्तक घेण्याची मागणी

विचारमंथन LIVE न्युज नेटवर्क

मुंबई महानगरपालिकेने शहापूर दत्तक घेऊन तालुक्याचा विकास करावा अन्यथा 

मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा आमदार रामनाथ मोते यांचा निर्णय

शहापूर (प्रतिनिधी)

मुंबईकरांची तहान भागवून मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्या शहापूर तालुका महानगरपालिकेने दत्तक घेणे अपेक्षित असून *शहापूरचा विकास करणे पालिकेची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे मात्र अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष केले असून या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी घेतला असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले

याबाबत आमदार रामनाथ मोते यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून शेवटचा अल्टिमेटम दिला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले 

शहापूर या आदिवासी तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा हि जलाशयाची मोठी धरणे असून या धरणांचा पाणीसाठा मुंबई शहराची तहान भागविण्यासाठी केला जातो. याच तालुक्यात अजून दोन मोठी धरणे प्रस्तावित आहेत. 

या प्रकल्पांसाठी अनेक गावे प्रकल्पग्रस्त असून या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही सोयी-सुविधा, नोकर्या,  शैक्षणिक सुविधा, उत्तम रस्ते व सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची व्यवस्था करणे मुंबई महानगरपालिकेचे नैतिक कर्तव्य असून या सर्व बाबतीत शहापूर तालुका आजही विकासापासून वंचित आहे. या तालुक्यात मोठं-मोठे कारखाने व प्रकल येत असून हा तालुका वॉटर व लँड बॅक झाला आहे मात्र विकास शून्यच आहे. शहापूर तालुक्यातील *छोट्या-छोट्या गावांमध्ये, वाड्या वस्त्यांवर रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा प्रशासन पुरवू शकले नाहीत*

यासर्व बाबींची गंभीरपणे महापालिका प्रशासनाने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास *वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून शहापूर तालुक्याला वंचित ठेवल्याबाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी घेतला असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

पेंग्विनसाठी लाखोंचा खर्च  शहापूरला मात्र दमडीही नाही

एकीकडे मुंबईच्या मनोरंजासाठी पेंग्विनच्या खरेदीसाठी महापालिका लाखो रुपयाचा चुराडा करते मात्र *३ कोटी मुंबईकरांची तहान भागविण्यार्या शहापूर तालुक्याच्या मूलभूत सुविधांकडे पालिका दुर्लक्ष करीत असून शहापूर तालुक्याला यूज अँड थ्रो करीत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी दिली* 

4 comments:

  1. शिवसेनेने पालिकेच्या माध्यमातून शहापुर चा विकास करुन एक आदर्श उभा करायला पाहीजे होता विकासाच
    मॉडेल शहापुर तयार करू शकत महाराष्ट्रात दाखवु शकले असते

    ��

    ReplyDelete
  2. https://www.google.co.in/maps/dir/19.5352395,73.6515699/19.535211,73.6516473/19.5352318,73.6515908/@19.5376263,73.6485576,16z/data=!4m2!4m1!3e0?nogmmr=1

    ReplyDelete
  3. Campaign MH SH 44
    शहापूर-घाटघर रस्ता मार्गे अकोले ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्‍या शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१ मध्ये सर्वेक्षण होऊनही १५ वर्षे हा रास्ता रखडला.⛳ लालफीतीच्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याच्या पुनर्सर्वेक्षणासाठी तसेच सरकारस्तरावरील विविध परवानग्यांसाठी २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे या कामाला वेग येणार होता? अकोले तालुका - मुंबई अंतर कमी होणार होते. मुबई-नाशिक महामार्गावरून कसारा-घोटी-भंडारदरा मार्गे जाणार्‍या रस्त्याऐवजी, MH SH 44 HIGHWAY हा रास्ता तुटलेल्या ठिकाणी जोडला गेल्यास नगर जिल्ह्यात जाण्यासाठी 6 तासांचे अंतर कमी होणार आहे. शिवाय वेळेचीही बचत होणार आहे. मुंबईवरून कल्याण शहापूर घाटघर +( जोड रस्त्यामुळे) + राजूर अकोले,शनिशिंगणापूर / शिडी हे अंतर 6 तासाने कमी होणार.
    नगर जिल्ह्य़ातुन भंडारदरा, घाटघर कोकण कड्यावरून चोंढे घाटातून शहापूर तालुक्यातील डोळखांब, तळवाडे, मेट, हिंगळून गावांच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता थेट मुंबईकडे जाणार आहे.
    आमदार किसन कथोरे, प्रकाश भोईर यांनी २०१३ च्या विधिमंडळ अधिवेशनात या रस्त्याची मागणी केली होती. आमदार पांडुरंग बरोरा व सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी याबाबत पाठपुरावा केला, तर युतीचे सरकार आल्यानंतर भाजपचे अशोक भांगरे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांनीही या कामाला पाठबळ दिल्याचे समजते. ठाणे जिल्ह्यातील शहापूर व नगर जिल्ह्यातील अकोले हे दोन्ही तालुके आदिवासी उपयोजनेत येत असल्यामुळे आदिवासी विकास खात्याकडून या रस्त्यासाठी निधीची मागणी करण्यात येत होती. या घाटमार्ग रस्त्यामुळे ठाणे व नगर हे दोन्ही जिल्हे दळणवळण, व्यापार व्यवसायाच्या देवाणघेवाणीने एकत्र येऊ शकणार आहेत. रस्ता या मार्गामुळे शहापूरचे चोंढे धरण, २५० मेगा वॉटचा वीज प्रकल्प त्याला लागूनच तालुक्यातील घाटघर, भंडारदरा, रंधा, रतन वाडी, कळसूबाई, शिखरामुळे पर्यटन विकासाला संधी मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार होईल. आदिवासी तरुण आजही रोजगारासाठी नारायणगाव, नाशिक, जुन्नर, ठाणे या भगत जातात; मात्र, हा रस्ता झाला तर भविषात रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध होणार आहेत कोट - ठाणे व नगर जिल्ह्याला जोडणारा शहापूर चोढे-घाटघर हा रस्ता सर्वेक्षणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद भाजप सरकारने अर्थसंकल्पात केली. चोढे-घाटघर रस्ता होण्यासाठी अनेक वर्षे या भागातील जनतेची मागणी होती. तत्कालीन कार्यकारी अभियंता हि. ता. मेंढीगिरी यांनीही सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनीही या कामात मदत केली. भंडारदरा घाटघर येथील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होईल

    ReplyDelete

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...